काल कोर्टाने आर्यन खानचा जामीन का फेटाळला? कारण जाणून बसेल धक्का
कॉर्डेलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या आर्थररोड जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहे. २ ऑक्टोबरला कॉर्डेलिया क्रूजवर एनसीबीने छापा टाकल्यानंतर आर्यन खानला अटक करण्यात आली असून अजूनही त्याला जामीन मिळालेला नाही.
काल बुधवारी 20 तारखेला सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही व्ही पाटील यांनी आर्यन खानची जामीन याचिका फेटाळून लावली आहे. आर्यन खानचा जामीन पुन्हा एकदा फेटाळल्यामुळे त्याला आणखी काही दिवस न्यायालयीन कोठडीतच राहावं लागणार आहे. आर्यन खानचा जामीन सत्र न्यायालयाने फेटाळल्यामुळे आर्यन खानच्या वकिलांनी उच्च न्यायालयात दात मागितली आहे. आता या जामिनावर मंगळवारी सुनावणी होणार असल्याचे समजते.
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अटक केल्यापासून आर्यन खान माध्यमाची हेडलाईन बनलाय. काल झालेल्या जामीन युक्तिवादात प्रत्येकाला आर्यन खानला जामीन मिळणार असं वाटत होतं. मात्र सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही व्ही पाटील यांनी आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला.
*न्यायमूर्ती व्ही व्ही पाटील यांनी जामीन फेटाळताना खालील मुद्दे नमूद केले*
न्यायमूर्ती व्ही व्ही पाटील यांनी आर्यन खानचा जामीन फेटाळण्याची काही कारणे सांगितली आहेत. आर्यन खान आणि त्याचा मित्र मर्चंट खान दोघेही नंबर एक आहे नंबर दोन आरोपी एकमेकांचे मित्र आहेत. आणि आपल्या जवळ ट्रक्स असल्याचे आणि त्याचे सेवन केल्याचे कबूलही केले आहे.
आरोपी नंबर 1 (आर्यन खान ) आणि आरोपी नंबर 2 ( अरबाज मर्चंट) मित्र आहेत. दोघांनी आपल्या जबाबात जवळ ड्रग्ज असल्याचं आणि सेवन केल्याचं मान्य केलंय. त्यामुळे आर्यन खानला अरबाजकडे ड्रग्ज असल्याची माहिती होती. बरोबर कोर्टाला दाखवण्यात आलेल्या व्हाट्सअप चॅट वरून आरोपी आर्यन खानचे अनोळखी लोकांसोबत ड्रग्ससंबंधित बोलणे झाल्याचे चॅट वरून समजते. याचा अर्थ आर्यनचे ड्रग्सशी संबंध आहेत,हे स्पष्ट होते.
आर्यन खानने केलेल्या व्हाट्सअप चॅट मधून दिसून येतं की, त्याचे सप्लायर्स आणि पेडलर्ससोबत संबंध आहेत त्याचबरोबर आरोपी नं १ने संगनमताने हा गुन्हा केला. हेही स्पष्ट झाले आहे. वरील व्हाट्सअप चॅटचा विचार केला तर, आरोपी ड्रग्जशी संबंधित मोठ्या नेटवर्कचे भाग असल्याचे स्पष्ट होते.
आणि एनसीवीटी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे त्याला कोर्टाने ही सहमती दर्शवली आहे पण मुद्दा म्हणजे, जर आरोपी आर्यन खानची जामिनावर सुटका केली तर,तो पुराव्याशी छेडछाड करू शकतो. एनसीबीने केलेल्या या युक्तीवादाशी सहमती असल्याचे न्यायमूर्ती व्ही व्ही पाटील यांनी नमूद केले.
आर्यन खानच्या व्हाट्सअप चॅटचा विचार केला तर तो ड्रग्स कारवायांशी संबंधित असल्याचे स्पष्ट होते. शिवाय मीना वरून सुटका झाली तर तो असा गुन्हा पुन्हा करणार नाही याची खात्री देता येत नाही. त्यामुळे आरोपींना जामीन मंजूर करणं चुकीचं ठरेल.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम