पुण्यात शिवसेनेला संपवण्याचा डाव राष्ट्रवादीकडून, शिवसैनिकाला गृहमंत्र्याच्या उजवा हात असनाऱ्याकडून जीवे मारण्याची धमकी..

0

शिवसेनेचे दिग्गज नेते, माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी महविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. आढळराव पाटील यांनी गृहमंत्री यांच्या उजवा हात म्हणून ओळख असणाऱ्या कार्यकर्त्यावर गंभीर आरोप केले आहेत. शिवसैनिकाला माझा व्हिडीओ स्टेटसला ठेवला म्हणून संपवून टाकण्याची धमकी देतो, असा आरोप आढळराव पाटलांनी त्या कार्यकर्त्यावर केला आहे.

 

पुढे बोलताना आढळराव पाटील म्हणाले, आमचं पक्षाला एवढंच सांगणं आहे की राज्यामध्ये आघाडी सरकार आहे, तर तुमचं चालू द्या, फक्त आम्हाला जिल्ह्यामध्ये जगू द्या. “याच जिल्ह्यामध्ये वळसे पाटील यांचा उजवा हात असलेल्या कार्यकर्त्याने ४ दिवसापूर्वी माझ्या एका कार्यकर्त्याला माझा व्हिडीओ स्टेटसला ठेवला म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली.

 

तुला गावात राहायचं का, तुला संपवून टाकू अशा प्रकारची धमकी गृहमंत्र्यांचा उजवा हात असलेला कार्यकर्ता करतो आहे. आमचं पक्षाला एवढंच सांगणं आहे की राज्यात आघाडीचं सरकार आहे तर तुमचं चालू द्या, फक्त जिल्ह्यात आम्हाला जगू द्या, आम्हाला मारू नका. आघाडीने याबाबत मित्रपक्षांना सांगावं.” अशी मागणी दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे

 

पुढे बोलताना आढळराव पाटील म्हणाले, आता आम्ही विकास करू द्या, निधी द्या अशा मागण्यादेखील करायच्या सोडून दिल्या आहेत. आम्ही भरवलेली बैलगाडी शर्यत बंद करण्या पाठीमागे काहीच कारण नव्हतं. फक्त शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव यांनी त्यांच्या गावामध्ये बैलगाडी शर्यत भरवली हे त्यांच्या डोळ्यात खुपलं म्हणून त्यांनी स्थगिती दिली.

 

कुणाच्या डोळ्यात खुपतं हे सांगण्याची गरज नाही. संपूर्ण जिल्हा आणि राज्याला हे माहिती आहे,” असंदेखील खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले. शिवसेनेचा खेड तालुक्याचा पंचायत समिती सभापती ६ महिन्यांपासून तुरुंगात सडत आहे. त्याच्यावर नाहक ३०७ चा गुन्हा करण्यात आला आहे. त्यावर डॉक्टरांचे प्रमाणपत्र सुध्दा नाही. त्याला जामीन मिळू नये यासाठी राष्ट्रवादीचे आमदार आणि इतर नेते दबाव टाकत आहेत. असा गंभीर आरोप आढळराव यांनी केला आहे.

 

ही गोष्ट मी माझ्या नेत्यांच्या वेळोवेळी कानावर घातली आहे. त्यांनीही हवी तशी मदत केली. परंतु हे चित्र एका बाजूला आहे. शिवसेनेच्या खेड तालुक्याच्या माझ्या सभापतीने काय घोडं मारलं होतं. त्याच्यावर खोटा गुन्हा का दाखल करण्यात आला. त्याचं संपूर्ण कुटुंब तुरुंगात टाकलं, अशी खंत खासदार आढळराव पाटील यांनी व्यक्त केली आहे.

 

“जिल्हाधिकाऱ्यांनी अगोदरच्या दिवशी हे लिहून द्या, ते लिहून द्या म्हणत गावातील यात्रा कमिटीकडून अनेक कागदपत्रे घेतली. तसेच रात्री माझ्या घरी येऊन बैलगाडी शर्यतीला ५० पेक्षा अधिक माणसं येऊ देणार नाही असं त्यांनी सांगितलं. यावर मी म्हणालो दिवसभरात पुणे जिल्हा बँकेची राष्ट्रवादी काँग्रेसची प्रचारसभा झाली. त्या सभेमध्ये १०,००० लोक हजर होते. ते कसे चालले?” असे देखील आढळराव म्हणाले.

 

आघाडीतील घटक पक्षाकडून आम्हाला पुण्यात संपवण्याचा डाव करू नये, आम्ही तुमच्याकडे, सरकारकडे काही मागत नाही असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उद्देशून ते म्हणाले. आमची कुठलीच मागणी नाही, आम्हाला फक्त शिवसैनिक म्हणून सुखाने जगू द्या. आम्हाला संपवू नका, आम्हाला मारू नका, असेही ते म्हणाले.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.