T20 Squad: विराट कोहलीच्या पर्वाचा अस्त, रोहित शर्मा ‘पर्व’ आजपासून सुरू; न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत ‘या’ पाच नवीन खेळाडूंना संधी

दुबईमध्ये सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकाची प्रमुख दावेदार म्हणून भारतीय टीम कडे पाहिलं गेलं. दुबईमध्ये आयपीएल झाल्यामुळे याचा फायदा भारतीय संघाला होऊ शकतो असं अनेकांचं म्हणणं होतं. मात्र भारतीय टीम सेमीफायनलमध्ये देखील पोहोचू शकली नाही. वर्षानुवर्ष विश्वचषकात पाकिस्तान संघाला धुळ चालणाऱ्या भारतीय संघाला पाकिस्तान संघाकडून देखील पराभवाचा सामना करावा लागला.

विश्वचषकानंतर सतरा तारखेपासून तीन t20 आणि एक कसोटी सामन्याची मालिका न्यूझीलंड बरोबर भारत मायदेशात खेळणार आहे. टी-20 मालिकेसाठी नुकताच भारतीय संघ जाहीर झाला असून, यामध्ये काही खेळाडूंना डच्चू तर आयपीएल आणि सय्यद मुस्ताक अली ट्रॉफी मध्ये जबरदस्त प्रदर्शन करणाऱ्या पाच नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती देखील देण्यात आली आहे. यामध्ये भारताचा माजी टी-२० कर्णधार विराट कोहली,जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, या खेळाडुंचा सामावेश आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून विराट कोहली नंतर t20 संघाचा कर्णधार कोण असेल? याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना लागून राहिली होती आता ही उत्सुकता संपुष्टात आली असून t20 संघाचा कर्णधार रोहित शर्मा, तर उपकर्णधार केएल राहुल असणार असल्याचे निवड समितीने स्पष्ट केले आहे. निवड समितीने निवडलेल्या या संघात आयपीएल आणि घरेलू क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पाच नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

आयपीएलमध्ये चेन्नई संघाकडून सलामिवीरा ची भूमिका उत्कृष्टरित्या पार पाडणाऱ्या, आणि त्यानंतर सय्यद मुस्ताक अली ट्रॉफीमध्ये काही भन्नाट इनिंग खेळणाऱ्या पुण्याच्या ऋतुराज गायकवाडचीही ओपनर म्हणून निवड करण्यात आली आहे. गायकवाड बरोबर, आयपीएल त्याचबरोबर घरेलू क्रिकेटमध्ये जबरदस्त गोलंदाजी करणार्‍या हर्षद पटेलची देखील निवड करण्यात आली आहे. t20 विश्वचषकासाठी युजवेंद्र चहलच्या जागी राहुल चहरला, निवड समितीने पसंती दर्शवली होती. आता ही चुक त्याच्या लक्षात आली, आणि आता त्यांनी चहरच्या जागी चहला संधी दिली आहे.

आणि क्रिकेट चाहत्यांच्या नजरा हार्दिक पांड्याच्या निवडीकडे होती. मात्र गेल्या काही महिन्यांपासून खराब फॉर्ममध्ये असणाऱ्या आणि पाठीच्या दुखापतीमुळे गोलंदाजी देखील न करणाऱ्या हार्दिक पांड्याला अखेर डच्चू देण्यात आला असून, त्याचा जागी आॅलराऊडर म्हणून व्यंकटेश अय्यरला संधी देण्यात आली आहे. नाव फारसं कोणाला माहिती नव्हतं मात्र नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये त्याचबरोबर सय्यद मुस्ताक अली ट्रॉफी मध्ये देखील त्याने आपल्या टॅलेंटची जादू दाखवली. आणि याचा फायदा त्याला झाल्याचं दिसून आलं.

भुवनेश्वर कुमारला t20 संघातून डच्‍चू मिळेल अशी अपेक्षा सगळ्यांना होती मात्र भुवनेश्वर कुमारला एक शेवटची संधी देण्यात आली असल्याचं समजतं. सतरा तारखेपासून न्यूझीलंड विरुद्ध या मालिकेला सुरुवात होणार असून, कर्णधार रोहित शर्मा आणि द वॉल म्हणून जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली हा संघ कशी कामगिरी करतो हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

न्यूझीलंडविरुद्ध होणार्‍या तिन टी-20 मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ- रोहीत शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (व्हायस कॅ), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर , सूर्यकुमार यादव ,रिषभ पंत (विकेट किपर), इशान किशन (विकेट किपर), व्यंकटेश अय्यर,युजवेंद्र चहल ,आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार दीपक चहर,  हर्षल पटेल, मोहम्मद सिराज

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.