Virat Kohli: वाईट काळात फक्त धोनीने साथ दिली, अडचणीत असताना अनेकांनी मजा घेतली; कोहलीच्या विधानाने खळबळ..

Virat Kohli: आशिया कपच्या (Asia Cup) सुपर फोरचा दुसरा सामना काल दुबईच्या (Dubai) इंटरनॅशनल क्रिकेट ( international cricket) मैदानावर कट्टर परिस्थिती भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यांमध्ये पार पडला. अटीतटीच्या लढतीत पाकिस्तानने भारताचा पाच विकेट आणि एक चेंडू राखून दणदणीत पराभव केला. (Pakistan beat by India 5 wickets)181 धावा उभारून देखील भारताला पराभव पत्करावा लागल्याने, आता अनेकांकडून टीका होत आहे. मात्र त्यातच विराट कोहलीच्या (Virat Kohli) एका विधानाने एकच खळबळ उडाली आहे.

क्रिकेटच्या तिन्हीं फॉरमॅटमध्ये पन्नासहून अधिक सरासरीने धावा करणारा विराट हा जगातला एकमेव खेळाडू आहे. विराट कोहली कॅप्टन म्हणून देखील त्याने केलेली अचीवमेंट कौतुकास्पद आहे. मात्र विराटला आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही, म्हणून व्हाईट बॉल क्रिकेटच्या कर्णधार पदावरून हटवण्यात आलं. गेल्या एक-दीड वर्षापासून विराट कोहली खराब काळातून प्रवास करत असताना अनेकांनी त्याच्यावर टीका केली. या पडत्या काळात माझ्या सोबत कोणीही नसल्याचा खुलासा विराट कोहलीने काल सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत केला आणि खळबळ उडाली.

गेल्या एक दीड वर्षापासून विराट कोहली आपल्या फॉर्मशी झगडताना पाहायला मिळाला. एक महिना क्रिकेट पासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर, विराट कोहलीने अशिया कपमध्ये गेलेला फॉर्म मिळवत टीकाकारांचे तोंड बंद केले. विराट कोहली आता पुन्हा लयीत आला असून, अशिया कपमध्ये झालेल्या तीनही सामन्यात विराट कोहलीची बॅट तळपली असल्याने आता विराट कोहलीचा जुना अवतार चाहत्यांना पाहायला मिळत आहे. पाकिस्तान विरुद्ध विराट कोहलीने अखेर पर्यंत एक हाती खिंड लढवत 44 चेंडू 60 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. आणि भारताला 181 पर्यंत मजल मारून दिली.

181 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाने भारताचा एक चेंडू आणि पाच गडी राखून पराभव केला. पराभवानंतर विराट कोहली पत्रकार परिषद घेण्यासाठी आला. या पत्रकार परिषदेत विराट कोहलीला अनेक प्रश्नांची उत्तरे विचारण्यात आली. विराटने देखील अनेक प्रश्नांची उत्तरे मनमोकळ्या अंदाजात दिली. मात्र विराट कोहलीला एका पत्रकाराने विचारलेल्या एका प्रश्नामुळे आता क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. एका पत्रकाराने या पत्रकार परिषदेत, गेल्या एक दीड वर्षात विराट बाबत घडणाऱ्या गोष्टींविषयी विचारलं. व्हाइट बॉल क्रिकेट कर्णधार पदावरून तुझी हकलपट्टी करण्यात आली. कसोटी क्रिकेटचा राजीनामा देखील तुला द्यावा लागल. फॉर्मने देखील तुझी साथ सोडली, हा काळ तुझ्यासाठी कसा होता? या प्रश्नांवर विराट कोहलीने आपल्या अंदाजात उत्तर दिले.

पत्रकारांनी विचारलेल्या या प्रश्नावर उत्तर देताना विराट कोहली म्हणाला, यावर मी फारसं बोलू शकत नाही. मात्र मी एक गोष्ट सांगतो, ज्यावेळी मी कसोटी क्रिकेटच्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला, तेव्हा मला फक्त एका व्यक्तीचा फोन आला, तो होता महेंद्रसिंग धोनी. महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) व्यतिरिक्त मला कोणाचाही मेसेज आला नाही. माझा नंबर अनेकांकडे होता, मात्र मला कोणीही साथ दिली नाही. ज्यावेळी खराब काळातून आपण जात असतो त्यावेळेस सल्ले देणारे खूप असतात. अनेकांनी सल्ले दिले, मात्र टीव्हीवर सल्ले देणं माझ्यासाठी काहीही उपयोगाचं नाही. मी याला शून्य व्हॅल्यू देतो. जर तुम्हाला मदत करायची असेल, तर तुम्ही वैयक्तिक बोलणं आवश्यक आहे. संपूर्ण जगासमोर बोलून त्याचा काय उपयोग? मला एखाद्याला मदत करायची झाली तर मी वैयक्तिक त्याला जाऊन सांगेन.

विराट कोहलीच्या या विधानाने आता वाद होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. मी जेव्हा वाईट काळातून जात होतो, तेव्हा मला कोणाचीही साथ मिळाली नाही, शिवाय महेंद्रसिंग धोनीच्या. तुमचं नातं प्रामाणिक असतं, तेव्हा तुम्ही सिक्युअर असता. ना मला कोणाला काही द्यायचं आहे, ना मला कोणाकडून काही घ्यायचं आहे. मात्र एखादं नातं जर प्रामाणिक असेल, तर एक रिस्पेक्ट असतो. आणि तो पडत्या काळात दिसतो. विराट कोहलीच्या या विधानामुळे महेंद्रसिंग धोनीने त्याला पडत्या काळात साथ दिली. मात्र महेंद्रसिंग धोनी व्यतिरीक्त कोणीही मला साथ दिली नाही, एकप्रकारे असा खुलासा विराट कोहलीने केला आहे.

भारताच्या पराभवापेक्षा विराट कोहलीने अटेंड केलेली पत्रकार परिषदेत सध्या चर्चेचा विषय बनली आहे. सोशल मीडियावर विराट कोहली ट्रेंड देखील होताना पाहायला मिळत आहे. पडद्या काळात विराट कोहलीला आपल्या सहकाऱ्यांची साथ मिळाली नाही, हे विराट कोहलीने पत्रकार परिषदेत जाहीररित्या बोलून दाखवलं आहे. विराट कोहलीच्या या मोठ्या खुलाशाने आता नवीन वाद होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे विराट कोहलीने हा खुलासा करताना ड्रेसिंग रूमचं वातावरण सद्या खूप जबरदस्त असून, त्याचे श्रेय टीम मॅनेजमेंट आणि कर्णधाराला जातं, असं देखील म्हटलं आहे.

हे देखील वाचा Yuzvendra Chahal: श्रेयस अय्यरला डेट करत असल्याची चहलच्या पत्नीची कबुली; चहलही म्हणाला आज पासून नवीन आयुष्य..

Relationship Tips धोकेबाज पार्टनरमध्ये असतात ही लक्षणे; आताच जाणून घ्या अन्यथा आयुष्य होईल उद्ध्वस्त..

Cyrus Mistry Accident: सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन, व्हिडीओ व्हायरल; जाणून घेऊया प्रवास..

Tiger Shroff Disha patani break up: एकवेळ त्याच्या राहीन, पण मी सेक्स शिवाय राहूच शकत नाही; दिशा पटाणीच्या स्फोटक मुलाखतीने खळबळ..

Alcohol drink: दारू सोडण्याचा विचार करताय? सावधान! अचानक दारू पिणं बंद केल्यास आरोग्यावर होतात हे गंभीर परिणाम..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.