नवाब मलिक तुला आम्ही लवकरच बांगड्या, घागरा-चोळी घालून ‘डान्स बार’मध्ये आयटम साँगवर नाचायला लावणार…

0

2 ऑक्टोंबरला कार्डिलिया क्रुझवर छापा टाकत एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला अटक केली आणि देशभर हे प्रकरण गाजल्याच आपण पाहिलं. समीर वानखेडेने केलेल्या मोठ्या कारवाईनंतर, वानखेडे जगभरात ‘हिरो’ म्हणून समोर आले‌. एकीकडे संपूर्ण देश वानखेडेंचं कौतुक करत असतानाच, राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक मात्र, हे प्रकरण फेक असल्याचे बोलत होते.

फक्त आर्यन खान ड्रग्स प्रकरणचं फेक नाही तर, समीर वानखेडे हा माणूस देखील फेक आहे, असं राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटल्याने एकच खळबळ उडाली. त्यातच माध्यमांसमोरून आर्यन खानच्या हाताला पकडून पळवत नेणारा व्यक्ती हा एनसीबीचा अधिकारी नसून, तो फसवणुकीचे अनेक गुन्हे नावावर असणारा ‘किरण गोसावी’ असल्याचं समोर आल्याने, नवाब मलिकांच्या आरोपात तथ्य असल्याचं बोललं जाऊ लागलं.

आपल्या पत्रकार परिषदेतून नवाब मलीकांनी रोज नवनवीन खुलासे केल्याने मलिक त्याकाळी माध्यमांची हेडलाईन बनून राहीले. मालिकांच्या रोज नवनवीन खुलाशामुळे लोकांना देखील आर्यन खान ड्रग्स प्रकरण फेक असल्याचं वाटू लागलं. त्यातच या प्रकरणाचा स्वतंत्र साक्षीदार असणारा प्रभाकर साहिल यांनी पत्रकार परिषदेत घेत शाहरुख खानकडे 25 कोटी रुपयांची मागणी किरण गोसावी यांनी केल्याचा धक्कादायक खुलासा केला.

हे प्रकरण गाजत असतानाच दुसरीकडे पत्रकार परिषदेत समीर वानखडे हा जन्माने मुस्लिम आहे. मात्र नोकरी मिळवण्यासाठी त्यांनी खोटी कागदपत्रे सादर करत आपण दलित असल्याचं सांगितलं, असा धक्कादायक खुलासा मालिकांनी केला. मलिक यांच्या आरोपाला उत्तर देण्यासाठी भारतीय जनता पार्टीशी संबंधित असणाऱ्या लोकांनी पत्रकार परिषदा घेयला सुरूवात केली. यामध्ये सुरुवातीला मोहित कांबोज हे नाव समोर आले.

मोहीम कंबोजने पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांच्या आरोपाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला मात्र, या पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित राहिली असल्याचे पहायला मिळाले. आणि तेव्हापासून मोहीत कंम्बोज आणि नवाब मलिक एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. काल पुन्हा एकदा मोहित कंम्बोज यांनी नवाब मलिक यांच्यावर जहरी टीका केली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांविरोधात भाजपचे नेते किरीट सोमय्या वारंवार भ्रष्टाचाराचे आरोप करताना पाहायला मिळतायत. किरीट सोमय्या यांनी सोमवारी मंत्रालयात जाऊन अधिकाऱ्यांसोबत बसून काही फायली तपासल्या. यावरूच नवाब मलिक यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. एखाद्या चित्रपटात जशी आइटम सॉगची गरज असते, तशीच राजकारणात भाजपला सोमय्याची गरज आहे. गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे.

नवाब मलिकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी मोहित कंपोज पुढे आले, आणि त्यांनी देखील नवाब मलिक यांच्यावर जोरदार टीका केली. आपल्या ट्विटर अकाऊंटवर मोहित कंम्बोज यांनी नवाब मालिक यांच्यावर पातळी सोडून टिका करताना म्हटलं, “मिया नवाब मी तुला बांगड्या पाठवल्यात, किरीट सोमय्या तुम्हाला लवकरच ‘घागरा-चोळी’ घालणार आहेत. यानंतर तुला आम्ही ‘डान्स बार’मध्ये ‘आइटम सॉग’वर वाचवणार आहे” मोहित कंम्बोज यांच्या या टीकेला मलिक आता काय उत्तर देणार आहेत, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.