Hero MotoCorp: दुचाकीस्वारांची पेट्रोलच्या खर्चातून होणार सुटका; आता Hero Splendor इलेक्ट्रिक रूपात..

0

Hero MotoCorp: इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने अनेकांना टू-व्हीलर वापरणे परवडत नसल्याचे, चित्र पाहायला मिळत आहे. पेट्रोलचे दर गगनाला भिडले असल्याने टु-व्हीलरचा वापर करणे टाळत असल्याचे दिसत आहे. अनेक बड्या अॅटोमोबाईल कंपन्यांनी देखील ही बाब लक्षात घेऊन, अनेक टू व्हीलर स्कूटर आणि बाईक बाजारात उतरवायला सुरूवात केली आहे.

भारतात सर्वाधिक विक्री गेलीस स्प्लेंडर टू व्हीलर देखील आता इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ग्राहकांना वापरता येणार आहे. अनेक बडे ऑटो मोबाईल कंपनी बाजारामध्ये इलेक्ट्रॉनिक टू व्हीलर बाजारात उतरवल्या आहेत. जास्त करून स्कुटी बाजारात उपलब्ध आहेत. लोकं खरेदी देखील करत आहेत, मात्र इलेक्ट्रॉनिक रुपात ग्राहकांना चांगला पर्याय मिळत नसल्याचं दिसतं.

मात्र आता पेट्रोलच्या खर्चामुळे कंटाळलेल्या दुसऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून आता त्यांना भारतात सर्वाधिक विकली गेलेली स्प्लेंडर टू-व्हीलर इलेक्ट्रॉनिक करता येणार आहे. इलेक्ट्रिक कन्व्हर्जन किट (EV रूपांतरण किट) बसवल्यानंतर स्प्लेंडर ही इलेक्ट्रिक बाईक बनणार आहे. Hero Splendor EV Conversion Kit हे नुकतेच प्रसिद्ध EV स्टार्टअप कंपनी GoGoA1 ने नुकतेच लाँच केले आहे. या किटला आरटीओची देखील मान्यता दिली आहे.

खर्च किती येणार?

ज्या दुचाकिस्वारांना आपली स्प्लेंडर गाडी इलेक्ट्रिक बाईकमध्ये करून पेट्रोलसाठी होणारा अवाढव्य खर्चाची बचत करायची असेल, तर आपल्या स्प्लेंडर या मोटरसायकलला इलेक्ट्रिक किट बसविण्याचा पर्याय उपलब्ध आहे. GoGoA1 या EV या स्टार्टअप कंपनीने Hero Splendor EV Conversion Kit बाजारात उपलब्ध केले असून, याची किंमत 35, हजार असणार आहे. मात्र या सोबत ग्राहकांना बॅटरीचा खर्च वेगळा द्यावा लागणार आहे. EV रूपांतरण किट तसेच बॅटरीचा खर्चाचा विचार करायचा झाल्यास 95 हजार रुपयांपर्यंत हा खर्च येणार आहे.

3 वर्षांची वॉरंटी 

Hero Splendor EV रूपांतर किटला तब्बल ३ वर्षांची वॉरंटी दिली जाणार आहे. EV स्टार्टअप कंपनी GoGoA1 ने स्प्लेंडर बाईक या इलेक्ट्रिक किटमध्ये एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल 151 किलोमीटर पर्यंत जाऊ शकणार आहे. अनेक जण या स्टार्ट-अप कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक किट आपल्या गाडीला बसवत असल्याचं पाहायला मिळतं. मात्र याची रेंज थोडी जास्त असल्याने सर्वसामान्यांना हे परवडणारं नाही.

हिरो मोटार कंपनीची भारतामध्ये सर्वात जास्त खपले लिस्ट स्प्लेंडर टू-व्हीलर आम्ही लवकरच भारतीयांसाठी इलेक्ट्रॉनिक टू व्हीलर बाजारात उपलब्ध करणार असल्याचे कंपनीने अधिकृत जाहीर केलं आहे. त्याविषयी आपण पुढच्या लेखात सविस्तर माहिती घेऊया..

हे देखील वाचा Air India AIASL Recruitment 2022: टाटा समुहाच्या एअर इंडियात विविध पदांसाठी मेगा भरती; असा करा अर्ज..

Tata Consultancy Services: मध्ये ४० हजारांची मेगा भरती! IT सह या क्षेत्राच्या विद्यार्थ्यांनाही सुवर्णसंधी; असा करा अर्ज..

PM kisan: पीएम किसान योजनेच्या अकराव्या हप्त्यात मोठा बदल; फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार अकरावा हप्ता..

KCC: पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना आता ग्रामपंचायतमध्येच मिळणार किसान क्रेडिट कार्ड; जाणून घ्या सविस्तर..

Lifestyle: दररोज से क्स केल्याने काय होतं माहिती आहे? से क्स विषयी जाणून घ्या सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.