माणूसकी संपली रे! एका नेत्यांसाठी दहा जणांना जिवंत जाळून मारले; कर्मचाऱ्यांनाही विझवू दिली नाही आग

0

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal)  विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर काही ठिकाणी हिं सा चा र आणि ह त्ये च्या घटना देखील घडल्याचे पाहायला मिळालं होतं. तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा संघर्ष या काळात पाहायला मिळाला होता. भारतीय जनता पार्टीला पश्चिम बंगालमध्ये यश मिळेल, असे चित्र पाहायला मिळत होतं, मात्र ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी पुन्हा एकदा आपला गड रखण्यात यश मिळवले.

विधानसभा निवडणुकात ममता बॅनर्जी यांचा विजय झाल्यानंतर, देखील पश्चिम बंगालमध्ये हिं सा चा र आणि ह त्ये च्या घटना काही ठिकाणी घडल्याचं पाहायला मिळालं होतं. आता विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा बंगालच्या जनतेला हिं सा चा राचा सामना करावा लागला आहे. काल, तृणमूल काँग्रेसच्या एका पंचायत नेत्याची ह त्या झाली. या घटनेचे आता आता तीव्र पडसाद उमटले आहेत. पश्चिम बंगालमध्ये प्रचंड मोठा हिं सा चा र घडला असून, यात तब्बल दहा लोकांचा जळून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पश्चिम बंगाल पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीरभूम जिल्ह्यातील बारशाल ग्रामपंचायतीचे उपप्रमुख आणि तृणमूल काँग्रेसचे नेते भादू शेख यांची सोमवारी ह त्या झाली. शेख यांची ह त्या झाल्यानंतर मध्यरात्री हा हिं सा चा र झाला. या हिंसाचारात तब्बल दहा जणांना जिवंत जाळण्यात आले. दुसरीकडे या गावचे स्थानिक माहिती देताना म्हणाले आहेत, तृणमूल कॉंग्रेसच्या एका गटातील सदस्यांनी ही आग लावावी. मात्र तृणमूल काँग्रेसने हा आरोप फेटाळून लावला आहे.

बीरभूम जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेसचे अध्यक्ष अनुब्रत मंडल यांनी मात्र सोमवारी रात्री कुठलाही हिं सा चा र झाला नसल्याचं म्हटलं आहे. सोमवारी रात्री लागलेली आग ही शॉर्टसर्किटमुळे लागल्याचं त्यांनी सांगितले. त्यांनी आज दुपारी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. मात्र दुसरीकडे अग्निशामक दलाच्या एका कर्मचाऱ्यांनी माहिती देताना म्हंटले आहे, जेव्हा आम्ही आग विझवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा, आम्हाला काही स्थानिकांनी आग विझवण्यापासून रोखले. या आगीत आम्हाला जवळपास दहा घरे आगीत जळून उध्वस्त झाल्याचं पाहिला मिळाले. असंही या कर्मचाऱ्याने सांगितले आहे.

आतापर्यंत या आगीतुन सात जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र आग भीषण असल्यामुळे आगीत जळलेले मृतदेह कोणाचे आहेत, हे ओळखलं जाणं अवघड आहे. आता घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोबतच परिसरामध्ये नाकेबंदी देखील करण्यात आली आहे. तृणमूल काँग्रेसचे मंत्री फिरहाद हकीम घटनास्थळी पोहोचले असून, परीस्थितीचा आढावा घेत आहेत.

का झाला हिंसाचार?

काल सोमवारी तृणमूल काँग्रेसचे नेते भादू शेख यांच्यावर 4 अज्ञात मोटरसायकलस्वारांनी हल्ला केला. या अज्ञात हल्लेखोर आपलं तोंड झाकलं असल्याने त्यांची ओळख पटू शकली नाही. शेख यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्यांना लगेच जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले . मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. विशेष म्हणजे तृणमूल काँग्रेस मधल्या दोन गटात सुरू असलेल्या वादावरून हा हल्ला झाला असल्याचे बोलले जात आहे. आणि याचे पडसाद म्हणून रात्री आग लावून हिंसाचार झाल्याचं, देखील बोललं जात आहे. मात्र ठोस अशी माहिती अद्याप समोर आलेली नसून, पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

सोशल मीडियावर अफवा

सोशल मीडियावर काहीही अफवा पसरवल्या जातात, हे काही नवीन राहिलेले नाही. दरम्यान या प्रकरणाविषयी देखील काही अफवा सोशल मीडियावर पसरल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षांपासून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजप यांच्यात सुरु असलेल्या संघर्षामुळे अनेकांना तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसाचार झाला, असल्याचं वाटू लागलं. अनेकांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची घरे ममता बॅनर्जी यांच्याच सांगण्यावरून जाळण्यात आली. अशाही अफवा पसरल्या. मात्र यात काहीही तथ्य नसून, तृणमूल काँग्रेसमधील दोन गटाच्या वादावरून ही घटना घडली असल्याचं बोललं जात आहे.

हे देखील वाचा. ‘हे’ आसन केल्याने पुरुषांच्या जोषाबरोबर शुक्राणूंचीही संख्या वाढते; जाणून घ्या सविस्तर…

मंडपातूनच प्रियकरासोबत पळून गेली प्रेयसी; होणाऱ्या नवऱ्याने प्रेमात रंग भरणाऱ्या भवानीला शिकवला चांगलाच धडा...

उन्हाळ्यात ग्राहकांची दिवाळी; Reliance Jio च्या या सहा धमाकेदार अॉफरने सगळेच झालेत हैराण, वाचा सविस्तर….

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.