तब्बल सहा वर्षांनी रुपालीताई चाकणकर यांची ‘या’ केसमधून निर्दोष मुक्तता

2016 मध्ये भाजप नेत्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे रुपाली चाकणकर यांनी काही तासांतच भाजपविरुध्द आंदोलन केले. त्यावेळी रुपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी त्यांना पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्यात आले होते. आज जवळपास सहा वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला व रुपाली चाकणकर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.

16 वर्षांपासून राजकीय सामाजिक जीवनात काम करत असताना मोर्चे आंदोलने केलीत. आमचा आवाज दाबण्यासाठी सूडबुद्धीने अनेक गुन्हे दाखल झाले. त्यामुळे पोलीस स्टेशन, कोर्टकचेऱ्या या सर्व बाबी नित्याच्याच झालेल्या. दररोजच्या व्यस्त कार्यक्रमातील कोर्टात जाऊन हजेरी लावणे हा एक कार्यक्रम, असे रुपाली चाकणकर म्हणल्या.

पुढे बोलत असताना त्या म्हणाल्या, खटले सगळेच लढत राहिले परंतु 2016 दसऱ्याच्या दिवशी भाजपच्या नेत्यांनी केलेल्या काही बेताल वक्तव्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आंदोलन केले. पक्ष सत्तेत नसल्यामुळे आमच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल झाले. मला पोलिस कस्टडी झाली. मला व माझ्या कुटुंबातील सदस्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. यामुळे माझ्या कुटुंबातील मुलांवर परिणाम होत होता. याची मनाला खंत होती.

परंतु आज तब्बल सहा वर्षांनी या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली. या खडतर प्रसंगात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे माझे कुटुंब, माझे सर्व वकील ॲड. जयश्री काळे पालवे, ॲड. राजाभाऊ सोनावळे, ॲड. राजू शिंदे तसेच माननीय न्यायालयाचे मनापासून आभार अशा शब्दांत आपले कुटुंबीय व वकिलांचे आभार रुपाली चाकणकर यांनी मानले आहेत.

हेही वाचा: महिलांना त्रास देणाऱ्या कंपनीला मनसेचा दणका, मॅनेजरला दिला चोप 

शरद पवारांनी रोहित पवारांना जिल्हा परिषद सदस्य केले पण अध्यक्ष केले नाही पण रामराजेंनी पुतण्याला.. 

पादणं म्हणजे नेमकं असतं तरी काय? त्याला थांबवलं जाऊ शकते का? कशामुळे जास्त वास येतो?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.