Qualifier 1: पहिला क्वालिफायर सामना आज पावसामुळे रद्द होण्याची शक्यता; ‘न’ खेळता गुजरात जाणार फायनलमध्ये तर राजस्थान..
Qualifier 1: आयपीएल 2022 (IPL 2022) या स्पर्धेतील आता केवळ चार सामने शिल्लक असून, चार सामन्यानंतर आयपीएल २०२२ चा विजेता क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत आयपीएलची एकही ट्रॉफी (IPL trophy) न जिंकलेले तीन संघ प्ले ऑफ’मध्ये (playoffs) पोहोचले असल्याने क्रिकेट चाहत्यांना एक नवीन विजेता पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. आयपीएल 2022 मध्ये कोणता संघ विजयी होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच, कोलकत्यात होणाऱ्या प्ले ऑफ’ सामन्यांवर पावसाचं सावट आहे. राजस्थान रॉयल (rajsthan royals) आणि गुजरात टायटन (Gujarat Titan) यांच्यामध्ये होणार आज पाहिला क्वालिफायर (qualifier 1) सामन्यावर देखील पावसाचे (rain) सावट असून, हा सामना रद्द होण्याची शक्यता आहे.
कोलकत्तामध्ये सध्या वादळ आणि जोरदार पाऊस पडत असून, येणारा एक आठवडा वादळ आणि पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. अशा परिस्थितीत कोलकात्याच्या ईडन गार्डनवर (Kolkata Eden garden) होणारे तीन सामने कुठल्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतील याविषयी मोठी शंका आहे. या ठिकाणी होणाऱ्या तीन सामन्यांपैकी एखादा सामना पावसामुळे धुऊन गेला तर, याचा सगळ्यात मोठा फटका रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाला बसणार आहे. कारण चार संघांपैकी सगळ्यात कमी गुण असल्याने रॉयल चॅलेंजर बंगलोर हा संघ न खेळताच स्पर्धेबाहेर फेकला जाणार आहे. मात्र राजस्थान आणि गुजरात यांच्यामध्ये होणारा पहिला क्वालिफायर सामना जर पावसामुळे रद्द झाला तर काय होणार? याविषयी अनेक क्रिकेट चाहत्यांमध्ये जाणून घ्यायचं आहे, आपण याविषयी देखील सविस्तर जाणून घेऊ.
कोलकत्यात तिन्हीं सामन्यावर पावसाचं सावट असल्याने, बीसीसीआयने यासंदर्भात नवीन नियमावली जारी केली आहे. बीसीसीआयच्या नियमावली नुसार, अधिक वेळ पाऊस लागून राहिला तर, दोन्ही संघांमध्ये पाच षटकांचा सामना देखील होणार असल्याचे बीसीसीआयने म्हटलं आहे. मात्र पाच षटकांचा सामना १२ वाजून ५० मिनिटाच्या आत पूर्ण होणे आवश्यक आहे. ठरवून दिलेल्या वेळेत पाच षटकांचा सामना पूर्ण होऊ शकत नसेल, तर दोन्ही संघांपैकी विजेता ठरवण्यासाठी सुपर ओव्हर खेळवण्यात येणार आहे.
मात्र पावसामुळे सुपर ओव्हरही होऊ शकली नाही, तर मात्र साखळी सामन्यातील गुणांच्या आधारावर या सामन्याचा निकाल लावण्यात येईल. साखळी सामन्यांमध्ये गुजरात टायटन हा संघ पहिल्या क्रमांकावर असून या संघाकडे 20 गुण आहेत. तर या स्पर्धेत दुसरा क्रमांकावर राजस्थान रॉयल्स असून, त्यांच्याकडे 18 गुण आहेत. सहाजिकच त्यामुळे आज होणारा सामना पावसामुळे रद्द झाल्यास राजस्थान रॉयल्स संघाला यांचा फटका बसणार आहे. तर गुजरात टायटन चांगला फायदा होऊन गुजरात संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. हाच नियम इतर संघाला देखील लागू असणार आहे.
दुसरीकडे एलिमीनेटर सामन्यात देखील पावसाचं सावट असून, एलिमिनेटर सामना देखील रद्द झाला तर, लखनऊ सुपर जाइंट्स संघाचे गुण रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघापेक्षा अधिक असल्याने, या सामन्यात लखनऊ संघाला विजयी घोषित करण्यात येईल. आणि आरसीबी संघाला या स्पर्धेतून आपला गाशा गुंडाळावा लागेल. त्यामुळे सहाजिकच पावसाचा खूप मोठा फटका रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाला बसणार आहे.
कोलकत्तामध्ये होणारे तिन्हीं सामने रद्द झाले तर..
कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर प्ले ऑफ’चे तीन सामने खेळविण्यात येणार आहेत. त्यापैकी दोन क्वालिफायर तर एक एलिमिनेटर सामना होणार आहे. मात्र या तिन्हीं सामन्यांवर पावसाचे आणि वादळाचे सावट आहे. जर पावसामुळे हे तिन्हीं सामने रद्द झाले तर, लखनऊ आणि बेंगलोर संघाला या स्पर्धेतून आपला गाशा गुंडाळावा लागणार आहे. तर या स्पर्धेतील फायनल हा अहमदाबाच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर गुजरात आणि राजस्थान रॉयल्स या संघांमध्ये खेळविण्यात येईल.
हे देखील वाचा IPL 2022 Update: क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामन्यांवर वादळ आणि पावसाचं सावट; ..तर RCB आणि LSG न खेळताच जाणार बाहेर..
IPL 2022: आयपीएलला गालबोट! ऋषभ पंतने केली मॅच फिक्सिंग; व्हिडिओ झाला व्हायरल..
Cardless Withdrawal: आता Card शिवाय ATM मधून UPI द्वारे काढता येणार पैसे; जाणून घ्या प्रोसेस..
Ration Card: आता या लोकांचे रेशन कार्ड होणार बंद! सरकारचा महत्वपूर्ण निर्णय
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम