Virat Kohli ला घरी पाठवून ‘या’ खेळाडूला दिलीय संधी, झाला असता CA परंतु आला क्रिकेटमध्ये; आता म्हणतोय..

0

मुंबई| T-20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup) भारतच्या खराब कामगिरीमुळे भारतीय क्रिकेट संघात (Team India) मोठे बदल करण्यात आले. टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T-20 World Cup) खेळलेल्या तब्बल 9 खेळाडूंची न्यूझीलंडविरुद्धच्या (India vs New Zealand) T-20 सीरिजमध्ये निवड केली नाही, 9 जणांपैकी काही जणांना विश्रांती देण्यात आली आहे.

तर काही खेळाडूंची निवडच केली नाही. विराट कोहलीने (Virat Kohli) कॅप्टन्सीचा राजीनामा दिल्याने रोहित शर्मा (Rohit Sharma) आता टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. आता विराट कोहलीला  T-20 सीरिजसाठी विश्रांती दिली आहे. विराटसह जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा, मोहम्मद आणि शार्दुल ठाकूर या खेळाडूंना सुध्दा आराम देण्यात आला आहे. तर हार्दिक पांड्या, वरुण चक्रवर्ती आणि राहुल चहर या खेळाडूंची टीममधून हकालपट्टी करण्यात आली आहे.

वरील सर्व खेळाडूंना डावलून IPL मध्ये धमाकेदार कामगिरी केलेल्या एका नवख्या खेळाडूला T-20 सीरिजमध्ये संधी देण्यात आली आहे. आता ऑलराऊंडर व्यंकटेश अय्यरला (Venkatesh Iyer) टीम इंडियात दाखल करून घेतले आहे. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) जागेवर आता व्यंकटेशला संधी देण्यात आली आहे. IPL 2021 मध्ये व्यंकटेश अय्यरने चांगली कामगिरी केलेली आपण पाहिलीच असेल.

IPL 2021 मध्ये केकेआर संघाला (KKR) IPL फायनलपर्यंत घेऊन जाण्यात व्यंकटेश अय्यर याचा मोलाचा वाटा होता. त्याने IPL 2021 च्या हंगामात KKR संघाकडून खेळत असताना 10 सामन्यात 370 रन केले आणि 3 विकेट मिळवल्या होत्या. त्याचेच फळ म्हणून अय्यरला भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. त्याच्याकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे. T-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाने निराशाजनक कामगिरी केल्याने आता तरी योग्य कामगिरी करणे गरजेचे आहे.

आता आपण व्यंकटेश अय्यर याची पार्श्वभूमी जाणून घेऊया. त्याने सीए (CA) आणि बीकॉम (B.com) साठी प्रवेश देखील घेतला होता. 2016 मध्ये व्यंकटेश ने इंटरमीडिएट परीक्षेत सुध्दा चमकदार यश मिळवले होते. त्यावेळी त्याच्याकडे क्रिकेट किंवा CA यापैकी एकच पर्याय होता. कारण तो दोन्ही क्षेत्रात पारंगत होता. परंतु हे दोन्ही एकत्र करणं एवढं सोपं नव्हतं. मग त्याने क्रिकेटला आपलंसं केलं. CA हा पर्याय त्याने काढून टाकला.

त्याने मध्य प्रदेशच्या सीनियर टीमकडून T-20 आणि वनडे टीममधून पदार्पण केले. त्याला अंडर-23 टीमचे नेतृत्व करण्याची संधी सुध्दा देण्यात आली होती. ‘मी CA सोडून MBA फायनान्स करण्याचा निर्णय घेतला. एन्ट्रन्स परीक्षेत मला चांगले गुणदेखील मिळाले होते. मला चांगल्या कॉलेजमध्ये MBA फायनान्स साठी प्रवेश मिळाला होता.

मला शिकवणारे माझे शिक्षक चांगले होते आणि त्यांना क्रिकेटची खूप आवड होती. मी क्रिकेट उत्तम खेळतो हे त्यांना माहीत झाले व त्यांनी पाहिले सुध्दा, त्यामुळे त्यांनी मला लेक्चरला गैरहजर राहायला परवानगी दिली, त्यांनी मला नोट्सही दिल्या,’ अशी प्रतिक्रिया व्यंकटेश अय्यर याने दिली आहे. ‘मी घरामध्ये पुस्तकांमध्येच असायचो, तेव्हा आई मला बाहेर खेळायला पाठवायची. मी क्रिकेटपटू नसतो तर आयआयटी किंवा आयआयएमध्ये असतो. 2018 मध्ये मला बँगलोर येेथे नोकरी सुुुध्दा मिळाली होती, परंतु क्रिकेटसाठी मी ती नोकरी सोडली असे देखील तो म्हणाला.

हेही वाचा: T20 Squad: विराट कोहलीच्या पर्वाचा अस्त, रोहित शर्मा पर्व आजपासून सुरू; न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत या पाच नवीन खेळाडूंना संधी

Sourav Ganguly: वर्ल्डकप नंतर विराटची होणार उचलबांगडी; केएल राहुल टी-ट्वेंटी तर रोहित वनडेचा कर्णधार बीसीसीआयने केले स्पष्ट 

Video: हे वेस्ट इंडीजवाले पण ना काय करतील याचा काय नेम नाही! विकेट घेतल्यानंतर थेट बॅट्समनच्याच उरावर जाऊन बसला ख्रिस गेल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.