LADLI YOJANA: राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय! लाडली योजनेअंतर्गत ‘या’ मुलींना दिले जाणार दर वर्षी ५ हजार..

0

LADLI YOJANA: महिलांचं सशक्तीकरण व्हावे यासाठी केंद्र सरकार तसेच राज्य सरकार देखील विविध योजना राबवत असतं. अलीकडच्या काळात शासनाच्या विविध उपक्रमांमुळे महिलांचं महत्त्व अधिक वाढल्याचं पाहायला मिळतं. सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला उंच भरारी घेताना दिसून येतात. मात्र अजूनही अनेक कुटुंबात मुलींचा जन्म झाल्यास अनेक कुटुंबे दुःखी होताना पाहायला मिळतात. प्रत्येक कुटुंबात एखादी मुलगी जन्मली असेल, तर अडचण नसते. मात्र दुसरं अपत्ये देखील मुलगीच असेल, तर अनेकांना अडचण होते. सहाजिकच दोन मुली झाल्यानंतर, अनेकजण तिसऱ्या अपत्याला देखील जन्म देताना अनेक जन दिसून येतात. पुरुषांच्या या चार गोष्टींवर महिला टाकतात जीव ओवाळून; जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य..

लोकांची ही मानसिकता बदलण्यासाठी शासन अनेक योजना राबवत आहे. त्यातच आता राज्य सरकारने एक नवी योजना सुरू केली असून, ज्या कुटुंबात फक्त दोनच मुली आहेत. अशा कुटुंबाला वार्षिक पाच हजार रुपये आर्थिक मदत दिली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. ज्या कुटुंबातील मुली 2005 नंतर जन्माला आहेत, अशा कुटुंबाला आता राज्य सरकार दरवर्षी पाच हजार रुपये देणार आहे. जर तुम्हाला दोन मुली असतील, आणि त्या 2005 नंतर जन्मल्या असतील, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप आनंदाची आहे.

या कुटुंबाला असा मिळणार फायदा

हरियाणा सरकारने ही योजना सुरू केली असून, या योजनेचं नाव हरियाणा लाडली योजना आहे. या योजनेअंतर्गत ज्या कुटुंबात दोन मुली आहेत. अशांना दरवर्षी पाच हजार रुपये मिळणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. परंतु ज्या कुटुंबातील मुली 20 ऑगस्ट 2005 नंतर जन्मल्या आहेत, अशा कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. मात्र या योजनेचा लाभ या कुटुंबातील मुलींना अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे.

आता आपण या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण-कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, त्याविषयी जाणून घेऊ. 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. आधार कार्ड बरोबरच बीपीएल शिधापत्रिका असणं देखील महत्वाचं ठरणार आहे. मोबाईल नंबर, तुमच्या जन्माचं प्रमाणपत्र, बॅंक पासबुक, पालकांचे ओळखपत्र, पासपोर्ट साईज फोटो, जात प्रमाणपत्र आणि पत्त्याचा पुरावा इत्यादी कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.

असा करा अर्ज

तुमचं कुटुंब या योजनेसाठी पात्र असेल, तर तुम्हाला तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रावर जाऊन, अर्ज करावा लागणार आहे. या व्यतिरिक्त तुम्ही सरकारी रुग्णालयात देखील अर्ज करू शकता. याशिवाय तुम्हाला महिला आणि बालकल्याण विकास विभागामध्ये देखील अर्ज करता येणार आहे. याव्यतिरिक्त तुम्हाला या योजनेविषयी अधिक माहिती हवी असल्यास, आणि कोणतीही अडचण विचारायची झाल्यास तुम्ही १८००२२९०९० या टोल फ्री क्रमांकावर फोन करून माहिती विचारू शकता.

हे देखील वाचाMahaforest Recruitment 2022: महाराष्ट्र वन विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी! मासिक वेतन ४० हजार..

Lifestyle: दररोज से क्स केल्याने काय होतं माहिती आहे? से क्स विषयी जाणून घ्या सविस्तर

Yojana: काय आहे शरद पवार ग्रामसमृद्धी योजना? योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज आणि मिळवा दोन लाख अनुदान..

मोजणी: असा करा घरबसल्या जमीन मोजणीसाठी अर्ज; किती शुल्क आकारलं जातं, काय आहे ई-मोजणी प्रणाली? जाणून घ्या सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.