INDvNZ: ऋतुराज गायकवाड ‘बॅटिंग’ करताना आई-वडील दोघेही टिव्ही बंद करून का ठेवतात; कारण जाणून वाटेल आश्चर्य

0

सतरा तारखेपासून न्यूझीलंडविरुद्ध होणार्‍या तीन सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी अनेक नवीन खेळाडूला भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खोर्‍याने धावा काढणारा ऋतुराज गायकवाडची देखील या संघात निवड केली आहे. तसं पाहायला गेलं तर, ऋतुराज गायकवाड हा सगळ्यांच्या नजरेत आला तो आयपीएलमुळे.

चेन्नई सुपर किंग संघाकडून खेळताना ऋतुराज गायकवाडने २०२१ या हंगामात सर्वाधिक धावा केल्या. या हंगामात ऋतुराज गायकवाड 635 धावा करत ऑरेंज कॅपचा पुरस्कार देखील मिळवला. गेल्या काही वर्षांपासून आपल्या खेळात सातत्य राखत पुण्यात ऋतुराज गायकवाड ला यश आले आणि त्याचा फायदा त्याला आयपीएल मध्ये देखील झाला आयपीएल तसेच घरेलू क्रिकेटच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर त्याने भारतीय क्रिकेट संघात निवड करण्यास निवड समितीला भाग पाडले.

ऋतुराज गायकवाडने विरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी झाली त्याची निवड झाली असली तरी इथर्यंतचा त्याचा प्रवास खरोखरच कौतुकास्पद आहे. ऋतुराज गायकवाड तीन वर्षाचा होता तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला प्लास्टिक ची बॅट स्टंप आणि एक चेंडू आणून दिला होता. लहानपणीच तीन वर्षाचा असताना तो चेंडू बॅटने मारण्यात खूप मग्न राहायचा. बॅटिंग करताना त्याचा एका प्रॉपर बॅट्समन सारखा फूट-वर्क निघायचा हे त्याच्या वडिलांनी पाहिलं. वडिलांना क्रिकेटची आवड असल्यामुळे त्यांनी ऋतुराजमध्ये बॅटिंगचे गुण आहेत हे ओळखलं.

पासून ऋतुराज गायकवाडच्या वडिलांनी त्याची घरीच वेळ मिळेल तशी प्रॅक्टिस करून घेतली. दशरथ गायकवाड हे ऋतुराज गायकवाड याच्या वडिलांचे नाव. ऋतुराज क्रिकेटर बनवण्यात दशरथ गायकवाड यांचा खूप मोठा रोल आहे. सुरुवातीला घरच्या वातावरणातच ऋतुराज गायकवाड यांची प्रॅक्टिस दशरथ गायकवाड यांनी करून घेतली. राज गायकवाड मोठा झाल्यानंतर साधारण चौदा पंधरा वर्षाचा नंतर पुण्यात कोंढवा येथील दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी मध्ये ऋतुराज गायकवाडला प्रॅक्टिस करण्यासाठी पाठवण्यात आलं.

दिलीप वेंगसरकर यांच्या अकॅडमीमध्ये ऋतुराज गायकवाडला आपला फिटनेस संबंधी, त्याच बरोबर बॅटिंगचे नवनवीन धडे, शिकण्यासाठी खूप मोठा फायदा त्याला झाला. तो भारतीय संघासाठी आयपीएल मध्ये कधी खेळलास आम्ही कधीही विचार केला नव्हता,आणि फक्त वर्तमानात जास्त भर देण्यात व्यस्त होतो. तो देखील कधी आपण भारतीय क्रिकेट संघात खेळण्याचे स्वप्न बाळगून होता. आपल्या प्रोसेस वर फोकस करणारा हाच सुरूवातीपासून त्याचा माणूस राहिला आणि कदाचित याचा त्याला मोठा फायदा झाला, असं त्याच्या वडिलांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं.

कोणत्याही टूर वरून किंवा क्लब क्रिकेट खेळून ऋतुराज घरी आला तर, अगदी तो नॉर्मल वावरतो. खास करून त्याच्या आईच्या हातचं जेवण त्याला खूप आवडतं. त्याची आई, त्याच्या डाईट विषयी नेहमी काळजी करत असते. आणि प्रोटीन युक्त जेवण त्याला देण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते. ऋतुराज गायकवाड हा नेहमी बाहेरच्या खाण्यापेक्षा घरचे आईच्या हातचे बनवलेलं जेवण खाण्यास प्राधान्य देतो.

ऋतुराज बॅटिंग करताना आम्ही खूप तणावात असतो. त्यामुळे त्याची आई तर, त्याचे अर्धशतक झाल्यानंतरच त्याची बॅटिंग पाहते. किंवा मग प्रेझेंटेशनमध्ये त्याला पाहते. सुरुवातीची काही षटके आम्ही टीव्ही बंद करून ठेवतो. आम्ही खूप कमी त्याची बॅटिंग पाहतो. विशेष म्हणजे ऋतुराज गायकवाडची आई ऋतुराज गायकवाड प्रत्यक्ष मैदानावर खेळताना कधीही पाहिला गेलेली नाही. असंही त्याचे वडील दशरथ गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.