T20 World Cup semi final: शाब्बास रे पट्टयांनो..! कांगारूंनी पाकड्यांना ‘गिळत’ टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारली

T20 World Cup semi final: दुबईमध्ये सुरू असलेल्या टि-ट्वेन्टी विश्वचषकातला दुसरा सेमी फायनल सामना आज आॅस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यामध्ये खेळविण्यात आला. चित्तथरारक लढतील कांगारूने पाकड्यांना गिळत टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. Australia beat Pakistan in semi final 2 सामन्याच्या सुरुवातीपासूनच पाकिस्तान संघाने ऑस्ट्रेलिया संघावर वर्चस्व निर्माण केले होते. मात्र अखेरच्या तीन षटकात मार्कस स्टॉइनिस(Marcus stoinis) आणि मॅथ्यू वेड(Matthew Wade) यांच्या झंझावाती खेळीपुढे पाकड्यांनी नांगी टाकली. कांगारुंनी पाच विकेट राखून आणि एक षटक शिल्लक असतानाच हा सामना जिंकत फायनलमध्ये धडक मारली आहे.

संध्याकाळी दव पडेल या भितीने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. (Aaron finch one the toss and elected to field first) फलंदाजी करण्यासाठी पाकिस्तान संघाचे सलामिवीर बाबर आजम आणि मोहम्मद रिजवान यांनी पाकिस्तान संघाला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी सावध खेळ करत 71 धावांची सलामी दिली. पाकिस्तान संघाने अखेरच्या काही षतकात तुफानी फलंदाजी केली. खास करून फकर जमानने शेवटच्या पंधरा चेंडूत तब्बल ३८ धावा कुटल्या, आणि कांगारुंसमोर १७७ धावांचे मोठे आव्हान ठेवले.

पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिजवान याने पाकिस्तान संघाकडून ५२चेंडूत सर्वाधिक ६७ धावांची खेळी केली. Another One half century by Mohammed Rizwan रिजवानला फकर जमानने ५५धावा करत चांगली साथ दिली. या दोघांच्या जोरावर पाकिस्तान संघाने आॅस्ट्रेलिया समोर १७६ धावांचा डोंगर उभा केला. 177 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरणार्‍या ऑस्ट्रेलियाला पहिल्याच षटकात शाहीन आफ्रिदीने धक्का दिला. कॅप्टन एरॉन फिंचला भोपळाही फोडू न देता आफ्रिदीने पविलियनचा रस्ता दाखवला.

गेल्या काही सामान्यांपासून भन्नाट फॉर्ममध्ये आलेल्या डेव्हिड वॉर्नरने David Warner सामन्याची सूत्रे आपल्या हातात घेत, ऑस्ट्रेलियाच्या डावाला आकार दिला. डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श या दोघांनी 50 धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलिया संघाला या सामन्यात पुन्हा वापसी करून दिली. मिचेल मार्श( Mitchell Marsh)डोकेदुखी ठरत आहे असे वाटत असताना, फिरकीपटू शादाब खानने त्याला आपल्या जाळ्यात अडकवले. आणि कांगारुंना दुसरा धक्का दिला.

मिचेल मार्श आऊट झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघाला गळती लागली,आणि ठराविक अंतराने ऑस्ट्रेलियाचे प्रमुख चार फलंदाज बाद झाले. या सामन्यात पाकिस्तान संघाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित केले. हा सामना पाकिस्तान संघ सहज जिंकून फायनलमध्ये प्रवेश करेल, असं वाटत असतानाच, त्यांच्यासाठी कर्दनकाळ म्हणून मॅथ्यू वेड आणि मार्कस स्टॅइनिस उभे राहिले. या दोघांनी ४६ चेंडूत८१ धावांची अभेद्य भागिदारी करत कांगारूंना फायनलचं तिकीट मिळवून दिलं.

दुबई इंटरनॅशनल क्रिकेट मैदानावर पाकिस्तान संघाचे चाहते मोठ्या प्रमाणात पाकिस्तानला सपोर्ट करण्यासाठी उपस्थित होते. मार्कस स्टोइनिस आणि मॅथ्यू वेड सामना जसजसा पाकिस्तान संघाचा हातातून हिसकावून घेत होते, तस तसे पाकिस्तान संघाच्या चाहत्यांचे चेहरे पाहण्यासारखे होतं होते. साखळी सामन्यात एकही सामना न गमावणाऱ्या पाकिस्तान संघाकडून त्यांच्या चाहत्यांना खूप मोठ्या आशा होत्या. फक्त चाहत्यांनाच नाही, तर क्रिकेट दिग्गजांनी देखील पाकिस्तान संघ फायनल जिंकेल अशी देखील भविष्यवाणी केली होती. मात्र असं काहीही न होता पाकिस्तान संघाला सेमी फायनलमध्येच आपला गाशा गुंडाळावा लागला आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.