Motivational video: एक पाय नसूनही एक किलोमीटर प्रवास करते ही चिमुकली; शाळा शिकून शिक्षक होण्याचं आहे स्वप्न..
Motivational video: प्रबळ इच्छाशक्ती असेल, तर तुम्ही आर्थिकदृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या कितीही कमकुवत असला तरी, तुम्ही अनेक घटकांवर मात करू शकता. कधी-कधी सोशल मीडियावर असे काही व्हिडिओ व्हायरल होतात. जे पाहून अनेकांचा जगण्याचा दृष्टीकोन बदलून जातो. असाच एका शाळेत जाणाऱ्या दहा वर्षाच्या चिमुकलीचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ बिहारच्या जमुई जिल्ह्यातील असून, या मुलीचं नाव सीमा आहे.
बिहार जमुई जिल्ह्यातील सीमा या दहा वर्षाच्या मुलीचा अपघातात एक पाय गेला. मात्र ती खचली नाही. अपघातात सीमाचा एक पाय गेल्यामुळे, घरच्यांना देखील सीमाचं आयुष्य आता घरात पडूनच जाणार, असं वाटतं होतं. मात्र सीमाची इच्छाशक्ती, उत्साह आणि साहस पाहून घरच्यांना देखील आश्चर्य वाटलं. सीमा या घटनेनंतर कसलीही खचली नाही. आणि ती आनंदाने, उत्साहाने दररोज एका पायावर एक किलोमीटर प्रवास करून नियमित शाळेत जायला लागली. शाळा शिकून, शिक्षक होऊन गरिबांच्या मुलांना शिकवण्याची सीमाची इच्छा आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओचं अनेकांना कौतुक वाटत असून, अनेकांनी सीमाच्या या इच्छाशक्तीला आणि साहसपणाला सलाम ठोकला आहे. सीमाच्या घरची अतिशय गरीब परिस्थिती आहे. खैरा ब्लॉकच्या नक्षलग्रस्त भागामध्ये फतेपूर गावात सीमा आपल्या आईसह राहते. सीमाला पाच भाऊ बहीण असून, सिमाचे वडील ‘खिरण मांझी’ हे कामानिमित्त बाहेरगावी आहेत. वडीलांच्या कमाईवर सिमाच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. सिमाची आई ‘बेबी देवी’ सिमासह 6 मुलांना सांभाळते.
दैनिक भास्करने हा रिपोर्ट केला असून, सिमाचा हा व्हिडिओ पाहून, अनेकांच्या डोळ्यात पाणी येतं आहे. सोशल मीडियावर सीमा एका पायावर उड्या मारून तब्बल एक किलोमीटर प्रवास करून वेळेत शाळेत पोहचते. हा व्हिडिओ पाहून, अनेकजण भावूक होत असेल तरी, सीमाला याचं काहीही वाटत नाही. सीमाने याला आपली ताकद बनवली असून, तिचं ध्येय शिक्षक होऊन गरिबांना शिकण देणे असल्याचं सीमाने स्वतः सांगितले आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री डॉ. अशोक चौधरी यांनी हा व्हिडिओ पोस्ट करताना लिहिले आहे. आता सीमा चालणार आणि वाचणारही. असं कॅप्शन देत असताना, त्यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांना देखील टॅग केलं आहे. सीमाच्या पुढच्या खर्चाची आणि उपचाराची जबाबदारी ‘महावीर चौधरी ट्रस्ट’ यांनी घेतली आहे.
जब भी आपको अपनी जिंदगी में तकलीफ से हार जाने का अहसास हो सीमा के जीवन को देख लीजियेगा
और इसके जज्बे को भी।
जमुई में एक पैर पर 1KM कूदकर जाती है स्कूल, हादसे में मासूम का काटना पड़ा था पैर, बोली- पढ़ती हूँ..ताकि गरीबों को पढ़ा सकूँ ।#Jamui #Bihar pic.twitter.com/YHvNJLhFmL— Nirbhay Vikash (@NIRBHAYVIKASH) May 25, 2022
हे देखील वाचा Viral video: चिमुकल्यावर वानराने केला हल्ला, बहाद्दराने न घाबरता केला पलटवार..,पुढे काय झालं पहा तुम्हीच..
जमुई में एक पैर पर 1KM कूदकर जाती है स्कूल: हादसे में मासूम का काटना पड़ा था पैर, बोली- पढ़ती हूं…ताकि गरीबों को पढ़ा सकूं
Please Help @SonuSood ji#Jamui #Biharhttps://t.co/SfrIdwz8QJ pic.twitter.com/b7hqJz06ZO— Er. Sugna Tribal (@Sugna_Tribal1) May 25, 2022
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम