आपल्या चौकशीकरून जनतेची नजर हटवण्यासाठीच स्वतः शरद पवार यांनी सोडलेले पिल्लू म्हणजे नवाब मलिक

0

कार्डिलिया ‘क्रुझवर एनसीबीने छापा टाकत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अटक केली. काही दिवसांपूर्वी प्रभाकर साईल याने काही धक्कादायक खुलासे केल्यानंतर या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. एनसीबीचा कोणताही अधिकारी नसताना, किरण गोसावी आर्यन खानच्या हाताला पडून एनसीबीच्या ऑफिसला का घेऊन जात आहेत? या प्रकरणाशी कसलाही संबंध नसणारा सॅम डिसूझा एनसीबी कार्यालयात आर्यन खान सोबत का आहे? अशा अनेक प्रश्नांमुळे समीर वानखेडे वादाच्या भोवऱ्यात सापडले.

आर्यन खानला द्राक्ष प्रकरणात अटक केल्यापासूनच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे प्रकरण फेक असल्याचा आरोप समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने करत होते. मात्र राजकारणाशी संबंधित असल्यामुळे त्यांच्या या आरोपाला फारसं गांभीर्याने घेतले गेले नाही. नंतर या प्रकरणाचा स्वतंत्र साक्षीदार असणारा प्रभाकर साईल याने आठ कोटी रुपये समीर वानखेडे यांना मिळणार त्याचा खळबळजनक आरोप केल्यानंतर नवाब मलिक यांनी केलेल्या सर्व आरोपांना महत्व प्राप्त झालं.

मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आरोप करण्याची एकही संधी सोडली नाही. नाव मलिक यांनी समीर वानखेडे यांनी खोटं जात प्रमाणपत्र सादर करत नोकरी मिळत असल्याचा धक्कादायक खुलासा केला होता. समीर वानखेडे यांचं नाव समीर ‘दाऊदच असल्याचं जात प्रमाणपत्र त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर देखील केलं होतं. तर समीर वानखेडे पहिले लग्न एका मुस्लीम मुलीशी मुस्लिम पद्धतीने झाल्याचं सांगितलं होतं.

नवाब मलिक रोजच नवनवीन खुलासे करत असल्यामुळे, आता या प्रकरणात सदाभाऊ खोत यांनी उडी घेतली असून, नवाब मलिकसह राष्ट्रवादींच्या बड्य नेत्यांवर नाव न घेता, सदाभाऊ खोत यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. माजी मंत्री आणि भाजपचे नेतेसदाभाऊ खोत हे यांनी नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप करत अजित पवार आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधल्याचे दिसून येत आहे.

भाजपचे नेते किरीट सोमय्या हे गेल्या काही दिवसांपासून सहकारी साखर कारखान्याच्या भ्रष्टाचाराचे आरोप करत असून त्या संदर्भातले काही पुरावे देखील सोशल मीडियावर शेअर करत असल्याचे, पाहायला मिळाले होते. एवढंच नाही तर, अजित पवार यांच्या बहिणीवर देखील जरंडेश्वर साखर कारखाना भ्रष्टाचारावरून त्यांनी निशाणा साधला होता. याचाच संदर्भ सोडत माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी नवाब मलिक यांना टार्गेट करत शरद पवार यांच्यावर देखील अप्रत्यक्ष टीका केली आहे.

नवाब च्या नादाला लागून काकांचे घोटाळे बाजूला राहणार नाहीत याची काळजी घ्या. काकांच्या घोटाळ्यावरून जनतेचे लक्ष विचलित होण्यासाठी काकांनीच सोडलेले पिल्लू म्हणजे, नवाब मलिक असल्याचा घणाघात सदाभाऊ खोत यांनी केला आहे. त्यांनी हा घणाघात अप्रत्यक्ष राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरच केला असल्याने आता या प्रकरणावरून नवा वाद होण्याची शक्यता आहे. सदाभाऊ खोत शरद पवार यांच्यावर सातत्याने टीका करताना पाहायला मिळते. आज पुन्हा एकदा त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केल्यामुळे त्यांच्या या ट्विटची राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्याच पाहायला मिळत आहे. सदाभाऊ खोत यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादीत काय प्रत्युत्तर देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा-Aryan Khan Drug Case: ज्ञानदेवाला लाडाने दाऊद म्हणण्या इतका महाराष्ट्र पुरोगामी होता; कुठे नेवून ठेवलाय हा महाराष्ट्र माझा

कुठे लपून बसलाय, सॅम डिसोझा? त्याच्यावर कारवाई का होत नाही? आर्यन खानच्या २५ कोटी रुपयांच्या मधील कथीत नाव गायब;

नवाब मलिक यांचा दावा ठरला खरा; समीर वानखेडेंचे खरे नाव समीर  दाऊदच

काही दिवसांपूर्वी हिरो म्हणून जगासमोर आलेल्या समीर वानखेडेंकडे आज व्हीलेन  म्हणून का पाहिलं जातंय?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.