Leopard Attack: पंधरा जणांवर हल्ला करून बिबट्या गेला पळून; पोलिस आणि बिबट्याची झुंज पाहून व्हाल थक्क..

0

Leopard Attack: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, हे काही सांगता येत नाही. प्राण्यासंदर्भातले रोज नवनवीन व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. प्राण्यांच्या लाइफस्टाइल विषयी देखील जाणून घ्यायला अनेकांना आवडतं. मात्र आता प्राण्यांची देखील लाइफस्टाइल बदलत चालली आहे. जंगलाची लोकवस्ती होत चालली असल्याने, जंगलातील प्राणी आता लोकवस्तीत शिरल्याचं पाहायला मिळतं. अलीकडच्या काळात या घटना आपण नेहमी ऐकतो. अशीच एक घटना हरियाणामधील पानिपत या ठिकाणी घडली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ हरियाणातील पानिपत या ठिकाणचा असून, एक बिबट्या लोकवस्तीत आल्याची माहिती मिळताच, वन विभाग आणि पोलिसांचे पथक बिबट्याला पकडण्यासाठी सज्ज झाले. मात्र बिबट्याने या टीमवर हल्ला केला. बिबट्याने पोलीस आणि वनविभागाच्या टीमवर हल्ला केल्यानंतर, पोलिसांनी देखील बिबट्यावर लाठीचार्ज केला. पोलिस आणि वनविभागाला बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं असलं तरी बिबट्याच्या या हल्ल्यात काही अधिकारी जखमी देखील झाल्याची माहिती आहे.

काय घडलं नेमकं? 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत एक बिबट्या लोकवस्तीत आल्याचे पाहायला मिळत आहे. बिबट्या लोकवस्तीत आला असल्याची, माहिती समजताच वनविभाग आणि पोलिसांचे पथक या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी दाखल झालं. पोलीस आणि वन विभागाचं पथक पूर्णतः तयारीनिशी गेलं नसल्याचं देखील या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. बिबट्या हा अतिशय हिंस्र प्राणी म्हणून, ओळखला जातो. अनेक लोकांना पाहिल्यानंतर बिबट्याने, वनविभाग आणि पोलिसांच्या पथकावर हल्ला केला.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत बिबट्या ज्याप्रमाणे आपल्या भक्ष्याची शिकार करतो, त्याप्रमाणे एका अधिकाऱ्याच्या अंगावर झेप घेतल्याचे व्हिडिओत पाहायला मिळत आहे. मात्र वनविभागाच्या अधिकाऱ्यांने देखील या हल्ल्याचा प्रतिकार करत, स्वतःला बिबट्याच्या तावडीतुन वाचवण्यात यश आले. यानंतर बिबट्या आणखी एका अधिकाऱ्यांच्या अंगावर जोरदार हल्ला करतो. मात्र तेवढ्यात पोलीस बिबट्याच्या अंगावर लाठीचार्ज करतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा थरारक व्हिडिओ पाहताना अनेकांच्या अंगावर शहारे उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडिओत नक्की काय होणार, याची उत्सुकता देखील लागून राहते.

अखेर पोलिसांनी बिबट्याच्या अंगावर लाठीचार्ज केल्यानंतर, बिबट्या या गर्दीतून पळून जाण्यात यशस्वी होत असल्याचं, या व्हिडीओत दिसत आहे. मात्र नंतर या बिबट्याला जेरबंद केल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ अनेकांनी विविध प्लॅटफॉर्मवर शेअर करत वन विभागाचे आणि पोलिसांचे कौतुक केले आहे. तर काहींनी विनाकारण बिबट्याच्या अंगावर लाठीचार्ज केला असल्याचं देखील म्हटले आहे. हा थरारक व्हिडीओ पत्रकार उमाशंकर सिंह यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट केला आहे.

बिबट्याला बेशुद्धीचे इंजेक्शन दिले पण्..

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला बेशुद्धीचे इंजेक्शन दिलं, मात्र या अधिकाऱ्याचा निशाणा चुकला, आणि बिबट्याने या अधिकाऱ्यांवर हल्ला केला. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात अधिकाऱ्याला स्वतःला वाचवण्यात यश आलं. त्यानंतर दुसऱ्या एका अधिकाऱ्याने ट्रँक्विलायझरने भरलेल्या इंजेक्शनच्या दोन गोळ्या बिबट्याला मारल्या, आणि बिबट्याला पकडण्यात या वनविभाग अधिकाऱ्यांना यश आलं.

काय म्हणाले नेटकरी?

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून अनेकांनी पोलिस आणि वन विभागातील कार्याचे कौतुक केलं आहे. मात्र दुसरीकडे बिबट्याला पकडण्याची पद्धत अनेकांना अन्यायकारक वाटली आहे. अनेकांनी बिबट्यावर काठीचा वर्षाव करणे, योग्य नसल्याचं म्हटले आहे. वनविभागाचे अधिकारी जर गांभीर्याने गेले असते तर, ही घटना घडलीच नसती. सुदैवाने कोणाचाही बळी गेला नाही, ही आनंदाची बातमी असली तरी, वन विभागाने अधिक जबाबदारीने आणि सावधगिरीने काम करणे, आवश्यक असल्याचं अनेकांनी म्हटले आहे.

हे देखील वाचा. Online shopping: या सरकारी वेबसाईटवर आहे अनेक वस्तूंवर बंपर ऑफर; लॅपटॉप तर केवळ..

Aadhaar Updation: आधार कार्डवर जन्मतारीख चुकीची असल्यास घेता येणार नाही या योजनांचा लाभ; या सोप्या पद्धतीने बदला जन्मतारीख..

Google Search: गुगलवर या तीन गोष्टी सर्च केल्यास, पोलीस ठोकतील बेड्या..

PM kisan: शेतकऱ्यांच्या खात्यावर या तारखेला पीएम किसान योजनेचा ११ वा हफ्ता जमा होणार, लवकर करा he काम..

Viral video: माणसांप्रमाणे प्राणी देखील ठेवतात संबंध; २ कोटी ७० लाख लोकांनी पाहिलेल्या या व्हिडीओत आहे तरी काय? पहा तुम्हीच..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.