Dhananjay Munde heart attack: सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका (Heart Attack), ब्रीच कँडी रुग्णालयात…

0

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका (Dhananjay Munde Heart Attack) आल्याची माहिती मिळाली असून उपचारासाठी त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. धनंजय मुंडे यांना थोडाफार त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे त्यांना तात्काळ ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. हॉस्पिटलमध्ये राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील तात्काळ हजेरी लाऊन धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्याचसोबत त्यांचे कुटुंबीय यांच्याशी देखील आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संपर्क साधल्याची माहिती मिळाली आहे.

 

धनंजय मुंडे हे काल परभणीला गेले होते. आज त्यांचा जनता दरबार होता. कदाचित कामाच्या तणावामुळे असे होऊ शकते अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच मुंडे यांची प्रकृती स्थिर असून घाबरण्याचे काहीही कारण नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. मुंडे यांची प्रकृती स्थिर असून त्यांना अजून तीन चार दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात येणार आहे. मुंडे यांच्या आरोग्याच्या सर्व चाचण्या केल्याची माहिती मिळाली आहे. मात्र हॉस्पिटल प्रशासनाकडून अधिकृतपणे कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.

 

धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बडे नेते असल्यामुळे ही माहिती मिळताच बऱ्याच कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलमध्ये हजेरी लावली होती. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना उद्या डॉक्टरांनी भेटण्यासाठी बोलावले असल्याचे स्वतः टोपे म्हणाले. धनंजय मुंडे आमचे शेजारी आहेत. ते आमच्या मराठवाड्याचे भूमिपुत्र आहेत. आम्हा राजकारण्यांना रात्रंदिवस काम असते. आमची धावपळ होत असते. मी धनंजय मुंडे यांना चिंता करू नका. आराम केल्यानंतर सर्व गोष्टी ठीक होतील असे धनंजय मुंडे यांना सांगितल्याचे टोपे म्हणाले.

 

बऱ्याच व्हीआयपी (VIP) लोकांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येते. ब्रीच कँडी हे हॉस्पिटल राज्यातील टॉपच्या यादीतील एक हॉस्पिटल आहे. त्या ठिकाणी उत्तमातील उत्तम डॉक्टरांची फौज उपचार करण्यासाठी असते. सर्व सोईसुविधा या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे काळजी करण्याचे काहीही कारण नसल्याचे धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे. त्याचसोबत सध्या प्रकृती व्यवस्थित असल्याचे देखील सांगितले.

हेही वाचा: Lifestyle: दररोज सेक्स केल्याने काय होतं माहिती आहे? से क्स विषयी जाणून घ्या सविस्तर 

lifestyle: दुधात हा पदार्थ मिसळून खाल्ल्याने वैवाहिक जीवनात येईल जोश आणि बरंच काही; जाणून घ्या अधिक.. 

Fuel price: गॅस घेऊन रस्त्यावर बसणाऱ्या स्मृती इराणीची आता सर्वसामान्यही उडवू लागले अजब-गजब थट्टा; तुम्हीच पहा हा व्हिडिओ.. 

Viral video: हत्तीची शिकार करायला गेला सिंह पण शेवटी पासा पलटला; काळजाचा ठोका चुकवणारी झुंज तुम्हीच पहा.. Viral video: समाजाला उपदेश करणाऱ्या या प्रसिद्ध कीर्तनकराची सेक्स क्लिप व्हायरल; तुम्हीच पहा हे घाणेरडं कृत्य

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.