Smartphone charger: या’ कारणामुळे स्मार्टफोनची बॅटरी आणि ओरिजनल चार्जर होतात लवकर खराब..

0

Smartphone charger: आज-काल स्मार्टफोन (smartphone) कोण वापरत नाही. स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जेवढा जास्त किंमतीचा स्मार्ट फोन तेवढी जास्त आपण त्याची अधिक काळजी घेतो. मात्र कधीकधी छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपला स्मार्टफोन खराब होऊ शकतो. याची तुम्हाला कल्पना आहे का? स्मार्टफोन बरोबरच सगळ्यात जास्त अनुभव तुम्हाला येत असेल, तो म्हणजे बॅटरी आणि चार्जर लवकर खराब होण्याचा. जर तुम्हाला हा अनुभव आला, असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे.

कुठल्याही महागड्या वस्तू आपण जपूनच वापरतो. मात्र कधीकधी वस्तू कितीही व्यवस्थित वापरली तरी, लवकर खराब होण्याचा अनुभव तुम्हाला येतात. आज आपण अशाच एका समस्येविषयी बोलणार आहोत. अनेक महागडे स्मार्टफोन आपण खरेदी करतो, त्यासोबत चार्जर देखील ओरिजनल मिळतो. मात्र बऱ्याचदा ओरिजनल चार्जर लवकर खराब होतो. हा ओरिजनल चार्जर (original charger) लवकर का खराब होतो? आणि त्याचे मोबाईलवर देखील काय परिणाम होतात? ते आपण सविस्तर जाणून घेऊया.

लोकल चार्जर वापरल्यामुळे ‘हे’ होतात तोटे..

आपल्या स्मार्टफोनचा ओरिजनल चार्जर खराब झाल्यानंतर, आपण महागडे ओरिजनल चार्जर विकत घेत नाही. आणि मग बाजारातून डुप्लीकेट चार्जर (duplicate charger) घेऊन येतो. त्याचा खूप मोठा फटका आपल्या स्मार्टफोनला देखील बसतो. हळूहळू स्मार्ट फोनची बॅटरी बॅकअप मार खायला लागते. हे केवळ डुप्लीकेट चार्जर वापरल्यामुळे होते, मात्र आपण याकडे दुर्लक्ष करतो. आणि स्मार्टफोन जुना झाला असल्यामुळे, हा प्रॉब्लेम निर्माण होत असेल, असा आपण विचार करतो. आणि मग नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा निर्णय घेतो.

अनेकदा आपण डुप्लिकेट चार्जर वापरल्यामुळे, आपला स्मार्टफोन लवकर खराब होतो, हे आपल्याला जाणवत देखील नाही. ओरिजनल चार्जर न वापरता डुप्लिकेट चार्जर वापरल्यामुळे आपला स्मार्टफोन गरम देखील झाल्याचे आपल्याला जाणवेल. सहाजिकच त्यामुळे आपल्या स्मार्ट-फोनची बॅटरी दीर्घकाळ टिकत नाही. त्यामुळे जेवढं शक्य होईल, तेवढं आपण ओरिजनल चार्जरनेच आपला स्मार्टफोन चार्जिंग करणं आवश्यक आहे. आता आपण ओरिजनल चार्जर कसा वापरायचा? हे जाणून घेऊया..

ओरिजनल चार्जर वापरण्याची ‘ही’ आहे योग्य पद्धत

आपण नेहमी महागड्या वस्तू खरेदी करतो. मात्र त्याचा वापर कसा करायचा हे अनेकदा आपल्याला माहिती नसतं. किंवा छोट्या-छोट्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो. मात्र यामुळे वस्तू लवकर खराब होतात, याची आपल्याला कल्पना देखील नसते. स्मार्टफोनच्या बाबतीत देखील हा नियम लागू होतो. स्मार्टफोन चार्जिंग लावताना नेहमी आपण चार्जरची पिन स्मार्टफोनच्या भोकात घालताना, अगदी व्यवस्थित हळुवारपणे घालायची आहे. कितीही घाई गडबड असली तरी, आपण स्मार्टफोन चार्जिंग लावताना पिन नेहमी सावकाश खुपसणे आवश्यक आहे.

दुसऱ्या कंपनीचा स्मार्टफोन चार्जिंगला लावू नका

अनेकदा आपण पाहतो, एकाच ओरिजनल चार्जरने आपण अनेक वेगवेगळ्या कंपनीचे स्मार्टफोन चार्जिंग करतो. आपल्या घरात स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या एकापेक्षा दोन किंवा तीन असते. त्यातल्या एखाद्याचा चार्जर खराब झालेला असतो. मात्र त्याचा स्मार्टफोन अन्य कंपनीचा असतो. मात्र तरीदेखील आपण, तो स्मार्ट फोन चार्जिंग करतो. हे देखील खूप महत्त्वाचं कारण आहे, चार्जर आणि स्मार्टफोनची बॅटरी खराब होण्याचं.

अनेकांना चार्जर दिल्याने लागेल वाट

अनेकदा आपला ओरिजनल चार्जर अनेक जण चार्जिंग करण्यासाठी घेऊन जातात. हा प्रकार खेडेगावात सर्रास पाहायला मिळतो. मात्र यामुळे देखील आपला चार्जर आणि स्मार्ट फोनची बॅटरी खराब होण्यास मदत होते. त्याचे कारण म्हणजे, आपला स्मार्टफोन घेऊन जाणारा चार्जर कसा वापरतो? हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे आपण नेहमी अशा गोष्टींकडे गांभीर्याने पाहून, ओरिजनल चार्जरचा वापर व्यवस्थित करणं आवश्यक आहे.

हे देखील वाचा PM kisan: ऑनलाईन e-KYC प्रक्रिया पुन्हा सुरू; 31 तारखेपर्यंत करा e-KYC अन्यथा ३मे ला जमा होणार नाही अकरावा हप्ता..

KCC: पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना आता ग्रामपंचायतमध्येच मिळणार किसान क्रेडिट कार्ड; जाणून घ्या सविस्तर..

Hero MotoCorp: दुचाकीस्वारांची पेट्रोलच्या खर्चातून होणार सुटका; आता Hero Splendor इलेक्ट्रिक रूपात..

Air India AIASL Recruitment 2022: टाटा समुहाच्या एअर इंडियात विविध पदांसाठी मेगा भरती; असा करा अर्ज..

Redmi smartphone: Redmi चा नवीन धमाका! ‘हा’ जबरदस्त फोन केवळ आठ हजारांत..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.