Aryan Khan Bail | आर्यन खानची सुनावणी उद्यावर का ढकलली? वकील मुकूल रोहतगी म्हणाले..

0

मुंबई| बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यनच्या (Aryan Khan) जामीन अर्जावर सुनावणी घेण्यात आली. आजच्या (Aryan Khan Bail) सुनावणीला कोर्टाने स्थगिती दिली आहे. उद्या बुधवार पुन्हा एकदा आर्यन खानच्या जामीन अर्जावर दुपारी सुनावणी घेण्यात येणार आहे. आजच्या सुनावणीमध्ये फक्त आर्यन खानचे वकील मुकूल रोहतगी (Mukul Rohatgi) यांनी आर्यनची बाजू मांडली. उद्या 27 ऑक्टोबरला दुसऱ्या बाजूने युक्तिवाद होणार आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबई येथे ‘क्रूझ ड्रग्ज’ पार्टी प्रकरणात आर्यन खानवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या दोन दिवसांपासून या प्रकरणाने वेगळेच वळण घेतल्याचे पाहायला मिळत आहे. सत्र न्यायालयाने आर्यन खानचा जामीन दोन वेळा फेटाळल्यानंतर आर्यन खानच्या वकीलांनी, मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन २० ऑक्टोबरला जामीन अर्च दाखल केला होता. आज त्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यात आली.  मुकूल रोहतगी यांनी आर्यनची बाजू मांडत मुंबई उच्च न्यायालयात युक्तिवाद चालवला.

आज मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खानचे वकील रोहतगी यांनी जवळपास एक तास युक्तिवाद चालवला. मुकुल रोहतगी यांचा युक्तिवाद संपल्यानंतर, अर्बाज मर्चंट यांच्या वकीलांनी काही वेळ युक्तिवाद चालवला. त्यानंतर न्यायालयाने त्यांना आणखी किती वेळ युक्तिवाद चालेल? असं विचारलं. त्याचबरोबर सरकारी पक्षाला देखील युक्तिवादाला किती वेळ लागेल अशी विचारणा करण्यात आली. अर्बाज मर्चंटचे वकिल आणि सरकारी पक्षाने आम्हाला युक्तिवादाला  ४०ते४५ मिनटे लागतील असे सांगितले.  न्यायालयाकडे पुरेसा वेळ नसल्यामुळे आजचा उर्वरित युक्तिवाद उद्या दुपारी होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

कालची उर्वरित सुनावणी आता गुरुवार म्हणजेच  27 ऑक्टोबरला पुन्हा एकदा घेतली जाणार असून, आता तरी आर्यन खानचा जामीन अर्ज मंजूर होतोय की नाही, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

न्यायालयाने आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी थांबल्यानंतर आज न्यायालयात सुनावणी  कशी पार पडली.

न्यायालयात आर्यन खानच्या जामीन अर्जावर युक्तिवाद सुरू असल्यामुळे न्यायाधीशांनी काहीही बोलण्यास नकार दिला. उद्या गुरुवारी 27 तारखेला 3 वाजता पुन्हा एकदा आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यात येणार आहे, असं आज वकिलांनी बाहेर आल्यावर माध्यमांना सांगितले.

आर्यनच्या बाजूने मुकूल रोहतगी यांनी तब्बल एक तास युक्तिवाद केला. यावेळी त्यांनी अनेक धक्कादायक माहिती देतानाच आर्यन खान कसा निर्दोष आहे? हे कोर्टासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. क्रुझवर जाण्यापूर्वीच आर्यन खानला अटक करण्यात आली. अटक करण्यापूर्वी त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली नव्हती, असं रोहतगी यांनी कोर्टाला सांगितलं.

महत्वाच्या बातम्या- आठ कोटीसाठी समीर वानखेडेने आर्यन खानला खोट्या केसमध्ये अडकवलं; प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम वाचून बसेल धक्का 

आर्यन खान नोव्हेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडीत; शाहरुख खानची दिवाळी कडू 

समीर वानखेडे यांच्या वडिलांचं नाव कसं पडलं? त्याच्याच भावाने सांगितलेले कारण वाचून बसेल धक्का 

Insurance चे 37 कोटी रुपये मिळवण्यासाठी एका मनोरुग्णाची सापाचा दंश देऊन ह’त्या’

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.