उद्धव ठाकरे यांनीच माफिया गुंड पाठवून मला मारहाण केली; सोमय्या यांच्या आरोपांमुळे शिवसेनेने दिला ‘हा’ इशारा

0

काल किरीट सोमय्या पालिका आयुक्तांना भेटण्यासाठी महानगरपालिकेत जात असताना काही शिवसैनिकांमध्ये आणि त्यांच्यात राडा झाला. या धक्काबुक्कीत किरीट सोमय्या पायरीवरून खाली पडले आणि यात त्यांना दुखापत झाल्याची दुर्दैवी घटना घडली. किरीट सोमय्या यांच्या सोबत घडलेल्या प्रकाराचे पडसाद राज्यभर उमटले असून, आता भारतीय जनता पार्टी अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून किरीट सोमय्या महा विकास आघाडी नेत्यांच्या पाठीमागे हात धुऊन लागलेल्याने चांगलेच चर्चेत आहेत. अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर किरीट सोमय्या यांनी आपला ताफा अनिल परब आणि शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्याकडे वळवला. किरीट सोमय्या शिवसेनेवर सतत टीका करत असल्याने, शिवसैनिक अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते.

महाविकास आघाडीच्या नेत्यांवर खासकरून शिवसेनेवर किरीट सोमय्या सतत हल्लाबोल करत असल्याने याचा शिवसैनिकांच्यामनात राग होता. आणि त्याच्याच पार्श्वभूमीमुळे किरीट सोमय्यावर पुण्यात शिवसैनिकांनी हल्ला केला. असं विरोधकांकडून बोलण्यात येत आहे. भारतीय जनता पार्टीच्या काही महत्वाच्या नेत्यांनी तर या हल्ल्यात मुख्यमंत्री यांचाच हात असल्याचं म्हटलं आहे. मात्र आता किरीट सोमय्या यांनी देखील हा हल्ला उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्यानेच झाला असल्याचं म्हटलं आहे.

संचेती हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी किरीट सोमय्या यांना डिस्चार्ज दिल्याल्यानंतर किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसैनिकांचा माफियासेना असा उल्लेख केला. एवढंच नाहीतर किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे हे माफिया सेनेचे प्रमुख आहेत. आणि त्यांच्या सांगण्यावरूनच माफिया सेनेच्या गुंडांनी माझ्यावर हल्ला केला असल्याचा, घणाघात देखील किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जम्बो कोव्हीड सेंटरमध्ये झालेल्या शंभर कोटी रुपयांचा भ्रष्टाचार मी बाहेर काढला, आणि त्याची तक्रार करण्यासाठी आयुक्तला भेटण्यासाठी जात असताना, मुद्दाम माझ्यावर हल्ला करण्यात आला. कारण मी जर तक्रार दाखल केली तर, उद्धव ठाकरे यांना उत्तर द्यायला अवघड जाईल. आणि म्हणून त्यांनी त्यांच्या माफिया गुंडांना पाठवून मला जाणून-बुजून मारहाण केली. असं किरीट सोमय्या आज माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले आहेत.

भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत, महाराष्ट्राचा बंगाल या लोकांनी केला आहे. विरोधकांनी बोललंच नाही पाहिजे, अशी यांची भावना आहे. मात्र हे योग्य नसून, लोकशाहीची या लोकांनी हत्या केली आहे. असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. दुसरीकडे पुणे पोलिसांकडून या घटनेची दखल घेतली असून, जो कोणी दोषी असेल, त्याच्यावर कारवाई केली जाईल. असे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा 

“शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांना पालिकेच्या पायरीवरूनच खाली फे..,” सोमय्यांच्या फ्रॅक्चरची चंद्रकांत पाटलांना भिती

 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.