मोठी बातमी! रुपाली पाटील ठोंबरे यांचा अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश, मिळणार ‘ही’ मोठी जबाबदारी

0

मनसेच्या मर्दानी नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी नुकताच मनसेला रामराम केला आहे. रुपाली पाटील ठोंबरे यांच्या जाण्याने मनसेला मोठा धक्का बसला आहे. पुणे शहरातच नव्हे तर महाराष्ट्रात रुपाली ठोंबरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे मनसेला आता मोठी किंमत चुकवावी लागेल यात काही शंका नाही. कारण पुण्याची मनसे म्हटलं की, वसंत मोरे आणि रुपाली पाटील ठोंबरे ही दोन नाव घेतली जायची.

रुपाली पाटील ठोंबरे यांचे मनसे पक्षातील महत्व वाढत चालल्याने पक्षातील नेत्यांनी त्यांच्यावर राजकीय कुरघोड्या चालू असल्याचे त्यांनी सांगितले होते. मनसे पक्षात महिलांना महत्त्व नसल्याचे देखील त्या बोलल्या होत्या. आपल्याला जाणूनबुजून टार्गेट केलं जातंय असे देखील त्या म्हणाल्या होत्या. त्यांनी राज ठाकरे यांना भेटण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांना भेट मिळाली नव्हती.

त्याचवेळी रुपाली पाटील ठोंबरे या मनसेला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे वृत्त आम्ही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकाशित केले होते आणि तेच वृत्त रुपाली पाटील ठोंबरे यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट करून आपण पक्ष सोडणार नसल्याचे सांगितले होते. आमची बातमी आता खरी ठरली आहे.

आमची एक महिन्यापूर्वीची बातमी: मी मर्दानी स्त्री मी सहन करणार नाही; रूपाली ठोंबरे यांचा राज ठाकरेंना इशारा!राष्ट्रवादीचे घड्याळ बांधणार हाती

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रुपाली पाटील ठोंबरे पक्षप्रवेश करणार आहेत. आज किंवा उद्या अधिकृतपणे पक्षप्रवेश होणार असल्याचे खात्रीशीर माहिती महाराष्ट्र लोकशाही न्युजला मिळाली आहे. स्वतः अजित पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. रुपाली पाटील ठोंबरे यांनी राष्ट्रवादीत यावे असे आव्हान कार्यकर्ते सोशल मीडियावरून करत होते.

रुपाली पाटील ठोंबरे यांना येणाऱ्या पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठी जबाबदारी मिळणार असल्याचे देखील बोलले जात आहे. रुपाली ठोंबरे यांचा राष्ट्रवादीला पुणे महानगरपालिका निवडणुकीत फायदा होईल यात काही शंकाच नाही. निवडणुकीच्या प्रचार कार्यक्रमात त्या स्टार प्रचारक म्हणून देखील पाहायला मिळणार आहेत.

हेही वाचा: मी मर्दानी स्त्री मी सहन करणार नाही; रूपाली ठोंबरे यांचा राज ठाकरेंना इशारा!राष्ट्रवादीचे घड्याळ बांधणार हाती 

मनसेची मर्दानी पक्षातल्या रिकामटेकड्या नेत्यांना पुरून उरेल; कोण आहेत हे रिकामटेकडे नेते? रूपाली ठोंबरे म्हणाल्या.. 

भावाला मतदान करायला आलेल्या माय-लेकरांवर काळाचा घाला; स्थानिक तरुणांनी २०० फुट दरीतून बाहेर काढले मृतदेह 

अचानक लॉकडाऊन करून लाखों मजूरांना पायी चालत प्रवास कराय लावणाऱ्या मोदींवर आज त्यांच्यासोबत जेवायची वेळ का आली? नौटंकी वाचून तुम्हीही घालाल शिव्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.