पैशासाठी कुटुंबातील दोन व्यक्तींना गुरांढोरांसारखी मारहाण; शेंकडों जणांची बघ्याची भूमिका, माणूसकीला…
अलिकडच्या काळात आपण पाहतो, रक्ताची नाती देखील संपत्ती समोर फिकी पडताना पाहायला मिळतात. सध्या पैशाला अधिक महत्व आल्याने लोकांना नैतिकता, माणुसकी, संवेदनशीलता याचा काही फरक पडत नसल्याचे दिसून येते. आपण आपल्या आसपास अनेकवेळा पाहिले असेल लोकं संपत्तीसाठी कुठल्याही धरला जाताना. अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे.
आपल्याच नातेवाईकांचा मारहाणीचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जगात माणुसकी काही शिल्लक राहिली आहे की नाही? असं वाटू लागतं. विशेष म्हणजे हा व्हिडिओ पाहण्यासाठी शेकडोंनी गर्दी केली आहे. मात्र ही तुंबळ हाणामारी सोडवताना कोणीही पुढे येताना दिसत नाही. ही तुंबळ हाणामारी सोडवण्यासाठी कोणीही पुढे आले नसल्याने सोशल मीडियावर या लोकांवर रोषही व्यक्त केला गेला. ही घटना ईशान्य दिल्लीतील ‘न्यू उस्मानपूर’ या ठिकाणी घडली आहे.
जुन्या संपत्तीच्या वादावरून दोन कुटुंबांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. व्हायरल झालेल्या या व्हिडिओत चौघे मिळून दोन व्यक्तीला जबर मारहाण करताना पाहायला मिळत आहेत. खाली पडलेल्या दोन व्यक्तींना मारताना या निर्दयी लोकांना यांचं काय होईल? याची कसलीही काळजी नसल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओत चार जण दोघांना मारताना, कडेला शेकडो जनांचं समुदाय फक्त उघड्या डोळ्यांनी बघ्याची भूमिका घेताना दिसून येत आहे.
– incident took place in Northeast Delhi's New Usmanpur area. One accused has been arrested. pic.twitter.com/mMllfvLAVo
— Mahender Singh Manral (@mahendermanral) February 12, 2022
लाथा, काठ्या, पाईप, पट्टे, बुक्क्यांनी मारहाण करतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरल्यानंतर पोलिसांनी याची चौकशी करायला सुरवात केली. पोलिस उपायुक्त संजय सेन यांनी या घटनेची माहिती घेतल्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, आरोपी जगतने ही मारामारी करताना परिसरातील लोकांना घाबरवण्यासाठी भाजपचे फलक आणि वकिलाचे बोर्ड दाखवले. त्याबरोबरच संपत्तीचा असणारा वाद उच्चपदस्थ अधिकारी आणि बार कौन्सिल समोर मांडला जाईल, असं सांगून कुटुंबातील व्यक्तींना देखील धमकावले होते.
जगत हा ६२वर्षाचा आहे. तर हरेंद्र(४१) सुमितचं वय २९ आणि अमित २४ वर्षाचा आहे. हे चारही आरोपी दोघांना मारहाण करताना वायरल झालेल्या व्हिडिओत पाहायला मिळत आहेत. मात्र पोलिसांनी फक्त सुमितलाच अटक केली आहे. यावरू या प्रकरणात राजकारण होत असल्याचे परिसरातील लोकं बोलताना दिसून येत आहेत. दोन्हीं कुटुंबात जुन्या संपत्तीवरून वाद सुरू आहे. यापूर्वीही देखील एकमेकांविरोधात केसेस नोंदवल्या आहेत. अशी माहिती तपासात पुढे आल्याचं, पोलिस उपायुक्त संजय सेन यांनी सांगितले. त्याबरोबरच या घटनेचा अधिक तपासही सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम