रायगड शहर पोलीस भरतीमध्ये अजय होळकर यांना यश, 150 पैकी तब्बल 124 गुण मिळवून प्रथम क्रमांक

0

2019 साली जाहीर झालेल्या रायगड शहर पोलीस दलाच्या परीक्षेमध्ये अजय होळकर यांना यश आले आहे. अजय संजय होळकर यांनी 150 पैकी 124 गुण मिळवत ओबीसी मधून प्रथम क्रमांक मिळवला आहे. 2019 साली जाहीर झालेल्या भरतीची पुढील कार्यवाही कोरोना महामारीमुळे लांबणीवर पडली व 2 दिवसांपूर्वी शारिरीक चाचणी परीक्षा देखील पार पडली.

2017, 2018 या वर्षी देखील अजित यांनी महाराष्ट्र पोलीस भरतीचे पेपर दिले होते. परंतु या दोन्ही वेळा अजित यांना अपयश आले. 2019 साली मागवण्यात आलेल्या रायगड शहर पोलीस भरतीमध्ये अजय संजय उर्फ बाबा होळकर यांनी 150 पैकी तब्बल 124 गुण मिळवून OBC मधून पहिला क्रमांक पटकावला आहे. या अगोदर महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये दोन वेळा अपयश येऊन देखील अजय यांनी न खचता हे यश मिळवले आहे व आपल्या आईवडिलांची इच्छा पूर्ण केली आहे.

अजय होळकर यांनी आपले प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा होळ येथे घेतले. तेथील शिक्षण पूर्ण केल्यावर सोरटेवाडी (ता.बारामती) येथे पुढील शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर सोमेश्वर येथे सायन्स शाखेतून 12वी पास झाल्यानंतर अजय यांनी डिप्लोमा मेकॅनिकलला प्रवेश घेतला. परंतु तिथे अजित यांचे मन न रमल्यामुळे अजित यांनी BA ला प्रवेश घेऊन भरतीचा अभ्यास चालू केला. सोमेश्वर (ता. बारामती) येथील स्वामी विवेकानंद अभ्यासिकेत प्रवेश घेऊन अभ्यासाला सुरुवात केली.

अजय होळकर यांनी मिळवलेल्या यशामुळे त्याच्या कुटुंबियांमध्ये, त्यांचे मार्गदर्शक व मित्रपरिवारात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. “विश्वासास पात्र ठरलात मनापासून आनंद आणि अभिमान” अशी शाबासकीची थाप त्यांचे मार्गदर्शक गणेश सावंत सर यांनी दिली आहे. “माझ्या पोरानी माझं स्वप्न आज पूर्ण केलं. माझ्या गावात, समाजात माझी मान उंचावली”, अशा शब्दांत अजय होळकर यांच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजय होळकर हे गेल्या ३.५ ते ४ वर्षापासून भरतीचा अभ्यास  करत आहेत. या अगोदर त्यांनी बऱ्याचदा भरतीसाठी प्रयत्न केले आहेत. अनेकदा अपयश आले, त्यात कितीतरी दिवस झाले भरती जाहीर होत नाही. त्यामुळे अनेकदा मनस्ताप सहन करावा लागला. परंतु मनाला सांगत होतो की होईल सर्व ठीक. स्वतःच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करत राहिलो. अशी प्रतिक्रिया अजितने दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत सर्वाधिक मते मिळवलेले संचालक सुनिल भगत यांचा राजकीय प्रवा

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात नव्या पात्राची एन्ट्री प्रसिद्ध हॅकर मनीष भंगाळेच्या दाव्याने देशच हादरून गेलाय 

आर्यन खान ड्रग्स प्रकरणातलं पहिलं पात्र पुणे पोलिसांच्या अटकेत; मुख्य सुत्रधाराचा चेहरा येणार समोर 

 ज्ञानदेवाला लाडाने दाऊद म्हणण्या इतका महाराष्ट्र पुरोगामी होता; कुठे नेवून ठेवलाय हा महाराष्ट्र माझा 

Tata समूहाचा इतिहास आणि भारताच्या विकासात असणारे त्याचे योगदान वाचून,तुम्ही अक्षरशः वेडे व्हाल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.