बाळासाहेब हे वाक्य बोलले नसते तर आज नरेंद्र मोदी पंतप्रधान सोडा, राजकारणातही कुठे दिसले नसते..

0

गोथरा रेल्वे स्थानकाजवळ साबरमती एक्सप्रेस ट्रेनला लागलेल्या आगीत ५९ कारसेवकांचा मृत्यू झाला. या ट्रेनला आग नेमकी कशामुळे लागली? याबाबद अनेक अफवा पसरल्या,आणि गुजरातमध्ये मोठी ‘दं’गल घडली. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना 2002 साली ही दंगल घडल्यामुळे, नरेंद्र मोदी यांना पक्षातून काढून टाकण्याच्या चर्चा सुरू झाल्या. यासंबंधी लालकृष्ण अडवाणी (lal krishna advani) यांनी बाळासाहेब ठाकरे यांची देखील भेट घेतली होती.  (If Balasaheb had not uttered this sentence, Narendra Modi would not have left the PM today, he would not have appeared anywhere in politics)

२०१४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘काँग्रेस’वर अनेक भष्टाचाराचे आरोप झाले. जंतर-मंतर मैदानावर लोकपाल बिल,भष्टाचार असे विविध विषय घेऊन,अण्णा हजारे उपोषणाला बसले. देशभरातून अण्णा हजारे यांना कमालीचा प्रतिसाद मिळाला. आणि संपूर्ण देशभरात काँग्रेसविरोधी वातावरण तयार झाले. याचा पुरेपूर फायदा भारतीय जनता पार्टीने घेतला. “अबकी बार मोदी सरकार” ही घोषणा ही देत,संपूर्ण देशभर गुजरात मॉडेलचं चित्र दाखवण्यात आलं. भाजपकडून त्यावेळेसचे गुजरातचे मुख्यमंत्री ‘नरेंद्र मोदी’ यांच्यावर या निवडणुकीचा सगळा ‘फोकस’ करण्यात आला. आणि २०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशात मोदी पर्व सुरू झालं.

इंदिरा गांधी हत्येनंतर देशात सहानुभूतीची लाट निर्माण झाली. १९८४ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीत काँग्रेसला सर्वात जास्त मतदान मिळाले. ५१६ पैकी तब्बल ४०४ खासदार जनतेने कॉंग्रेसचे निवडून दिले. १९८४ साली झालेल्या निवडणूकीनंतर कोणत्याही पक्षाला २०१४ पर्यंत स्पष्ट बहुमत मिळवता आलं नव्हतं. ३० वर्षानंतर भारतीय जनता पार्टीने स्पष्ट बहुमत मिळवत,नवा इतिहास रचला.

२०१४च्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीने ३१ टक्के मतदान मिळवत २८२ जागा जिंकल्या. आणि निकालानंतर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाच्या १४व्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मंत्रीमंडळ स्थापन केल्यानंतर २०१६ला मंत्रिमंडळाने जीएसटी,नोटाबंदी करण्याचा निर्णय घेतला. आणि सामान्य माणसाला आपलेच पैसे बदलण्यासाठी रांगेत उभं राहावं लागलं.

GST नोटाबंदीचा सामान्य माणसाला खूप मोठा फटाका बसल्याचे बोलले गेले. छोटे मोठे उद्योगधंदे बंद पडल्याचे आरोप विरोधकांकडून करण्यात आले. अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांनी जीएसटी आणि नोटाबंदीमुळे भारताच्या अर्थवेस्थेला मोठा फटाका बसणार असल्याचे सांगितले,आणि झालेही तसेच. भारताचा JDP दर कमालीचा घसरल्याने पाहिला मिळाले.

एवढं सगळं होउन देखील २०१९च्या लोकसभा निवडणुकीतही मोदींची जादू कायम असल्याचे पाहिला मिळाले. २०१४ पेक्षाही, ‘२०१९’ च्या लोकसभा निवडणूकीत भारतीय जनता पार्टीला जास्त जागा मिळाल्याने सर्वांनीच आश्र्चर्य व्यक्त केले. पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच असणार हे स्पष्ट झाले. या विजयानंतर नरेंद्र मोदींनी कमालीची लोकप्रियता मिळवली. मात्र त्यांच्यावर ‘अशीही’ एक वेळ आली होती, ज्यामुळे त्यांना राजकारणच सोडावं लागणार होत. त्याच विषयी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

नरेंद्र मोदी याची सुरवातीची राजकीय कारकीर्द पाहिली तर, ती खूप वादग्रस्त राहिली आहे. नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते,तेव्हा २००२ साली गुजरात ‘दं’गल घडली. आणि या ‘दं’गलीत बाराशे हून अधिक माणसं मारली गेली. या ‘दं’गलीला नरेंद्र मोदींच जबाबदारी असल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता.

२७ फेब्रुवारी २००२ला अयोध्येहून ‘कारसेवक’ आणि भाविक ‘साबरमती एक्सप्रेस’ ट्रेनमधून गुजरातला येत असताना ‘गोधरा’रेल्वे स्टेशन जवळ ‘साबरमती एक्सप्रेस ट्रेन’ला आग लागली,आणि या आगीत ५९ कारसेवक मृत्युमुखी पडले. ही आग नेमकी कशामुळे लागली? हे कोणालाही माहिती पडले नाही. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचं बोललं गेलं.

आगीत मृत्यू पावलेल्या कारसेवकांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना ‘न’ देता ,एका गाडीत उघड्यावर अहमदाबादला नेण्यात आले. कारसेवकांचे मृतदेह ‘विश्व-हिंदू परिषदेने’ ताब्यात घेतल्याचे त्यावेळी समोर आले होते. जर कारसेवकांचे ‘मृतदेह’ त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आले असते,तर गुजरात ‘दं’गल झाली नसती,असंही बोलण्यात येतं.

२७ तारखेला सकाळी ‘साबरमती एक्सप्रेस ट्रेन’ला आग लागून ही घटना घडली. संध्याकाळपर्यंत सगळीकडे शांततेचे वातावरण होतं. मात्र संध्याकाळ नंतर हळूहळू अफवा पसरू लागल्या आणि २८ तारखेपासून ‘गुजरात ‘दं’गली’ला सुरुवात झाली. तीन तारखेपर्यंत ही ‘दं’गल सुरू राहिल्याने या दंगलीत जवळपास बाराशे हून अधिक लोकांचा बळी गेला.

हे प्रकरण राज्य सरकारला व्यवस्थित हाताळता आलं नसल्याचे,आरोप त्यावेळी करण्यात आले. या प्रकरणाचं वेळेतच गांभीर्य लक्षात घेतलं असतं, तर ही ‘दं’गल घडली नसती, असंही म्हटलं जातं. आणि म्हणून याच प्रकरणावरून भाजपचे ज्येष्ठ नेते ‘लालकृष्ण अडवाणीं’नी बाळासाहेब ठाकरे यांच्याशी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री, ‘नरेंद्र मोदी’ यांना पक्षातून काढून टाकण्याबाबत चर्चाही केली होती.

मात्र बाळासाहेबांनी त्यावेळी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं “नरेंद्र मोदी गया,तो गुजरात गया” बाळासाहेबांच्या या एका वाक्यामुळे नरेंद्र मोदी यांचं राजकीय करियर तर वाचलंच, शिवाय आज त्यांना देशाच्या पंतप्रधान पदापर्यंत देखील मजल मारता आली. ही सगळी देण बाळासाहेबांची असल्याचं आजही बोललं जातं. एका जाहीर सभेत बाळासाहेबांनी स्वतः हा किस्सा सांगितला होता.

या प्रकरणामुळे ‘अटल बिहारी वाजपेयी’ देखील नाराज झाल्याच्या चर्चा त्यावेळी झाल्या होत्या. एका पत्रकाराने नरेंद्र मोदी यांना काय सल्ला द्याल? असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना अटल बिहारी वाजपेयी यांनी ‘नरेंद्र मोदी’ यांना राजधर्म पाळण्यास सांगितले होते. पुढे राजधर्म या शब्दाचं काँग्रेसने राजकारण देखील केल्याचं पाहायला मिळाले होते.

हेही वाचा- राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्याला अजित पवारांनी फिरवली पाठ; राजकीय चर्चेला उधाण
अजित पवार यांना डावलून रोहित पवार होणार राष्ट्रवादीचे नवे अध्यक्ष
मोहीते-पाटलांच्या बालेकिल्ल्यावर आमदार राम सातपुते यांचे वर्चस्व 
धक्कादायक मोदींनीही वाहिली मनमोहन सिंग यांना जिवंतपणी श्रद्धांजली 
४८ तासांच्या शोधमोहिमेनंतर सैनिकांचे मृतदेह सापडले; एकूण ९ जवान शहिद

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.