आमचं सरकार आल्यास प्रत्येकाला स्कूटी आणि स्मार्टफोन; प्रियंका गांधींची मोठी घोषणा

0

देशातील सर्वात मोठी आणि महत्वाची मानली जाणारी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. प्रत्येक पक्षाने आपल्या परीने जोर लावल्याचेही पाहायला मिळत आहे. खास करून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांकडे अधीक लक्ष दिले आहे. सध्या त्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर असून त्यांना महिलांकडून कमालीचा प्रतिसाद देखील मिळत आहे.

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी मंगळवारी एक पत्रकार परिषद घेऊन,उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत 40 टक्के महिलांना उमेदवारी देण्याची मोठी घोषणा केली होती. त्यांनी घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे देखील राजकीय वर्तुळात बोललं गेलं. प्रियंका गांधी यांनी घेतलेल्या या निर्णयाचा खूप मोठा फायदा उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला होऊ शकतो, असा अंदाज अनेकांनी वर्तवला आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत 40% उमेदवारी महिलांना देण्याचा मोठा निर्णय प्रियंका गांधी यांनी घेतल्यानंतर, आज आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतला आहे. बारावीच्या मुलींना स्मार्टफोन आणि पदवीधर मुलींना एक इलेक्ट्रिक स्कूटर देण्याचा ऐतिहासिक निर्णय उत्तर प्रदेश काँग्रेसने घेतल्याचे प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगितलं आहे.

विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी सध्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी या मतदारसंघात सभा घेतली होती. त्यांच्या या सभेला तुफान गर्दीही पाहायला मिळाली होती.

उत्तर प्रदेशमध्ये प्रियंका गांधी यांना कमालीचा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे. खासकरून महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येते आहे. एका माध्यमाच्या प्रतिनिधीशी, शाळेतल्या काही मुलींनी संवाद साधला. संवादामध्ये मुले प्रियंका गांधी यांचे गुणगान गाताना पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर प्रियांका गांधी यांनी, आम्हाला आमचं सरकार आल्यानंतर प्रत्येक मुलीला स्मार्टफोन दिला जाईल, असं सांगितलं. “महीला हूं लड़ सकतीं हूं” हे काय आहे? हे त्यांना आम्हाला पटवून सांगितले. असंही या मुली म्हणताना दिसून येत आहेत.

उत्तर प्रदेश मधील लखीमपुर खेरीमध्ये आंदोलन करत असणाऱ्या शेतकऱ्यांना भाजपच्या केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्या मुलाने गाडीखाली चिरडल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणानंतर प्रियंका गांधी उत्तर प्रदेशमध्ये अधिक सक्रिय झाल्याचे पाहायला मिळाले. पीडितांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी जाऊ दिलं नव्हतं. पोलिसांनी प्रियंका गांधींना अटकही केली होती.

हेही वाचा- टाटांची आता शेतकऱ्यांसाठी खास योजना! कांदा साठवणुक करण्यासाठी आता ही संकल्पना राबवणार

काल कोर्टाने आर्यन खानचा जामीन का फेटाळला? कारण जाणून बसेल धक्का

एनसीबीची शाहरुखच्या मन्नत बंगल्यावरही धाड; हे आहे धाडीचे कारण

शहीद जवानाला श्रद्धांजली वाहण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय लोटला; व्हीडिओ पाहून डोळ्यात येईल पाणी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.