महाराष्ट्राची सतत बदनामी केल्यानेच सोमय्याना चोप; “अजूनही सुधारले नाही तर..,” काय म्हणाले संजय राऊत

0

काल किरीट सोमय्या यांना झालेल्या धक्काबुक्कीचं प्रकरणार राज्यात कमालीचं चर्चेत असून आहे. या प्रकरणाचा निषेध करत, विरोधकांनी सरकारला घेरण्याचा पुरेपूर प्रयत्न करायला सुरुवात केली असल्याचे पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पार्टी शिवसेनेवर या प्रकरणामुळे हल्लाबोल करताना पहायला मिळत असली तरी, दुसरीकडे शिवसेना मात्र किरीट सोमय्या यांच्यावर आपल्याच स्टाईलने हल्ला करताना दिसत आहे.

केल्या काही महिन्यांपासून किरीट सोमय्या महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करताना अधिक पाहायला मिळत आहेत. तिकडे किरीट सोमय्या महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत असला तरी, सरकार कडून मात्र या आरोपात काहीही तथ्य नाही. असा पलटवार केला जातोय. किरीट सोमय्या यांनी शेकडो नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत, मात्र एकाचाही आरोप सिद्ध झाला नसल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे.

केंद्रीय यंत्रणा यांना हाताशी धरून किरीट सोमय्या विरोधकांच्या नेत्यांवर बिनबुडाचे आरोप करत सुटलेत. आतापर्यंत किरीट सोमय्या यांनी ज्या ज्या नेत्यांवर आरोप केलेत, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध होऊ शकला नाही. याचा अर्थ किरीट सोमय्या हे फक्त पब्लिक स्टंट करत आहेत. विनाकारण महाराष्ट्राला बदनाम करायचं, विरोधकांना बदनाम करायचं, आणि आपली राजकीय पोळी भाजायची, ही वृत्ती योग्य नसल्याचं शिवसेनेकडून बोलण्यात येत आहे.

केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरून ज्याप्रमाणे अनिल देशमुख यांच्यावर आरोप करत त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. मात्र आता आम्ही अनिल देशमुख यांच्या बाजूला शिवसेनेचे दोन मंत्री बसवणारच अशी यांची बोलायची कशी काय हिंमत होते? महाराष्ट्र सरकारने याकडे विशेष लक्ष देऊन किरीट सोमय्या यावर कठोर कारवाई करावी, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

सामना या वृत्तपत्राच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार हल्ला चढवताना, महाराष्ट्राने बंगाल सरकार सारखं लढायला हवं. असं म्हटलं आहे. ज्याप्रमाणे बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी केंद्रीय यंत्रणांच्या ताब्यातून आपली माणसं सोडवून आणतात, तसेच महाराष्ट्र सरकारने देखील करायला हवं. जर कोणी विनाकारण जनतेला, सरकारला, नेत्याला केंद्रीय यंत्रणांचा दबाव टाकून त्रास होत असेल तर, त्याचे परिणामही भोगावे लागतील. असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना त्यांनी एकप्रकारे भाजपला आव्हानच दिले आहे. आणि इशारा देखील दिल्याचं पाहायला मिळत आहे. जर विनाकारण तुम्ही त्रास देत असाल तर, तुम्हाला अशा पद्धतीने आम्ही उत्तर देऊ. असाही इशारा संजय राऊत यांनी एकप्रकारे दिल्याचे बोलले जात आहे. काल किरीट सोमय्या यांच्या बाबतीत घडलेला प्रकार हा त्याचेच संकेत असल्याचं आता बोललं जाऊ लागलं आहे.

हे वाचलं का?

उद्धव ठाकरे यांनीच माफिया गुंड पाठवून मला मारहाण केली; सोमय्या यांच्या आरोपांमुळे शिवसेनेने दिला ‘हा’ इशारा

राज बावाच्या रुपात भारताला मिळाला नवा कपिल देव; हार्दिक पांड्याच्या जागी भारतीय संघात वर्णी

भाजपनेच ‘आण्णा हजारे’ना आंदोलनासाठी मदत पुरवली; अनेक धक्कादायक खुलाशाने देशात खळबळ

 

 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.