शाहरुखच्या या व्हायरल फोटोमागचं सत्य झाले उघड, फोटो सध्या सोशल मीडियावर होतोय व्हायरल

0

मुंबई क्रुझ ड्रग्स प्रकरणात बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान गेले बरेच दिवस तुरुंगात आहे. अद्याप ही त्याला जामीन मंजूर झाली नाही. कोर्टाकडून दोनदा आर्यनचा जामीन फेटाळण्यात आला आहे . त्यामूळे जामीन मिळेपर्यंत आर्यनचा मुक्काम तुरुंगातच राहणार आहे. त्यामूळे हे प्रकरण सोशल मिडीयावर, प्रसारमाध्यमात चर्चेचा विषय ठरत आहे .

या प्रकरणात बऱ्याच अफवा पसरवल्या जात आहेत . त्यामध्ये शाहरुख खानचे, घर जन्नत ते पत्नी गौरी खान व मुलगा आर्यन खान यांच्याबदल चर्चेला वेगवेगळ्या प्रकारे उधाण येत आहे.सध्या या प्रकरणात विविध खुलासे होत आहेत. त्यातच आता शाहरुख खानचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. शाहरुख आर्यनला भेटायला ऑर्थर रोड जेलमध्ये 21ऑक्टोबरला गेला होता. हा फोटो तेव्हाचाच असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जेव्हापासून आर्यन तुरुंगात गेला आहे तेव्हापासून खान कुटुंबामध्ये ताणतणावाचे वातरावरण आहे . मुलगा तुरुंगात आहे, त्यामुळे शाहरुख चिंतेत असून तहानभूक विसरला आहे. त्याला रात्रीची झोपही येत नाही, अशी माहिती माध्यमांना भेटली होती .त्यातच आता शाहरुखचा एक फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. फोटोमध्ये शाहरुखची दाढी वाढलेली दिसत आहे. डोळे लाल भडक झाले असून डोळ्याखाली काळी वर्तुळं दिसत आहेत.

हा फोटो ऑर्थर रोड जेल बाहेरचा असल्याचा सांगण्यात येत आहे . मात्र फोटोमाग सत्य वेगळेच पाहायला मिळत आहे. नेमके काय आहे सत्य ? असा प्रश्न बऱ्याच जणांना पडला आहे. व्हायरल झालेला फोटो शाहरुखचाच आहे. परंतु, तो ऑर्थर रोड जेल बाहेरचा नाही. तर हा फोटो जुना आहे. शाहरूखचा तो फोटो 2017 मधील असून 15मार्चला झालेल्या आलिया भट्टच्या बर्थडे पार्टीतील आहे. शाहरुख आलियाला शुभेच्छा देण्यासाठी वेगळ्या अंदाजात पोहोचला होता.

त्यावेळी ही शाहरुखच्या लूकची खूप चर्चा झाली होती. शाहरुखच्या कारने एक फोटोग्राफर जखमी झाला होता. त्यानंतर शाहरुखने तातडीने फोटोग्राफरला मदत केली होती. आपल्या खासगी डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार केले होते. जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून या प्रकरणाशी जोडून चर्चेला उधाण आणण्याचं काम सध्या सोशल मीडियावर केले जात आहे.

महत्वाच्या बातम्या- आठ कोटीसाठी समीर वानखेडेने आर्यन खानला खोट्या केसमध्ये अडकवलं; प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम वाचून बसेल धक्का  

हे दोन पनौती मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित राहिल्यानेच भारताचा पराभव; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

T20 World Cup 2021: हार्दिक पांड्या,भुवनेश्वर कुमारचा पर्याय शोधण्याचे भारतासमोर मोठे आव्हान; ..तर साखळीतच गुंडाळावा लागणार गाशा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.