Vivo smartphone: जबरदस्त कॅमेरा आणि 5000 mAh ची बॅटरी असणारा स्मार्टफोन Vivo ने केवळ नऊ हजारांत केला लॉन्च..

0

Vivo smartphone: अनेकांना कमी किंमतीत जास्त फिचर्स असणारा ब्रँडेड स्मार्ट फोन खरेदी करायचा असतो. या सगळ्या गोष्टींचा अनेक जण विचार करतात असतात. मात्र प्रत्येकाला हे मिळणे शक्य नसतं.‌ मात्र आता विवो (Vivo) स्मार्टफोन (smartphone) निर्माता कंपनीने भारतात असा एक नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे, ज्याची किंमत दहा हजार रुपयांपेक्षा कमी आहे. या फोनला अनेक भन्नाट फीचर्स सोबतच 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. जर तुम्ही विवो स्मार्टफोन कंपनीचे चाहते असाल, आणि तुम्हाला विवो फोन खरेदी करायचा असेल, आणि तुमचे बजेट खूप कमी आहे, तर तुम्ही नुकताच लॉन्च झालेला विवोचा हा स्मार्टफोन खरेदी करू शकता.

Vivo या स्मार्टफोन कंपनीने आपला वेगळा ग्राहक निर्माण केला आहे. अलीकडच्या काळात विवो स्मार्टफोन कंपनीचे अनेक ग्राहक असल्याचे पाहायला मिळते. अनेक जण विवोचे स्मार्टफोन परचेस करताना दिसून येतात. आता विवोने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अगदी कमी किंमतीत अनेक जबरदस्त फीचर्स असणारा फोन मार्केटमध्ये उतरवला आहे. तुम्हाला देखील विवोचा स्मार्ट फोन खरेदी करायचा असेल, तर तुमच्यासाठी ही मोठी संधी असून, हा फोन केवळ नऊ हजार रुपयांत खरेदी करता येणार आहे. विवोने लॉन्च केलेला हा कोणता फोन आहे, याचे फिचर्स काय आहेत? याविषयी आता आपण सविस्तर जाणून घेऊ या

Vivo ने आज Vivo Y01 हा स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची बॅटरी तब्बल 5000mAh असणार आहे. तसेच, या स्मार्टफोनचा डिस्प्ले HD+ असणार आहे. या स्मार्टफोनच्या किंमतीचा विचार करायचा झाल्यास, याची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी असणार आहे. तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला तुलनेने अनेक जबरदस्त फीचर्स मिळणार आहेत. आता आपण आणखी सविस्तर जाणून घेऊया.

Vivo Y01 या स्मार्टफोनची काय आहे किंमत

तर Vivo ने आपल्या ग्राहकांसाठी हा कमी किंमतीचा जबरदस्त फोन मार्केटमध्ये उतरवला आहे. या फोनची किंमत नऊ हजार असून, हा स्मार्टफोन ग्राहकांना दोन रंगांमध्ये खरेदी करता येणार आहे. यामध्ये एलिगंट ब्लॅक आणि सॅफायर ब्लूम असे दोन जबरदस्त कलर ग्राहकांना मिळणार आहेत. Vivo चा हा स्मार्टफोन भारतातील सर्व ई-स्टोअर आणि सर्व रिटेल स्टोअरमधून ग्राहकांना खरेदी करत येणार आहे. Vivo ने हा फोन मार्केटमध्ये उतरवण्याचे कारण म्हणजे,realme narzo 30A, आणि Redmi 10A या फोनचा बाजार उठवण्यासाठी सज्ज केला आहे.

काय आहेत Vivo Y01 ची वैशिष्ट्ये

या स्मार्टफोनला 6.51 इंचाचा HD + Halo फुल व्ह्यू डिस्प्ले देण्यात आला आहे, जो उत्तम मनाला जातो. तसेच हा स्मार्टफोन आय प्रोटेक्शन मोडसह ग्राहकांना मिळणार आहे. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला MediaTek Helio P35 प्रोसेसर मिळणार आहे. यासोबतच मल्टी-टर्बो 3.0 देखील उपलब्ध असणार आहे. ग्राहकांना हा स्मार्टफोन 2 GB रॅम आणि 32 GB स्टोरेज व्हेरियंटसह मिळणार आहे. कंपनीने या फोनचा लूक खूपच प्रीमियर असल्याचं म्हटलं आहे. सोबतच या फोनची 5000 बॅटरी असल्याने ग्राहकांच्या पसंतीस उतरेल असा आमचा विश्वास आहे, असंही कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच वेळी तुम्ही अनेक ॲप्स चालवत असताना तुम्हाला येणारा अनुभव उत्तम असणार आहे. कारण या फोनमध्ये मल्टी टर्बो 3.0 फीचर टाकण्यात आले आहे. Vivo Y01 मध्ये फेस वेक फीचर देखील देण्यात आले आहे. ज्यामुळे तुम्हाला फोन क्षणात अनलॉक करण्यात मदत होणार आहे. या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याचा विचार करायचा झाल्यास, 8-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तर ५ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात तुम्हाला लाइम लॅप्सपासून फेस ब्युटीपर्यंत अनेक फिचर्स प्रदान केले जातात.

हे देखील वाचा Second hand car: Maruti Suzuki, सह नामांकित कंपन्यांच्या सेकंड हॅन्ड कार मिळतायत टू-व्हीलर पेक्षाही कमी किंमतीत; जाणून घ्या कुठे सुरू आहे सेल..

Smartphone charger: या कारणामुळे स्मार्टफोनची बॅटरी आणि ओरिजनल चार्जर होतात लवकर खराब..

Wheat growers farmer: गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर उठले मोदी सरकार; आता गहू कवडीमोल भावाने विकला जाणार हेआहे कारण..

Ration Card: आत या लोकांचे रेशन कार्ड होणार बंद! सरकारचा महत्वपूर्ण निर्णय 

Hero MotoCorp: दुचाकीस्वारांची पेट्रोलच्या खर्चातून होणार सुटका; आता Hero Splendor इलेक्ट्रिक रूपात..

second hand bike: तीन महीने वापलरेली Pulsar १८ हजारांत Splendor Plus १६ हजारांत तर CB unicorn 30 हजारांत; जाणून घ्या अधिक..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.