अचानक लॉकडाऊन करून लाखों मजूरांना पायी चालत प्रवास कराय लावणाऱ्या मोदींवर आज त्यांच्यासोबत जेवायची वेळ का आली? नौटंकी वाचून तुम्हीही घालाल शिव्या

0

नरेंद्र मोदी काल आपल्या मतदार संघात वाराणसी दौऱ्यावर होते. आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नरेंद्र मोदींनी हा दौरा केला असल्याचे बोलले जात आहे. गंगा नदीमध्ये स्नान केल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी काशी विश्वनाथ कॉरिडोअरचं लोकार्पण केलं. काशी विश्वनाथ मंदिराचे नूतनीकरण त्याचबरोबर कॉरिडॉरची उभारणी करणाऱ्या कामगारांसोबत नरेंद्र मोदी यांनी भोजन केल्याने अनेकांनी त्यांना ट्रोल करत लॉकडाऊनमध्ये मजूरांच्या झालेल्या अवस्थेची आठवण करून दिली.

पंजाब, उत्तर प्रदेश, गोवा, मनिपुर उत्तराखंड या पाच राज्यांच्या निवडणुका 2022 मध्ये होणार असल्याने आपापल्या पक्षाने निवडणूक जिंकण्यासाठी जोर लावल्याचं पहिला मिळत आहे. खासकरून पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणूकांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असून, उत्तर प्रदेशमध्ये भाजपापुढे आपली सत्ता राखण्याचे मोठे आव्हान उभं राहिलं असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशमध्ये प्रियंका गांधी सध्या चर्चेत असून, लोकांचा खूप मोठा प्रतिसाद प्रियंका गांधी यांना मिळत असल्याचे दिसून येत आहे.

मै लडकी हूं, सकती हूं! प्रियंका गांधी यांनी दिलेला हा नारा उत्तर प्रदेशमध्ये सध्या प्रचंड गाजत असून, प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश राज्यातून कमालीचा प्रतिसाद मिळत आहे. प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश मधून मिळत असणारा प्रतिसाद पाहून, आता भारतीय जनता पार्टीने देखील आपला जोर लावल्याचे पहायला मिळत आहे. आणि म्हणूनच, नरेंद्र मोदी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सक्रिय झाले असल्याचे बोलले जात आहे.

नरेंद्र मोदी काल वाराणसी दौऱ्यावर होते. पाच लाख चौरस मीटर कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. काशी विश्वनाथ मंदिराचे नूतनीकरण त्याचबरोबर कॉरिडॉरची उभारणी करणाऱ्या कामगारांसोबत त्यांनी भोजन केले, त्याचबरोबर त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. एकीकडे नरेंद्र मोदी यांनी कामगारांचा सन्मान केला, मात्र दुसरीकडे नरेंद्र मोदी यांच्या या कृत्यावर अनेकांनी टीका केली. मार्च २०२०मध्ये नरेंद्र मोदींनी अचानक लॉकडाउन केल्याने लाखो मजुरांना हजारो किलोमीटर चालत प्रवास करावा लागला, यात हजारों मजूर मृत्यूमुखी पडले, याची आठवणही करून दिली.

२५ मार्चला २०२० ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक एकवीस दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला. आपला उदरनिर्वाह करण्यासाठी लाखो मजूर परराज्यात कामानिमित्त स्थलांतरित होत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक लॉकडाउन घोषित केल्याने, मजुरांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. लोकांना आपल्या गावी जाण्यासाठी ट्रेन, बसेस बंद असल्याने हजारो किलोमीटर प्रवास चालत करावा लागला. हॉटेल्स, दुकान बंद असल्याने अनेक जण अन्नपाण्याशिवाय रस्त्यात मृत्युमुखी पडल्याची नोंद देखील झाली.

विदेशात नोकरी करण्यासाठी गेलेल्या अनेक भारतीयांना स्पेशल विमान करून नरेंद्र मोदींनी देशात आणण्याचं काम केलं. मात्र देशभरात काम करणाऱ्या आपल्या मजुरांना आपल्या गावी पोहोचवण्यात नरेंद्र मोदी सरकार अपयशी ठरलं. अपयशी काय तर, त्यांच्याविषयी या सरकारला काहीही वाटलं नाही, ही शोकांतिका देशातल्या अनेक बड्या मंडळींकडून व्यक्त करण्यात आली. मात्र आज उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका जवळ आल्या असताना नरेंद्र मोदी यांना कामगारांचा पुळका आला असल्याची जहरी टीका नरेंद्र मोदी यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळत आहे.

लाखों मजूर हजारो किलोमीटरचे अंतर पायी प्रवास करत होते. प्रवास करता-करता हजारो मजूर रस्त्यात मृत्युमुखी पडत असताना, नरेंद्र मोदी फक्त पाहत होते, त्यांना आपापल्या गावी पोहोचण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नाही. एकीकडे ही वस्तुस्थिती असताना,आता मजूरांसोबत नरेंद्र मोदी जेवण करण्याची नोटंकी आणि त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्याचं नाटक करतायत. केवळ उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही नौटंकी सुरू असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.