खळबळजनक..! भारतीय संघात पडले दोन गट; टी-ट्वेंटी क्रिकेटमधून विराट कोहली निवृत्ती घेण्याच्या तयारीत

0

२०१९ विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड संघाकडून  भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. आणि तेव्हापासून विराट कोहलीचा कर्णधार पदावर शंका उपस्थित व्हायला सुरुवात झाली. फलंदाजीचा क्रम वेड्यासारखा बदलल्यामुळे भारतीय संघाचा न्यूझीलंड कडून पराभूत झाला, असल्याचं त्याकाळी बोललं गेलं. सलामीचे सुरुवातीचे प्रमुख फलंदाज झटपट बाद होत असताना देखील खेळपट्टीवर टिकून राहण्यासाठी मातब्बर समजला जाणारा धोनी सातव्या क्रमांकासाठी फलंदाजीसाठी आला. आणि मोठा वादंग निर्माण झाला.

२०१९ विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंड संघाने ठेवलेले २४० धावांचे आव्हान देखील, भारतीय संघाला पेलू शकले नाही. चौथ्या क्रमांकासाठी दोन वर्ष अनेक खेळाडूंना संधी देऊन देखील कोहली आणि रवी शास्त्री चौथ्या क्रमांकाचा फलंदाज वर्ल्ड कप झाला तरी फिक्स करू शकले नाहीत. अनेक महिने अंबाती रायडूवर इनव्हेस्टमेंट केली, तो चांगला लयत देखील होता. मात्र वर्ल्डकप संघाच्या निवडीवेळी त्याला अचानक डच्चू देण्यात आला, आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

असे अनेक निर्णय विराट कोहलीच्या विरोधात गेले. त्याचबरोबर भारतीय संघ न्यूझीलंडकडून सेमी फायनलमध्ये पराभूत झाला. आणि विराट कोहलीच्या कॅप्टनसीचा विषय अधिक ज्वलंत झाला. संघ निवडीवरुन विराट कोहलीला सातत्याने ट्रोल केलं जायचं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये देखील भारतीय संघ योग्य पद्धतीने निवडला गेला नसल्याचं बोललं गेलं.  भारतीय संघाला पुरेशी प्रॅक्टिस मिळाली नसल्याने हा पराभव झाला. असं विराट कोहलीकडून सांगण्यात आलं. त्यानंतर आता टी-ट्वेंटी विश्वचषकामध्येही भारतीय संघाला सुरुवातीच्या दोन सामन्यात पराभव पत्करावा लागला. आणि भारतीय संघ साखळीतच गारद झाला.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाचा पराभव झाला, तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने विराट कोहलीच्या कॅप्टन्सीवर अनेक दिग्गजांनी देखील प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली. भारतीय संघाने जर टी-20 विश्‍वचषक जिंकला नाही तर, विराट कोहलीला व्हाईट बॉल क्रिकेट फॉर्मेटच्या कॅप्टन पदावरून पायउतार व्हावे लागणार असल्याच्या बातम्या देखील झळकल्या होत्या. या सगळ्यांचा दबाव म्हणून की काय, विराट कोहलीने विश्वचषक सुरू होण्यापूर्वीच टी-ट्वेंटी विश्वचषकानंतर आपण कर्णधार पदाचा राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं.

न्यूझीलंड संघाविरुद्ध होणाऱ्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी विराटला विश्रांती देण्यात आली असून, आता अधिकृतरित्या टी२० संघाचा कर्णधार रोहित शर्मा असणार असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. t20 क्रिकेटमध्ये फलंदाज म्हणून खेळत राहणार असल्याचं स्पष्ट असले तरी, आता पाकिस्तान संघाचा माजी फिरकीपटू याने एक खळबळजनक दावा केला आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रूमचे वातावरण ठीक नाही. भारतीय संघात दोन ग्रुप पडले असल्याचा देखील दावा लेगस्पिनर ‘मुस्ताक अहमद’ यांनी केला आहे.

लेगस्पिनर मुस्ताक अहमद यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये सगळं काही आलबेल आहे असं नाही. सध्याचे वातावरण खराब आहे. या टिममध्ये दोन ग्रुप पडलेले आहेत. आणि म्हणून विराट कोहली लवकरच टी-20 क्रिकेटमधून संन्यास घेण्याची शक्यता आहे. मात्र विराट आयपीएल खेळत राहील असे देखील त्यांनी म्हटलं आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.