Insurance चे 37 कोटी रुपये मिळवण्यासाठी एका मनोरुग्णाची सापाचा दंश देऊन ह’त्या’

0

Insurance कंपनीकडून पैसे मिळवण्यासाठी केलेला एक धक्कादायक, किळसवाणा, माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. अहदनगरमध्ये विमा (Insurance) कंपनीकडून 37 कोटी रुपये मिळवण्यासाठी तब्बल एका मनोरुग्णाचा बळी घेतला आहे. दुर्दैव म्हणजे त्या मनोरुग्णाची ह’त्या’ करून आपलाच स्वतःचा मृत्यू झाल्याचा दाखवण्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगर येथे घडला आहे.( In Ahadnagar, a psychiatrist was stabbed to de’ath to get Rs 37 crore in insurance.)

अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील राजूर पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला  आहे. या घटनेतील मुख्य आ’रो’पी सह पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. माणुसकीचं आता नष्ट झाल्याचं वारंवार घडलेल्या प्रकरणातून लक्षात येत आहे. पैसा हाच सर्वस्व असा प्रकार सध्या चालू आहे. याचच उदाहरण आता अहमदनगरमध्ये समोर आलेलं आहे. माणुसकीला काळीमा फासणारी घटना अहमदगरमध्ये घडली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातल्या राजूर मधील धामणगाव पाट या गावातीमध्ये धक्कादायक, घृणास्पद, प्रकार उघड झाला आहे. गेल्या वीस वर्षापासून प्रभाकर वाकचौरे अमेरिकेमध्ये नोकरी करत होता. त्याने 2013 साली बायकोचा 10 लाख डॉलरचा आणि स्वतःचा 50 लाख डॉलरचा अमेरिकेत ऑल स्टेट विमा (Insurance) कंपनीकडे विमा (Insurance) काढला. इन्शुरन्सचा क्लेम मिळवण्यासाठी तो आपल्या मूळगावी धामणगाव पाट गावी आला.

प्रभाकर आपल्या गावी आल्यानंतर त्याने आपल्या इतर चार साथीदारांच्या मदतीने चार महिने नियोजन करून करून कट रचला. एका मनोरुग्न व्यक्तीचा  विषारी सर्पदंशाने ह’त्या’ करण्यात आला व त्याचा स्वतःचा मृत्यू झाल्याचे पुरावे तयार केले. आपल्या मृत्युचे पुरावे आणि कागदपत्र प्रभाकर वाकचौरे याने विमा (Insurance) कंपनीकडे सादर केले. मात्र यावेळी पडताळणी करत असताना या प्रकरणामध्ये काहीतरी गडबड असल्याचा संशय विमा (Insurance) कंपनीला आला.

विमा (Insurance) कंपनीच्या अधिकाऱ्यांनी संशय आल्याने राजूर पोलिसांची मदत घेतली. राजूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. त्यावेळी प्रभाकर वाकचौरे हा व्यक्ती जिवंत असल्याची माहिती उघड झाली. त्यांनतर पोलिसांनी प्रभाकरला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. प्रभाकर आणि त्याच्या चार साथीदारांनी नवनाथ अनप या मनोरुग्ण व्यक्तीची विषारी सर्पदंश देऊन हत्या केल्याचे उघडकीस आले. या घटनेमुळे आता सर्वत्र खळबळ उडाली आहे. एका मनोरुग्णाची ३७ कोटी रुपये मिळवण्यासाठी ह’त्या’ केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या- आठ कोटीसाठी समीर वानखेडेने आर्यन खानला खोट्या केसमध्ये अडकवलं; प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम वाचून बसेल धक्का 

फरार असणाऱ्या किरण गोसावी चे अजब वक्तव्य; केला हा खळबळजनक दावा,आर्यन खान प्रकरणात नवीन ट्विस्ट 

हे दोन पनौती मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित राहिल्यानेच भारताचा पराभव; सोशल मीडियावर चर्चेला उधाण 

हार्दिक पांड्या,भुवनेश्वर कुमारचा पर्याय शोधण्याचे भारतासमोर मोठे आव्हान; ..तर साखळीतच गुंडाळावा लागणार गाशा 

WhatsApp आता तुमच्या मोबाईलमध्ये चालणार नाही, जाणून घ्या काय आहे नवीन नियम..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.