Viral video: वादळात भली मोठी कार हवेत कागदासारखी उडाली; सोळा वर्षाचं पोरगं चालवत होतं कार! काय झालं पुढे, पहा तुम्हीच…

0

Viral video: निसर्ग कधी कोणते रूप धारण करेल, हे कोणालाही सांगता येत नाही. कोणी कितीही मोठा असला तरी निसर्गाच्या पुढे तो काहीही करू शकत नाही. ऊन, वारा, पाऊस, याचा देखील अतिरेक झाला तर, याचे परिणाम सगळ्यांना भोगावे लागतात. चक्रीवादळ, त्सुनामी याविषयी तर बोलायलाच नको. चक्रीवादळ त्सुनामीमुळे तर खूप मोठी जीवित आणि वित्तहानी होताना पाहायला मिळते. असाच एक सोशल मीडियावर वादळाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, या व्हिडीओत भलीमोठी कार कागदासारखी उडाल्याचं पाहायला मिळत आहे.

तुम्ही अनेक चक्रीवादळं पाहिली असतील, या चक्रीवादळात तुमच्या रोजच्या वापरातल्या अनेक वस्तू तुम्ही उडताना देखील पाहिल्या असतील. शहरात राहणाऱ्या लोकांच्या वस्तू अंगणात नसल्याने त्या चक्रीवादळात कशा उडून जातात, याचा फारसा अनुभव घेतला नसेल. मात्र खेडेगावात वादळामुळे काय होतं, हे अनेकांना ठाऊक आहे. खेडेगावात अनेकांच्या घरासमोर अनेक वस्तू असतात, शेतकऱ्यांच्या रानात, घराजवळ ज्वारी काढल्यानंतर कडब्याच्या गंजी लावलेल्या असतात. चक्रीवादळात या देखील उडल्याच्या अनेकांनी पाहिल्या असतील. घरावरचे पत्रे देखील उडल्याचा अनेकांना अनुभव असेल. मात्र तुम्ही कोणी वादळात भली मोठी कार कागदासारखी उडाल्यचे कधी पाहिले आहे का?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, भली मोठी कार अचानक वादळ आल्यामुळे, कागदासारखी उडाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावर काटा तर येईलच, मात्र तुमच्या काळजाचं पाणी देखील झाल्याशिवाय राहणार नाही. रस्ताने जात असणाऱ्या एका गाडीजवळ अचानक वादळ निर्माण होतं. या वादळात खूप मोठ्या प्रमाणात धूळ, झाडांची पाने, बारीक-सारीक गोष्टी या हवेत उडताना पाहायला मिळत आहेत. मात्र अचानक भली मोठी कार गाडी देखील कागदासारखी इकडून तिकडे उलटल्यानं पाहायला मिळत असल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत आपण पाहू शकतो, 360 डिग्रीमध्ये ही गाडी गोल गोल घुमत असल्याचं पाहायला मिळत आहे. चक्रीवादळाने घातलेल्या थैमानातून मोठ्या चतुराईने या गाडीच्या ड्रायव्हरने संयम न सोडता, गाडीचा आणि आपला जीव वाचविण्यात यश मिळवलं. वादळ शांत झाल्यानंतर या गाडीचा ड्रायव्हर आपली गाडी घेऊन पसार झाल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. या चक्रीवादळाची घटना एका व्यक्तीने लांबूनच आपल्या कॅमेरात कैद केली. आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, अनेकांनी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस देखील पाडला आहे.

या चक्रीवादळात गाडीचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर, या गाडीच्या कंपनीने, (शेवरले) मात्र, या गाडी चालकाला तब्बल 35 लाख रुपयांची गाडी भेट देणार असल्याचं जाहीर केलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाल्यानंतर, एका वेबसाईटने या ड्रायव्हरची मुलाखत घेतली. या वेबसाईटशी बोलताना, या गाडी चालकाने आपल्या गाडीची, झालेली अवस्था सांगितली. माझी गाडी चालू तर होते, मात्र पूर्वीसारखी पळत नसल्याचे त्याने म्हटले आहे.

Viral video: म्हतारं आज उद्यावर आलंय, पण मस्ती काही गेली नाही; नशीब वयाचा विचार करून बैलाने सोडून दिले नाहीतर..

तर दुसरीकडे ब्रूस लोरी शेवरलेट कार डीलरशिप यांच्या फेसबुक पेजवरुन या या घटनेसंदर्भात माहिती देऊन एक मोठी घोषणा देखील करण्यात आली. आम्ही चालकाला रेड 2022 सिल्व्हरॅडो 1500 एलटी ऑल स्टार एडिशन ही काय गिफ्ट म्हणून देणार आहोत, असं सांगण्यात आलं आहे. या कारची किंमत 35 लाख रुपये असल्याचे समोर आलं आहे. या कंपनीने पुढे म्हटले आहे, या गाडीचा ड्रायव्हर सुरक्षित असल्याने आम्हाला देखील आता सुरक्षित वाटत आहे.

गाडीत होतं सोळा वर्षाचं पोरगं

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ अमेरिकेमधील टेक्सासमधला असून, या वादळामुळे शहरातील रस्त्यावर वाहणारी अनेक वाहने उलाटली, असल्याची माहिती समोर आली आहे. हे ३० वर्षांमधील सर्वात भयंकर वादळ असल्याचं बोललं जातंय. तसं पाहायला गेलं, तर हे वादळ किती भयंकर होतं याचा अंदाज व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून, येऊ शकतो. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या गाडीतील ड्रायव्हर सोळा वर्षाचा असून, त्याचं नाव रिले लियोन असं आहे. ‘रिले लियोन’ हा या लाल रंगाच्या गाडी मधून ‘Whataburger’ या ठिकाणी एका नोकरीच्या मुलाखतीसाठी गेला होता. त्याला नोकरी देखील मिळाली, मात्र रस्त्याने परतत असताना मध्येच वादळाने त्याला पछाडले.

हे देखील वाचा खत: तुमच्या मोबाईलवर असा चेक करा जवळच्या दुकानात खतांचा किती स्टाॅक शिल्लक आहे, आणि उठवा दुकानदाराचा बाजार..

Pancard: दोन दिवसांत पॅन कार्ड आधारशी लिंक करा, नाहीतर भरावा लागेल दहा हजार दंड; फक्त एक मेसेज पाठवून करु शकता लिंक..

Ration card:केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय! ही आहे रेशन कार्ड धारकांसाठी खूशखबर; असं करा आधार कार्डशी रेशनकार्ड लिंक आणि..

यावर क्लिक करा आणि पहा व्हायरल झालेला व्हिडिओ…

Ration Card Update: रेशनकार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव समाविष्ट करायचंय? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत..

Kisan credit card: किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी असा करा अर्ज; काय आहेत किसान क्रेडिट कार्डचे फायदे? जाणून सविस्तर

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.