Viral video: रिक्षा अडवायला गेलेल्या पोलिसाला रिक्षाचालकाने हवेत उडवून लावलं; हृदयाचे ठोके चुकवणारी घटना सीसीटीव्हीत कैद..

0

Viral video: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, हे सांगता येत नाही. एक्सीडेंट संदर्भातले अनेक व्हायरल झालेले व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. पोलीस नाकाबंदीसाठी किंवा सिग्नलवर सिग्नल तोडल्यानंतर वाहने अडवण्यासाठी थांबलेले तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. टू व्हीलरवाला पोलिसांनी हात करून देखील थांबत नसल्याने, पोलीस त्याची गाडी पाठीमागून पकडतात, आणि मग यात कधी-कधी दुचाकीस्वार रस्त्यावर पडल्याचे देखील आपण पाहतो, मात्र वेग कमी असल्याने काही इजा होत नाही. मात्र आता या संदर्भातली एक दुर्दैवी घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, एका रिक्षावाल्याने, (auto driver) रिक्षा अडवणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकालाच chennai police)  उडवले आहे. ही दुर्दैवी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

चेन्नईतील नंदमबक्कम भागामधील माउंट पूनमल्ली चौकामध्ये ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेत, नंदमबक्कम पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक पोनराज चांगलेच जखमी झाले आहेत. भरधाव वेगाने जात असणारी रिक्षा दिसल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक पोनराज हे रिक्षाला थांबवण्यासाठी पुढे गेले, मात्र रिक्षा चालकाने न थांबता रिक्षा डायरेक्ट पोलिसाच्या अंगावरच घातली. ही धडक खूपच जोरदार असल्याचे, या व्हिडिओत पाहायला मिळत असून, पोलिस धडकेमुळे चक्क हवेत उडाल्याचेही पाहायला मिळत आहे.

या दुर्दैवी अपघातानंतर पोलीस खाली पडल्याचे, पाहून या रिक्षाचालकाने पळ काढला. संबंधित पोलिस अधिकाऱ्याला इतर पोलिस कॉन्स्टेबलने जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून, रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता रिक्षाचालकाचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली असल्याची माहिती आहे. आता पोलिस संबंधित सीसीटीव्ही कॅमेरे चेक करत असून, लवकरच या रिक्षाचालकाला अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

काय घडलं नक्की?

पत्रकार मुगिलन चंद्रकुमार यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर हँडल वरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत एका चौकात नाकाबंदीसाठी एक महिला पोलीस कॉन्स्टेबल आणि पोलीस उपनिरीक्षक पोनराज वाहने आडवत असताना पाहायला मिळत आहे. समोरून एक भरधाव रिक्षा येत आहे हे पाहून, पोलीस उपनिरीक्षक पोनराज हे रिक्षा थांबवण्यासाठी रस्त्याच्या मध्यभागी जात असताना पाहायला मिळत आहे. मात्र रिक्षाचालक पोलिसांनी थांबण्यासाठी हात करून देखील थांबत नसल्याचंही या व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत पोलीस हाथ करून देखील रिक्षा चालक न थांबता डायरेक्ट पोलिसांना भरधाव रिक्षाची जोरदार धडक देतो. रिक्षा भरधाव वेगाने असल्याने, या धडकेत पोलिस हवेत उडून जमिनीवर जोरदार आपटतात. मात्र पोलिस जमिनीवर आपटल्यानंतर देखील रिक्षाचालक त्या ठिकाणाहून पळ काढतो. व्हायरल झालेल्या व्हिडिओत पोलीस खाली पडल्यानंतर एक महिला पोलीस, जखमी झालेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या दिशेने धावताना पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, अनेकांनी या रिक्षाचालकालावर गुन्हा दाखल करुन, कडक शिक्षा करण्याची मागणी देखील केली आहे.

हे देखील वाचा तीन लाखात खाकी वर्दी; असा झाला डमी रॅकेटचा पर्दाफाश, गृहमंत्र्यांनीही मान्य केले..

पोलीस स्टेशनमध्ये सुरू असलेली तसली पार्टी नागरिकांनी रंगेहात पकडली; वर्दीला काळीमा फासणारी घटना..

Viral video: लेकराला वाचवण्यासाठी आईने दिले बलिदान; आईचं प्रेम दर्शवणारा हृदयस्पर्शी व्हिडीओ एकदा पहाच..

Viral video: माकडाच्या पिल्लाची आणि पक्षांची अनोखी मैत्री पाहून तुम्हीही व्हाल अवाक्..; व्हिडिओ एकदा पहाच..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.