स्थलांतरित मजुरांचे हाल, महागाई,बेरोजगारीने देश त्रस्त असुनही, लोकांनी बिजेपीला का निवडून दिलं? वाचा सविस्तर

0

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला (bjp) घवघवीत यश मिळाले. या निवडणुका भारतीय जनात पार्टीसाठी मोठं आव्हान मानलं जात होतं. महागाई, बेरोजगारी,भ्रष्टाचार, शेतकरी आंदोलन, अशा अनेक जलंत मुद्यांवर ही निवडणूक होणार असल्याचं अनेक राजकीय विश्लेषकांनी म्हटलं होतं. मात्र प्रत्यक्षात असं काही होताना पाहायला मिळालं नाही. आणि पाच पैकी चार राज्यात भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळालं.

गेल्या काही वर्षापासून महागाईचा भडका उडाला आहे. इंधन दरवाढ, गॅसच्या किमतीमध्ये सातत्याने होणाऱ्या वाढीने सर्वसामान्य जनता होरपळून निघत असल्याचे, चित्र संपूर्ण देशभरात पाहायला मिळत आहे. बेरोजगारांच्या आकड्याने उच्चांक गाठला असतानाही, याचा कसलाही परिणाम या निवडणुकांवर झाल्याचे पाहायला मिळाले नसल्याने, अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. फक्त महागाईच नाही, तर शेतकऱ्यांची देखील वाईट अवस्था झाल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. मात्र याचा कसलाही विचार मतदारांनी केला नसल्याचं निकालानंतर स्पष्ट झालं.

केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात देशातला शेतकरी जवळपास दोन वर्ष दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत होता. या आंदोलनाची दखल घेण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या शेतकऱ्यांना आंदोलनजीवी म्हणत, त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम केलं. उत्तर प्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्याचा दावा करणारे, योगी आदित्यनाथ यांच्याच कार्यकाळात हाथरस, लखिंपुर खेरी, उन्नाव सारख्या निंदनीय घटना घडल्या. एवढंच नाहीतर कोरोणा सारखी महाभयंकर परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सपशेल अपयशी ठरल्याचं पाहायला मिळाले.

कोरणाच्या कार्यकाळात केंद्र सरकार कोरोणाची परिस्थिती हाताळण्यात सपशेल अपयशी ठरल्याने, जोरदार टीका भारतीय जनता पार्टीवर झाली. ऑक्सिजनचा पुरवठा, व्हेंटिलेटर सेवा, लसीकरण, अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने, देशात कोरोणाची महाभयंकर परस्थिती निर्माण झाल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीवर सामान्य जनतेकडून देखील करण्यात आला. गंगेत अक्षरशः प्रेतं तसंगताना देखील पाहायला मिळाली. याचा खूप मोठा रोष लोकांमध्ये पाहायला मिळत होता‌. स्थलांतरित मजुरांचे कुरणात झालेल्या अल्लाने संपूर्ण देश अक्षरशः हादरून गेला होता. हजारो लोकांनी पाणी प्रवास करताना आपला जीव गमावला. मात्र याची देखील खिल्ली पंतप्रधानांनी उडवली. एवढा सगळा रोष केंद्र सरकारवर असताना विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीत याचा कसलाही परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं नाही.

महागाई, बेरोजगारी, विकास या मुद्द्यांवर ही निवडणूक लढली जाणार असल्याचं अनेक राजकीय विश्लेषकांनी म्हटलं, मात्र प्रत्यक्षात असं काही होताना पाहायला मिळाले नाही. भारतीय जनता पार्टीने ही निवडणूक भावनिक मुद्द्यावर, ध्रुवीकरण, राष्ट्रवादाच्या नावाखाली, राम मंदिर, मोफत धान्य वाटप, याच मुद्यांवर लढवण्याचे पाहिला मिळाले. ज्यांनी राम मंदिर बांधलं त्यांनाच मतदान द्या, ज्यांचं मीठ खाल्लंय त्यांनाच निवडून द्या, अशी काही विधानं भारतीय जनता पार्टीकडून करण्यात आली. आणि विशेष म्हणजे मतदारांनी देखील याच मुद्द्यांना भावनिक होऊन मतदान केल्याचं दिसून आलं.

विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी बेरोजगारी, विकास, महागाई या मुद्द्यांवरून लोकांचं लक्ष हटवण्यात यशस्वी झाल्याचे दिसून आले. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या अनेक बड्या मंडळीकडून प्रचारादरम्यान तोंडातून निघालेल्या अनेक विधानांवर आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. मात्र, तरी देखील याचा काहीच परिणाम या निवडणूकीवर झाल्या नसल्याचं दिसून आलं. याउलट यांचा फायदाच झाल्याच पाहायल मिळाले.

भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनीच नाही तर, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील काही आश्चर्यकारक विधानं केली. माझं तुम्ही मीठ खाल्लंय, आणि म्हणून मला मतदान द्या. असंही धक्कादायक विधान पंतप्रधानांनी केलं. नंतर आपण केलेले विधान चुकीचे असल्याचं त्यांच्या लक्षात आल्यानंतर, प्रचारात नरेंद्र मोदी म्हणाले, तुम्ही माझे मीठ नाही, मी तुमचा मीठ खाल्लं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या या विधानाचा देखील फायदा भारतीय जनता पार्टीला झाल्याचं दिसून आलं. मोफत धान्य वाटप केल्याने, महिलांना आपण नरेंद्र मोदींचं मीठ खाल्लंय याची जाणीव करून देण्यासाठी हे विधान त्यांनी वापरलं, आणि महिलांनी देखील याला सकारात्मकच घेतलं. कारण 2017 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला महिलांच्या मिळालेल्या मतदान आकडेवारीत यावेळेस आणखीन वाढ झाल्याचं पाहायला मिळाले.

हे देखील वाचा. गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूषखबर; या कारणामुळे काही दिवसांतच गव्हाच्या किमती गगनाला भिडणार…

‘या’ धोरणांमुळे भारताची बेभरवशाचा निर्यातदार देश म्हणून जगात ओळख; शेतकऱ्यांना केंद्र सरकार कसं लुटतंय, वाचा सविस्तर…

कसं जगायचं शेतकऱ्यांनी? नवीन वर्षातही शेतकरी अवकाळी पावसामुळे हवालदिल; शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान वाचून

Xiaomi च्या ‘या’ दोन फोनमुळे सगळ्याच स्मार्टफोनचा उठलाय बाजार; भन्नाट फिचर्स आणि किंमत जाणून हा फोन तुम्हाला घ्यावाच लागेल
फक्त याच शेतकऱ्यांना कृषी सन्मान योजनेचा अकरावा हप्ता चार हजाराचा मिळणार; ‘तुम्हाला’ही घेता येणार लाभ, करा ‘हे’

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.