‘राज बावा’च्या रुपात भारताला मिळाला नवा कपिल देव; ‘हार्दिक पांड्या’च्या जागी भारतीय संघात वर्णी

0

भारताच्या अंडर नाईन्टीन क्रिकेट संघाने (under 19 cricket team) पुन्हा एकदा क्रिकेट (cricket) जगात आपला जलवा दाखवत पाचव्यांदा अंडर नाईन्टीन विश्वचषक आपल्या नावावर करत नवा अध्याय रचला आहे. ‘यश धुल’च्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने वेस्टइंडीजमध्ये झालेल्या ‘अंडर नाईन्टीन’ विश्वचषकात जबरदस्त कामगिरी केली. या विश्वचषकात भारत एकाही सामन्यात पराभूत झाला नसल्याने, सर्व स्तरातून या संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

अँटिग्वाच्या ‘सर व्हिव्हियन रिचर्ड्स’ मैदानावर झालेल्या अंडर नाईन्टीन विश्वचषकाच्या अंतीम सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा चार विकेटने धुव्वा उडविला. टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय इंग्लंड संघाने घेतला. मात्र हा निर्णय त्याच्या अंगलट आला. भारताकडून अष्टपैलू मध्यमगती गोलंदाज राज बावाने (raj Bawa) साहेबांचे कंबरडे मोडत भारताला भन्नाट सुरूवात करून दिली. त्याने अवघ्या ३१ धावांत ५ फलंदाजांना तंबूत पाठवले.

अष्टपैलू राज बावाला रवी कुमार याने देखील इंग्लंडच्या चार प्रमुख फलंदाजांना बाद करत चांगली साथ दिली. या अंडर नाईन्टीन विश्वचषकात भारताच्या प्रत्येक खेळाडूचं कमालीचे योगदान राहील्याचे पाहायला मिळाले. भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंनी या विश्वचषकात आपला जलवा दाखवला असून, राज बावाने या सगळ्यांमध्ये विशेष लक्ष आपल्याकडे वेधल्याचे दिसून आले आहे.

भारतीय क्रिकेट संघाला कपिल देव नंतर अजूनपर्यंत जलदगती गोलंदाज ऑलरांउडर मिळाला नाही. भारत कित्येक वर्ष झालं तेज गोलंदाज ऑल राऊंडरच्या शोधात आहे. मात्र अजूनही त्यांना जलदगती गोलंदाज ऑलरांउडर मिळाला नाही. मात्र आता राज बावाने फलंदाजी आणि गोलंदाजीत चमकदार कामगिरी करून दाखवली असल्याने, भारतीय संघाची ही प्रतिक्षा जवळपास संपुष्टात आली असल्याचं बोललं जाऊ लागलं आहे.

राज बावाने या विश्वचषकात ऑल राऊंडर म्हणून जबरदस्त कामगिरी करत सगळ्यांनाच आपल्या नावाची चर्चा करण्यास भाग पाडले आहे. राज बावाच्या रुपात आता भारतीय संघाला नवा कपिल देव मिळाला असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या आहेत. एवढंच नाही तर, अनेक दिग्गज खेळाडूंनी देखील ‘राज बावा’ हा येणाऱ्या काळात ही पोकळी भरून काढण्याच काम नक्कीच करू शकतो. असं म्हटले आहे.

या विश्वचषकात अनेक खेळाडूंची चर्चा होत असली तरी, राज बावाने मात्र, सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधले आहे. अनेकांकडून राज बावा या खेळाडूचे कौतुक होत असल्याने, आता हार्दिक पांड्याच्या निवडीवर टांगती तलवार असल्याचे बोलले जात आहे. पाठीच्या दुखापतीमुळे जवळपास दोन वर्षांपासून हार्दिक पांड्या गोलंदाजी करत नाही. त्यातच त्याच्या फलंदाजीचा फॉर्म देखील गायब झाला असल्याने, हार्दिक पांड्याचा पर्याय म्हणून राज बावाकडे पाहिलं जात असून, लवकरच त्याची भारतीय संघात वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

अंडर नाईन्टीन विश्वचषकात राज बावाने अष्टपैलू म्हणून कमालीची कामगिरी केली आहे. या विश्वचषकात मधल्या क्रमांकावर फलंदाजी करत, त्याने सर्वोच्च धावसंख्या देखील उभारली आहे. या विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध राज बावाने आफ्रिकेच्या चार फलंदाजांना तंबूत पाठवले होते. त्यानंतर युगांडा विरुद्ध मधल्या क्रमांकावर फलंदाजी करत या बहाद्दराने १०८ चेंडूत तब्बल १६५ धावा फटकावल्याचं काम केले.

अंडर नाईन्टीन विश्वचषकात भारताच्या सलामीवीरांनी उत्तम फलंदाजी केल्याने, मधल्या क्रमांकांच्या फलंदाजांना जास्त फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही, त्यामुळे राज बावाला फलंदाजीतून आपला जलवा दाखवण्याची जास्त संधी मिळाली नाही. मात्र या विश्वचषकाच्या फायनलमध्ये देखील राज बावाने अष्टपैलू कामगिरी करत भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला आहे. ३१ धावांत ५ विकेट, आणि नंतर फलंदाजी करताना,३५ धावांची महत्वपूर्ण खेळी राज बावाने करत भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.

धावफलक; इंग्लंड:४४.५ षटकात सर्वबाद १८९ धावा जेम्स रीव ११६ चेंडूत ९५ धावा  भारत: ४७.४ षटकात ६ बाद १९५ धावा (शेख राशीद ५० धावा,निशांत सिंधू नाबाद ५० धावा, राज बावा ५ विकेट, रवी कुमार ४विकेट.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.