उत्तर प्रदेश निवडणुक ‘या’ जातीय समीकरणावर झाली; वाचा कुठल्या पक्षाला कोणी आणि किती टक्के मतदान केले
उत्तर प्रदेश निवडणुक या जातीय समीकरणावर झाली; वाचा कुठल्या पक्षाला कोणी आणि किती टक्के मतदान केले.
नुकत्याच पार पडलेल्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत ४०३ जागांपैकी भारतीय जनता पार्टीने तब्बल २७३ जागा जिंकत घवघवीत यश संपादन केले. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांची समस्या, अशा अनेक ज्वलंत मुद्यांना बाजूला सारून या निवडणूकीत मतदारांनी हिंदू मुस्लिम याच मुद्यावर मतदान केल्याचं मतदानोत्तर सर्वेक्षणातून समोर आले आहे. एकीकडे लोकशाहीसाठी हे खूप घातक असल्याचं बोललं जात असलं तरी, दुसरीकडे मात्र भारतीय जनता पार्टीला जे हवं होतं, त्यात त्यांनी यश मिळवलं, असल्याचं देखील बोललं जाऊ लागलं आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या ४०३ जागांपैकी भाजपला २७३ तर समाजवादी पार्टीला १२५ जागा जिंकता आल्या. उत्तर प्रदेशमध्ये बसपा देखील खूप महत्वाचा पक्ष मानला जातो. मात्र त्यांना केवळ एक जागा जिंकण्यात यश मिळाले आहे. परंतु त्यांना १ कोटी १९ लाख मतदान मिळाल्याने याचा मोठा फटका सपाला झाल्याचे पाहायला मिळाले. सपा आणि बसपा या दोघांना मिळालेली मते एकत्र केली तर, ती भाजपाच्या मिळालेल्या मतांपेक्षा जवळपास एक कोटींनी जास्त आहेत. याचा अर्थ ती हे दोघेही एकत्र लढले असते तर भाजपाचा दारूण पराभव झाला असता. या निवडणुकीत सगळ्यांना आश्र्चर्य वाटले ते प्रियांका गांधी यांच्या सभेला प्रचंड मिळणार प्रतिसाद पाहून. मात्र त्याचे मतदानात परिवर्तन झाले नाही. या निवडणुकीचा नक्की लोकांनी कशाच्या आधारावर मतदान केले, याविशी आपण जाणून घेणार आहोत.
हिंदू-मुस्लिम मतदार:
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ यांनी ’80 विरुद्ध 20 असा ध्रुवीकरणाचा नारा देखील दिला. या वादाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पक्षाला निम्म्याहून अधिक हिंदू मतदारांनी मतदान केल्याचं मतदानोत्तर सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्याचबरोबर दुसरीकडे अखिलेश यादवच्या समाजवादी पक्षाला दोन तृतीयांश मुसलमान मतदारांचा पाठिंबा मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. या संदर्भातले तथ्य आता CSDS-लोकनीती सर्वेक्षणाने समोर आणले आहे. तर दुसरीकडे बहुजन समाज पार्टी आणि कॉंग्रेसकडे मात्र मुस्लिम मतदारांनी पाठ फिरवली आहे. तर गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा अखिलेश यादव यांना या वेळी बहुसंख्य समुदायाला आपल्याकडे लक्ष वेधण्यात यश मिळवले. गेल्या विधानसभेला अखिलेश यादवला 18 टक्के बहुसंख्य समुदायाने मतदान केले होते, तर यावेळेस हा आकडा 26 टक्क्यांवर पोहोचला.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निशाण्यावर हिंदू मतदार असल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी आपल्या अनेक भाषणात ध्रुवीकरणाचा मुद्दा सातत्याने उपस्थित केला. त्याचा त्यांना फायदा देखील पाहायला मिळाले. हिंदू मतदारांना आकर्षित करण्यासाठी अखिलेश यादव यांनी काही मंदिरांना भेटी देखील दिल्या. तर दुसरीकडे योगी आदित्यनाथ यांनी प्रचार सभांमध्ये 80 टक्के लोकसंख्येच्या ध्रुवीकरणावर मतदारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर त्यांनी 80 विरुद्ध 20 टक्के अशी घोषणा ही दिली. त्यांच्या वक्तव्याची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा देखील झाली. हिंदू-मुस्लिम लोकसंख्येत ध्रुवीकरण करण्याच्या या विधानाचा त्यांना मोठा फायदा झाल्याचे सर्वेत स्पष्ट आले आहे. यावरून ही निवडणूक अनेक ज्वलंत मुद्यांना बाजूला सारून ध्रुवीकरनवरच झाल्याचे पाहायला मिळाले.
हिंदू मतदार भाजपच्या खात्यात
‘द हिंदू वृत्तपत्रात’ प्रकाशित झालेल्या ‘सीएसडीएस लोकनीती सर्वेक्षणाने’ सादर केलेल्या सर्वेक्षणात म्हंटले आहे, ८० टक्के हिंदू समुदायाच्या मतदारांनी भाजपचा विचार केल्याचे, पाहायला मिळाले आहे. २०१७ च्या तुलनेत, हा आकडा वाढला आहे. २०१७ मध्ये हिंदू मतदारांनी भाजपला ४७ टक्के मतदान केले होते. तर यावेळेस हा आकडा ५४ टक्क्यांवर पोहचला आहे. भाजपबरोबरच अखिलेश यादव यांना देखील या मतदारांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक मतदान केले आहे. गेल्या निवडणूकीत समाजवादी पार्टीला १९ टक्के हिंदू मतदारांचा पाठिंबा मिळाला होता, तर या निवडणुकीत वाढ होऊन २६ टक्के झाला. मात्र दुसरीकडे मायावतींच्या बहुजन समाज पार्टी आणि काँग्रेसकडे हिंदू मतदारांनी सपशेल पाठ फिरवली.
मुस्लिम मतदार ‘अखिलेश’कडे
समाजवादी पार्टीकडे तब्बल ७९ टक्के मुस्लिम मतदार वळल्याचे मतदानोत्तर सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. २०१७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव यांना ४६ टक्के मुस्लिम मतदारांनी मतदान केले होते. तर या वेळी तब्बल ७९ टक्के मतदारांनी पसंती दिली असल्याचे सर्वेत म्हंटले आहे. विशेष म्हणजे भाजपने या निवडणुकीत एकही मुस्लिम उमेदवार रिंगणात उतरवला नव्हता, तरीदेखील गेल्यावेळसच्या तुलनेत मुस्लिम मतदारांचा आकडा वाढला आहे. हा आकडा तीन टक्यावरून आठ टक्के वाढल्याचे समोर आले आहे.
काँग्रेस-बसपाला नाकारले
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पार्टी आणि काँग्रेस या दोन पक्षांची कामगिरी खूपच निराशाजनक राहिली. प्रियांका गांधी यांच्या प्रचारसभांना तुफान गर्दी होऊन देखील, या गर्दीचे मतात परिवर्तन होऊ शकलं नाही. गेल्या विधानसभा निवडणूकीत मायावतीला १९ टक्के मतदारांचा पाठींबा मिळाला होता, मात्र या निवडणुकीत हा आकडा घटून केवळ ६ टक्क्यांवर आला. अशीच परिस्थिती काँग्रेस सोबत देखील झाली आहे. काँग्रेसची मुस्लिम मतदारांची टक्केवारी १९ वरून केवळ ३ टक्क्यांवर आल्याचे सादर केलेल्या सर्वेत म्हंटले आहे.
हे देखील वाचा
रेल्वे स्टेशनवर जोडप्याचा हजारो लोकांसमोर इम्रान हाश्मी स्टाईल कीस; व्हिडिओ व्हायरल.. ..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम