“शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांना पालिकेच्या पायरीवरूनच खाली फे..,” सोमय्यांच्या ‘फ्रॅक्चर’वर दादा म्हणाले…

0

 

भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. विरोधकांच्या अनेक नेत्यांवर वारंवार भ्रष्टाचार आरोप करणारे आणि विरोधकांच्या हिटलिस्टवर असणाऱ्या सोमय्या यांनी आज पुणे जम्बो कोविड सेंटरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला. किरीट सोमय्या पालिकेत आयुक्तांना भेटण्यासाठी आल्यानंतर, शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांची धक्काबुक्की झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

पालीकेत आयुक्ताला भेटण्यासाठी किरीट सोमय्या आल्यानंतर शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते समोरा-समोर आले, आणि शाब्दिक चकमक झाल्यानंतर शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये या झाला. महाविकास आघाडी सरकार आणि नेत्यांवर किरीट सोमय्या गेल्या काही महिन्यांपासून सतत भ्रष्टाचाराचा आरोप करत असल्याचे पहायला मिळत आहे. लग्न राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांना टार्गेट केल्याने त्यांना प्रताप पवार संजय राऊत आणि शिवसेनेकडे वळवण्याचा पाहायला मिळाले.

अनिल परब यांचा रीसॉर्ट बेकायदेशीर असून यात फार मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप त्यांनी यापूर्वी केला होता. आणि आता त्यांनी संजय राऊत यांच्याकडे आपला ताफा वळवल्याचं पाहायला मिळाले. संजय राऊत यांच्या मित्रपरिवाराने जंबो कोव्हीड सेंटरमध्ये एकूण शंभर कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचा, आरोप किरीट सोमय्या यांनी केला. आणि त्याची तक्रार दाखल करण्यासाठी त्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशन गाठलं, असल्याचं कळतंय.

किरीट सोमय्या शिवसेनेवर वारंवार टीका करताना पाहायला मिळत होते, एवढंच नाही तर, शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप देखील केल्याने शिवसैनिक कमालीचे संतापलेचे पाहायला मिळत होते. त्यातच त्यांनी आज शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार केली. आणि त्यानंतर ते पालीकेत आयुक्ताला भेटण्यासाठी गेले असताना, तिथे त्यांची शिवसैनिकांची शाब्दिक चकमक झाली, आणि यातून धक्काबुक्की झाली.

शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहून पोलिसांनी देखील सोमय्या यांना तिथून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, मात्र यामध्ये शिवसैनिकांनी त्यांच्यावर हल्ला केला, आणि यात किरीट सोमय्या यांना धक्का लागला, आणि त्यामुळे ते पालिकेच्या पायरीवरून चक्क खाली पडल्याचे, पाहायला मिळाले. किरीट सोमय्या खाली पडल्यानंतर पुणे पोलिस त्यांना उचलून व्यवस्थित गाडीत बसवून घेऊन गेले.

शिवसैनिकांच्या धक्काबुक्कीत किरीट सोमय्या पायरीवरून खाली पडल्यानंतर पोलिसांनी त्यांना व्यवस्थित उचलून गाडीत बसवले, मात्र सोमय्या गाडीत बसल्यानंतरही शिवसैनिका गाडीवर देखील हल्ला करताना पाहायला मिळाले. सोमय्या पुणे दौऱ्यावर असताना शिवसैनिक आणि त्यांच्यामध्ये झालेला आहे आता राज्याचे राजकारण चांगलेच तापले असून, याचे पडसाद देखील राज्यभर उमटण्याची शक्यता आहे.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, किरीट सोमय्या यांना संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून ,त्यांचं फॅक्चर झालेलं आहे, की नाही हे पाहावे लागेल. लोकशाहीत प्रत्येकाला बोलण्यातचा, प्रदर्शन करण्याचा अधिकार आहे. मारामारी कशाला करता? असा सवाल देखील त्यांनी राज्य सरकारवर उपस्थित केला आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.