सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत सर्वाधिक मते मिळवलेले संचालक सुनिल भगत यांचा राजकीय प्रवास…

0

बारामती तालुक्यातील ‘सोमेश्वर सहकारी साखर कारखान्या’च्या निवडणुकीत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असल्याचे पाहायला मिळाले. राष्टवादी पुरुस्कृत सोमेश्वर विकास पॅनेलने भाजप पुरस्कृत सोमेश्वर परिवर्तन विकास पॅनलचा धुव्वा उडवत २१ पैकी तब्बल २१ जागांवर विजय मिळवला आहे. या विजयांमध्ये असे अनेक उमेदवार आहेत, ज्यांचा प्रवास खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. त्यापैकी एक नाव म्हणजे सुनिल भगत. सुनील भगत सहकारी साखर कारखान्यावर सलग तिसऱ्यांदा संचालक म्हणून निवडून आले आहेत. विशेष म्हणजे यावेळेस त्यांनी सर्वाधिक मते मिळवत एक नवा इतिहास रचला आहे.

अलीकडच्या काळात तरुणाचा राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदल्याचा पाहिला मिळतो. राजकारणामध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना अतिशय खालच्या पातळीची टीका होताना पाहायला मिळते. खूप मोठ्या प्रमाणात खोटे आरोपही होतात. याचा खूप मोठा फटका आपल्या कुटुंबालाही सोसावा लागतो. त्यामुळेच अलीकडच्या काळात तरुणांचे राजकारणाकडे पाठ फिरवण्याचा प्रमाण अधिक दिसतं.

मात्र आज आपण अशा एका व्यक्ती विषयी जाणून घेणार आहोत, ज्यांनी वयाच्या 17 व्या वर्षापासून राजकारणाला सुरुवात केली. तिथपासूनचा त्यांचा आजचा प्रवास खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. गोरगरीब विद्यार्थ्याच्या पाठीशी ते कायम उभे असतात. बारामती तालुक्यातील पच्चिम पट्ट्यातील तरूण वर्गामध्ये त्यांची क्रेझ पाहायला मिळते.

बारामती तालुक्यातील कोराळे बुद्रुक या गावातून सुनील भगत यांनी वयाच्या 17व्या वर्षापासून समाज कार्याला सुरुवात केली. घरातूनच राजकीय धडे मिळाल्यामुळे समाजातील लोकांच्या नेमक्या काय अडचणी असतात? याची त्यांना नव्याने ओळख करून घ्यायची गरज भासली नाही. वयाच्या सतराव्या वर्षापासून राष्ट्रवादी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी लोकांच्या समस्या सोडवायला, जाणून घ्यायला सुरुवात केली. लोकांचं मिळणार प्रेम पाहून त्यांना या कामात अधिक रस निर्माण होत गेला.

लोकांचा मिळणारा प्रतिसाद पाहून 2000 साली सुनिल भगत यांनी कोराळे बुद्रुक ग्रामपंचायत निवडणूक लढवली. आणि पहिल्याच प्रयत्नात ग्रामपंचायत सदस्यही झाले. सदस्य असताना त्यांचं काम उत्तम असल्याचं स्थानिक सांगतात. ग्रामसभेत गावातील बहुतांशी समस्या ते प्रामुख्याने मांडत असत. 2002 साली ज्ञानेश्वरी पतसंस्था आणि ज्ञानेश्वरी दूधसंघाच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना दूध व्यवसायाकडे वळण्यासाठी प्रोत्साहन दिलं. एवढंच नाही तर त्यांना गाई देखील खरेदी करून दिल्या. ज्ञानेश्वरी पतसंस्थेमार्फत बेरोजगार तरुणांना व्यवसायासाठी कर्ज देखील उपलब्ध करून दिलं.

पुढे या कामाची पोचपावती म्हणून 2005 साली कोराळे बुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणूनही काम करण्याची संधी त्यांना मिळाली. आणि या संधीचं विकासाच्या माध्यमातून त्यांनी सोनं करून दाखवलं. फ्लोअर ब्लॉग,सांडपाण्याच्या गटारी,घरोघरी पाण्याची सोय,तरुणांना रोजगार,नविन व्यावसायासाठी कर्ज उपलब्ध, अशा अनेक पायाभूत सुविधा राबवत यांनी गावाचा कायापालट केला. त्यांच्या एकनिष्ठेची आणि कामाची दखल स्वतः अजित दादांनी देखील घेतली.

काम करणार्‍या माणसांवर अजित दादांचे विशेष असं प्रेम राहतं, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. सुनिल भगत यांचं काम पाहून, अजितदादांनी 2007 साली सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे डायरेक्टर म्हणून त्यांना संधी दिली. सुनील भगत यांनी इथे देखील मिळालेल्या संधीचं सोनं करून दाखवलं. त्यांच्या कामावर पुन्हा एकदा अजितदादा खुश झाले आणि त्यांनी 2011 ला थेट सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे व्हायस चेअरमन उपाध्यक्षपदी निवड केली.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे व्हायस चेअरमन उपाध्यक्ष म्हणून काम करत असताना त्यांची कारकीर्द खूप गाजली. 2011 ते 2015 या चार वर्षात सुनील भगत यांच्या हातून उल्लेखनीय कामगिरी झाली. या कार्यकाळात त्यांनी शेतकऱ्यांसाठी सोमेश्वर ड्रिप प्रकल्प राबवला. याचा खूप मोठा फायदा शेतकऱ्यांना झाल्याचे पाहायला मिळाले. याची दखल स्वतः पवार साहेबांनी देखील घेतली होती. या कामाची पोचपावती म्हणून त्यांना “उत्तम तांत्रिक क्षमता” नावाचा पुरस्कार मिळाला.

२०१८ ला “शेगर धनगर महासंघ” महाराष्ट्र राज्याचे अध्यक्षपदी देखील सुनील भगत यांची निवड झाली. या महासंघाच्या माध्यमातून सामाजिक विवाह सोहळा, विद्यार्थी करिअर मार्गदर्शन मेळावे, वधू-वर परिषद मेळावे, असे अनेक विविध उपक्रम सुनील भगत सामाजिक सलोखा जोपासत राबवत असतात.

वयाच्या सतराव्या वर्षी समाजातील लोकांच्या अडचणी जाणून घेत असताना, मिळणारा प्रतिसाद,प्रेम त्यांना इथंपर्यंत घेऊन आलं. समाजकारणाची आवड असेल तर, कितीही संकटे आली तरी देखील, हे काम करत असताना तुम्हाला मिळणारी ऊर्जा त्याचा अधिक जोशाने सामना करत असते. सुनील भगत यांचा इथपर्यंतचा प्रवास अनेकांसाठी नक्कीच ऊर्जा निर्माण करणारा आहे.

बारामती तालुक्यातील बातम्या व्हॉट्सॲपवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा –सर्वसामान्यांचा खर्च वाढणार, एसटीचा प्रवास महागणार, पेट्रोल, डिझेल नंतर आता तिकितदर वाढणार 

राष्ट्रवादीच्या या नेत्याचं नाव घेतल्यास माझ्या तोंडाचा घाण वास येईल;उदयनराजे यांची जहरी टीका 

आर्यन खानचा जाणून-बुजून छळ केला जातोय; ८६ ग्रॅम ड्रग्स सापडूनही कॉमेडियन भारतीला त्याचदिवशी जामीन कसा मिळतो?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.