आर्यन खानचा जाणून-बुजून छळ केला जातोय; ८६ ग्रॅम ड्रग्स सापडूनही कॉमेडियन भारतीला त्याचदिवशी जामीन कसा मिळतो?

0

सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्या प्रकरणानंतर एनसीबी बॉलिवूडच्या मागे हात धुवून लागल्याचे पाहायला मिळते. सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणानंतर त्याची गर्लफ्रेंड ‘रिया चक्रवर्ती’वर देखील एनसीबीने ड्रग्स प्रकरणात गुन्हा दाखल केला होता.

दोन ऑक्‍टोबरला कार्डिलिया क्रूजवर छापा टाकत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक करत एनसीबीने पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली. गेल्या वीस दिवसांपासून आर्यन खान न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. अद्याप त्याला जामीन मिळू शकलेला नाही. दोन वेळा न्यायालयाने आर्यन खानला जामीन अर्ज फेटाळला आहे.

एनसीबीने आर्यन खानला अटक केल्यानंतर,आपला रुक आता त्याची मैत्रीण ‘अनन्या पांडे’कडे केला आहे. कार्डिलिया ड्रग्ज प्रकरणात चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेला चौकशीसाठी बोलावले. एनसीबीने अनन्या पांडेची ही चौकशी आर्यन खान सोबत केलेल्या व्हाट्सअप चॅटमुळे होत असल्याचे समोर आले आहे.

एनसीबीच्या अहवालानुसार, ‘अनन्या पांडे’ हिला आर्यन खान गांजाची व्यवस्था होईल का? असे विचारतोय. तर या प्रश्नाला उत्तर देताना अनन्या पांडे म्हणते आहे,मी व्यवस्था करते. अशा आशयाचे ‘चॅट’ दोघांमध्ये व्हाट्सअपच्या माध्यमातून झाले आहे. मात्र चॅट संदर्भात अनन्या पांडेने एनसीबीला “मी जस्ट गंमत करत होते”. असं सांगितलं असल्याचे समोर येत आहे. एवढंच नाही तर, एका पार्टीमध्ये मी आर्यन खानला गांजा ओढताना पाहिलं आहे अशीही कबुल अनन्या पांडेने एनसीबीला दिली आहे.

एवढंसगळं एनसीबी असतानाही, जाणून-बुजून आर्यन खानला या प्रकरणात अडकवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असल्याचा आरोप अनेकांकडून होताना पाहायला मिळत आहे, यात महाविकास आघाडीचे नेते नवाब मलिक यांचाही समावेश आहे. नवाब मलिक सातत्‍याने आर्यन खान हे प्रकरण फेक असल्याचं बोलत आहेत. समीर वानखडे हा माणूस देखील फेक असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

86 ग्रॅम ड्रग्स प्रसिद्ध कॉमेडियन भारतीकडे सापडले असताना देखील,भारतीला त्याच दिवशी जामीन मंजूर होतो. मात्र आर्यन खानकडे कोणत्याही प्रकारचं ड्रग्स सापडलं नसताना, देखील त्याला 20 दिवसांपासून कोठडीत ठेवण्यात आलंय. आर्यन खानचा जाणून-बुजून छळ करण्यात असल्याचं कमाल आर खान याने म्हटलं आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.