WhatsApp update: ही सोपी पद्धत वापरून WhatsApp वर Delete झालेला मेसेज येणार वाचता; जाणून घ्या ट्रिक…
WhatsApp update: सध्याचा जमाना हा स्मार्टफोनचा जमाना आहे. स्मार्टफोनच्या दुनियेत अनेकजण Whatsapp मेसेजिंग ॲपचा वापर करताना पाहायला मिळतात. स्मार्टफोन वापरणाऱ्या प्रत्येकाकडे WhatsApp असतेच असते. स्मार्टफोन वापरणारांकडे जर WhatsApp नसेल, तर नवलच होईल. आता WhatsApp हे फक्त मेसेजिंग ॲप राहिले राहिले नाही. WhatsApp च्या माध्यमातून आता युजर्सना व्हिडिओ कॉल, व्हॉईस कॉल, फोटो, व्हिडिओ, लोकेशन, document यासह अनेक गोष्टी शेअर करता येताता.
व्हाट्सअप आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन फीचर्स देखील उपलब्ध करत असल्याचं पाहायला मिळतं. बहुसंख्य व्हाट्सअप युजर्स व्हाट्सअपचा वापर एकमेकांना चॅटिंग करण्यासाठी करतात. चॅटींग करत असताना तुम्ही मनात असणाऱ्या अशा काही गोष्टी बोलून जाता, त्याचा नंतर पश्चाताप होता. आणि म्हणून क्षणात सेंड केलेले मेसेज तुम्ही डिलीट देखील करता. कधी समोरचा हे मेसेज वाचतो, तर कधी-कधी त्याला वाचण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. मात्र डिलीट केलेला मेसेज काय बरं असतील,याचा विचार मात्र तो करत बसतो. जर तुमच्या सोबत देखील हा प्रकार घडला असेल, तर आता चिंता करण्याची आवश्यकता नाही. डिलीट केलेला मेसेज आता तुम्हाला वाचता येणार आहे. आज आम्ही तुम्हाला याच संदर्भात सविस्तर माहिती देणार आहोत.
WhatsApp नेहमी आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असते. पूर्वी एखाद्याकडून चुकीचा मेसेज सेंड झाला तर तो डिलीट करता येत नव्हता. नंतर व्हाट्सअपने बदल केला. आणि ठराविक काळापर्यंत आपण चुकीचा मेसेज डिलीट करू शकू लागलो.मात्र आता व्हाट्सअपने यात आणखी बदल केला आहे. डिलीट केलेला मेसेज जर तुम्हाला वाचायचा असेल, तरीदेखील आता वाचता येणार आहे. आज आपण याच ट्रिक बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी सर्वप्रथम आपण WhatsApp डिलिट’ फीचर काय आहे? हे जाणून घेऊया.
WhatsApp डिलिट’ फीचर
सुरुवातीला WhatsApp वरचे सेंड केलेले कोणतेही संदेश डिलीट करण्यासंबंधी कसलेही फीचर्स उपलब्ध नव्हते. आपण एखादा मेसेज सेंड केल्यानंतर, तो डिलीट करता येत नव्हता. मात्र व्हाट्सअपने नंतर या संदर्भात एक फीचर्स जारी केले. आणि चुकून सेंड झालेला मेसेज ठराविक काळापुरता डिलीट करता येऊ लागला. व्हाट्सअपने यासंदर्भात जारी केलेल्या फीचर्समध्ये तीन पर्याय दिले गेले, यामध्ये “डिलीट फॉर मी” “डिलीट फॉर एव्हरीवन” आणि “कॅन्सल” असे तीन पर्याय दिले गेले.
“डिलीट फॉर एव्हरीवन” केल्यानंतर अनेकांना आपल्याला आलेला मेसेज नक्की काय असेल, याविषयी उत्सुकता असायची. साहजिकच यामुळे अनेक जण डिलीट केलेला मेसेज काय असेल, हे शोधताना देखील दिसून येतात. मात्र व्हाट्सअपने या संदर्भात अजून तरी कोणतेही फीचर्स आणले नाही. परंतु काही ॲप्सच्या मदतीने तुम्ही डिलीट झालेल्या मेसेजसंदर्भात सविस्तर जाणून घेऊ शकता. आज आपण याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.
डिलीट केलेले मेसेज या पद्धतीने पाहता येणार
जर तुम्हाला एखाद्याने पाठवलेला संदेश क्षणात डिलीट केला, तर तो नक्की काय असेल? याविषयी तुम्हाला जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप कोणत्याही सुविधा देत नाही. मात्र बाजारात अशा अनेक ॲप्स उपलब्ध आहेत, ज्याच्या माध्यमातून तुम्ही हे जाणून घेऊ शकता. हे ॲप फक्त अँड्रॉइड मोबाईल वरतीच काम करतं. आयफोन तसेच विंडोसारख्या स्मार्टफोनवर या ॲप्स काम करत नाहीत. त्यामुळे जर तुमच्याकडे अँड्रॉइड फोन असेल, तर तुम्ही डिलीट झालेले मेसेज वाचू शकता.
डिलीट झालेला मेसेज काय असेल? हे जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या प्लेस्टोरवरून ‘WAMR’ हे ॲप डाऊलोड करायचं आहे. हे ॲप तुम्ही डाऊनलोड केल्यानंतर, तुमच्या मोबाईलवर हे ॲप ओपन करायचं आहे. हे ॲप ओपन केल्यानंतर, तुम्हाला डिस्क्लेमर वाचायचं आहे. त्यानंतर पुढे एक बाण दिसेल, तुम्हाला त्यावर क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्हाला तुमचे ‘व्हॉट्सऍप’ या ॲपच्या मदतीने मॉनिटर करण्यासाठी सक्षम करावं लागणार आहे. यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर असणारी सर्व माहिती सविस्तर वाचायची आहे. त्यानंतर तुमच्या स्किनवर सेटअप येत नाही, तोवर स्वाइप करत राहायचं आहे.
स्वाईप करत गेल्यानंतर, तुम्हाला नोटिफिकेशन रीडरच्या पुढे ‘सक्षम करा’ हा पर्याय पाहायला मिळेल. तुम्हाला त्यावर क्लिक करायचं आहे. तुम्ही त्यावर क्लिक केल्यानंतर, नोटिफिकेशन ॲपसाठी फोनच्या सेटिंग मध्ये तुम्हाला नेलं जाईल. तुमच्या सेटिंगमध्ये तुम्हाला WAMR हे ऍप उघडायचं आहे. यानंतर तुम्हाला समोर एक बाण दिसेल, तुम्हाला त्यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर, WhatsApp नोटिफिकेशन हिस्ट्री पाहायला मिळणार आहे. या माध्यमातून तुम्हाला डिलीट झालेला प्रत्येक एसएमएस काय असेल, तो पाहायला मिळेल. या पद्धतीने तुम्ही डिलीट झालेल्या मेसेज संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता.
हे देखील वाचाMSRTC Recruitment 2022: राज्य महामंडळात मेगा भरती! दहावीसह या उमेदवारांना करता येणार कर्ज..
Waterproof shoes: Amazon वर पाच Waterproof shoes विकले जातायत तब्बल निम्म्या किंमतीत..
Shravan 2022: श्रावणात या पाच कारणांमुळे मांसाहार टाळलाच पाहीजे, अन्यथा होईल सत्यानाश..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम