IndvsNZ:धक्कादायक..! भारतीय संघात पडले दोन गट; जाणून घ्या रोहितच्या गटात कोणी आणि विराटच्या गटात कोण
IndvsNZ:विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे फॅन फॉलोइंग वेगवेगळी असल्याचे पाहायला मिळते. रोहित शर्माचे फॅन विराट कोहलीला पसंत करत नाहीत,तर विराट कोहलीचे फॅन रोहित शर्माला पसंत करत नाहीत, असं सातत्याने दिसून येताना पाहायला मिळते. 2019 च्या विश्वचषक सामन्यात न्यूझीलंडकडून सेमीफायनलमध्ये भारतीय संघाचा पराभव झाला, आणि विराट रोहित शर्माच्या नात्यात दुरावा निर्माण झाला, असल्याच्या चर्चा रंगू लागल्या.
या पराभवानंतर विराट कोहलीच्या कॅपटन्सीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड कडून भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर, रोहित शर्मा संघासोबत मायदेशी न परतता एकटाच मायदेशी परतला असल्याच्या चर्चा त्यावेळी प्रचंड गाजल्या होत्या. रोहित मायदेशी परतल्यानंतर इंस्टाग्रावर रोहित शर्माने विराटला अनफॉलोही केलं. रोहितने इंस्टाग्रामवर आपल्याला अनफॉलो केले आहे, हे समजताच विराटने देखील रोहितला इंस्टाग्रामवर फॉलो करणं बंद केलं.
एकमेकांनी कमेकांना सोशल मिडियावर फॉलो करणं बंद केल्यानंतर या संबंधीच्या बातम्या माध्यमांमधून प्रचंड गाजल्या होत्या. फक्त रोहित शर्मानीच नाही तर, रोहित शर्माची पत्नी रितिका हिने देखील विराटला इंस्टाग्रामवर अनफॉलो केलं. आणि विराट रोहीत या दोघांमध्ये काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या. दोघांचे चाहते देखील आता एकमेकांना पसंत करताना दिसून येत नाहीत. क्रिकेट संघात आता दोघांचे वेगवेगळे गट पडल्याचे देखील बोलले जात आहे. नुकतेच पाकिस्तानच्या एका लेगस्पिनरने ‘मुस्ताक अहमद’ याने देखील या बाबतीत खुलासा केला आहे.
लेगस्पिनरने मुस्ताक अहमद याने भारतीय संघात दोन गट पडले असल्याचं म्हटलं आहे, एका गटात रोहित शर्मा तर दुसऱ्या गटात विराट कोहली असून, रोहित शर्माच्या गटात काही दिग्गज खेळाडूही आहेत, असंही या महाशयाने म्हटलं आहे. ‘मुस्ताक अहमद’ याने जो काही दावा केलाय हा शंभर टक्के खरा आहे,असं म्हणता येणार नाही, मात्र याकडे दुर्लक्ष देखील करता येणार नाही. कारण असे दोन गट आपल्याला देखील जाणवतात. विराट कोहली मैदानावर अग्रेसिव आणि सतत ऍक्टिव्ह असल्याचे पाहायला मिळते. मात्र हीच परिस्थिती ड्रेसिंग रूममध्ये त्याच्याकडून होताना दिसत नाही.
भारतीय संघातील अनेक खेळाडू विराट कोहलीला आपल्या मनातली गोष्ट सांगण्यासाठी कम्फर्टेबल फिल करत नाहीत. मात्र दुसरीकडे रोहित शर्माला आपल्या मनातली गोष्ट शेअर करताना कोणालाही अडचण जाणवत नाही. असं देखील जाणवतं. संघातल्या प्रत्येक खेळाडूंसाठी रोहित शर्मा हा अवेलेबल असतो. दुसरीकडे विराट कोहली आपल्याच धुंदीत जगताना पाहायला मिळत असल्याने काही खेळाडू नाराज देखील असल्याचं बोललं जातं.
विराट कोहलीच्या गटात मोहम्मद सिराज, के एल राहुल, शार्दुल ठाकुर,रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, असे खेळाडू आहेत. तर रोहीत शर्माच्या गटामध्ये युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, श्रेयश अय्यर, ऋषभ पंत, ईशान किशन,हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार अशी तगडी फळी रोहित शर्माच्या गटात असल्याचं बोललं जातंय. भारतीय संघात जरी दोन गट पडले असले तरी प्रत्येकाचा भारतीय संघाला विजय करायचं हाच माणस असल्यामुळे, याची फारशी चिंता वाटत नाही. मात्र दोन गटामुळे भारतीय क्रिकेटसाठी भविष्यात खूप मोठा धोका असल्याचे देखील बोललं जातंय.
खळबळजनक..! भारतीय संघात पडले दोन गट; टी-ट्वेंटी क्रिकेटमधून विराट कोहली निवृत्ती घेण्याच्या तयारीत
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम