‘बर्ड फ्लू’ बरोबरच ‘या’ कारणांमुळेही ढासळले अंड्यांचे दर; जाणून घ्या कसे ठरतात अंड्यांचे दर

0

कोरोनामुळे अंड्याची चांगलीच मागणी वाढल्याचे गेल्या काही महिन्यांत पाहायला मिळाले. रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी प्रत्येक जणण आपल्या आहारात रोज अंड्याचा समावेश करू लागला. त्यामुळे अंड्याच्या किमती वाढल्याचे देखील पाहायला मिळाले होते. मात्र आता अचानक अंड्याच्या दरात चांगलीच घसरण झाल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसात ‘बर्ड फ्लू’चे रुग्ण सापडल्यामुळे आता अंड्यांचे दर कमी झाले आहेत. तसं पाहायला गेलं तर, उन्हाळ्यात अंड्याचे दर हे घसरतात, मात्र गेल्या वेळेस उन्हाळ्यात अंड्यांचे तर कमालीचे चढल्याचे पाहायला मिळाले होते.

अंड्याचे दर अचानक कमी होण्यास ‘बर्ड फ्लू’ व्यतिरिक्त आणखी देखील काही कारणे आहेत. आज आपण त्यावर देखील नजर टाकणार आहोत. सध्या भाजीपाल्याचे दर कमी झाले आहेत. अंड्याचे दर कमी होण्यास हे एक कारण जाणवत आहे. एकीकडे ‘बर्ड फ्लू’ची भीती आणि दुसरीकडे, भाजीपाल्याचे दर कमी झाल्याने देखील, हा फटका बसत असल्याचे दिसत आहे. भाजीपाल्याचे दर कमी झाल्यामुळे अनेक जण भाजीपाला खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत. त्याचबरोबर उन्हाळा सुरू झाल्याने तापमानात देखील वाढ झाल्याने, अंड्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे.

अंड्याचे दर एका ट्रे पाठीमागे जवळपास ४० ते ५० रुपयांनी स्वस्त झाल्याचे पाहायला मिळत आहेत. आता अचानक अंड्यांच्या दरात घसरण झाल्याने, स्थानिक व्यापाऱ्यांचे नुकसान होत असून, विक्रीवर देखील परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. आपण पाहिले आहे, कोरोणामुळे प्रत्येकजणच आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास भर देत होता. त्यामुळे अंड्याला मागणी देखील वाढली होती. आणि मागणी वाढल्याने दर देखील वाढले होते. मात्र आता मागणी कमी झाल्याने दरामध्ये घसरण झाली आहे.

गेल्या आठवड्यापासून अंड्यांचे दर घसरल्याने व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय. ‘बर्ड फ्लू’ आणि भाजी-पाल्यांचे दर कमी झाल्याने, त्याचबरोबर तापमानात वाढ झाल्याने, अंड्यांची मागणी घटली. आणि त्यामुळे अंड्याचे दर ढासळले. आठवड्यापूर्वी अंड्यांच्या किंमती प्रति शेकडा ४५० ते ४६५ रुपये होत्या. मात्र, जवळपास या दरात ११० रुपयांनी घसरण झाली आहे. उन्हाळा सुरू झाल्याने, आणि त्यातच आता ‘बर्ड फ्लू’मुळे आताच्या दरपेक्षाही आणखीन दर धासळण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे

कसे ठरतात अंड्यांचे दर?

अंड्याच्या पोल्ट्रीपासून ते विक्रेत्याच्या दुकानापर्यंत तब्बल 4 वेळा अंड्यांचे दर बदलतात. सुरवातीला अंड्यांचे दर हे ज्या त्या राज्यानुसार ठरत असतात. मग घाऊक विक्रेता, किरकोळ विक्रेता, ही सगळी साखळी दरासंदर्भात निर्णय घेत असते. अशा प्रकारे अंड्यांचे दर ठरत असतात. तसं पाहायला गेलं तर पोल्ट्रीपासून ते विक्रेत्यांनापर्यंत अंड्याच्या दरात फारसा बदल होत नाही. पोल्ट्री फार्मचे मालक सांगतात, आमच्यापासून घाऊक विक्रेते अंडी घेतात. आणि पुढे वाहतूक खर्च पकडुन हे विक्रेते शंभर अंड्यापाठीमागे १६ ते २० रुपये नफा काढतात. तर किरकोळ विक्रेते एका क्रेटवरवर म्हणजे तीस अंड्यावर ४ ते ५ रुपये कमावतात. अशा प्रकारे अंड्यांचे दर ठरतात आणि विक्री होते.

हे देखील वाचा.  ‘या’ दोन वेबसाइट्सनी फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनचा उठवला बाजार; निम्म्यापेक्षा कमी किमतीत विकतायत वस्तू

कोंबडी खतांचr आहेत जबरदस्त फायदे कमी खर्चात भरघोस उत्पन्न वाचा सविस्तर..

शेतकरी पुन्हा दिल्ली बॉर्डरवर; शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलन का पुकारले? वाचा सविस्तर

बाबासाहेब आणि अमिताभ बच्चन चित्रपटात एकाच फ्रेममध्ये का दाखवले? कारण जाणून ठोकाल सलाम..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.