अखेर रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोग अध्यक्षपदही निवड

0

गेल्या दीड वर्षापासून राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद रिक्त असल्यामुळे, राष्ट्रीय महिला आयोगाने देखील यावर नाराजी व्यक्त केली होती. काही महिन्यांपासून राज्यात काही बलात्काराच्या घटना घडल्याने या चर्चा अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रूपाली चाकणकर यांची निवड करण्यात आली आहे.

महामंडळ वाटपामध्ये महिला आयोगासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आग्रही असल्याच्या बातम्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी आल्या होत्या. महिला व बालकल्याण खाते काँग्रेसकडे असल्यामुळे राज्य महिला आयोग राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार हे जवळपास निश्चित मानलं जात होतं. या महत्त्वाच्या पदावर रुपाली चाकणकर यांच नाव सर्वात पुढे असल्याचं बोललं जात होतं. आज त्या नावावर महाविकास आघाडी सरकारने शिक्कामोर्तब केले असून, रूपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रूपाली चाकणकर यांची राज्याच्या महिला आयोग अध्यक्षपदी निवड होणार असल्याच्या बातम्या झळकल्या होत्या. महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रूपाली चाकणकर यांचे नाव जवळपास निश्चित मानला जात होतं. ही गोष्ट लक्षात घेऊन भाजपचा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी रूपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून जोरदार हल्ला चढवला होता.

काही दिवसांपासून महा विकास आघाडी सरकारवर सातत्याने हल्ला करणाऱ्या भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच्यावरही हल्ला चढवला होता. राज्य महिला आयोग अध्यक्षपदी रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका. असा जोरदार टोला चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांना अप्रत्यक्ष लगावला होता. मात्र रूपाली चाकणकर यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.

राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली असल्यामुळे आता चित्रा वाघ नेमकं, काय म्हणतायत? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा- टाटांची आता शेतकऱ्यांसाठी खास योजना! कांदा साठवणुक करण्यासाठी आता ही संकल्पना राबवणार

काल कोर्टाने आर्यन खानचा जामीन का फेटाळला? कारण जाणून बसेल धक्का

एनसीबीची शाहरुखच्या मन्नत बंगल्यावरही धाड; हे आहे धाडीचे कारण

शहीद जवानाला श्रद्धांजली वाहण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय लोटला; व्हीडिओ पाहून डोळ्यात येईल पाणी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.