४८ तासांच्या शोधमोहिमेनंतर सैनिकांचे मृतदेह सापडले; एकूण ९ जवान शहिद

0

जम्मू -काश्मीरच्या पूंछ येथे गुरुवारी संध्याकाळी दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीमध्ये भारतीय सैन्य दलाच्या काही अधिकारी व जवानांचे मृतदेह बेपत्ता होते. चकमकीत शहिद झालेल्या कनिष्ठ कमिशन्ड ऑफिसरसह (JCO) दोन जवानांचे मृतदेह शोधून काढण्यात लष्कराला यश आले आहे. या भागामध्ये शोध मोहीम राबवण्यात आली होती.

दहशतवाद्यांना लपवल्याचा संशय असलेल्या जंगलांवर जोरदार हल्ला केल्यानंतर ४८ तासांनी शहिद जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. जंगलामध्ये सापडलेल्या मृतदेहांपैकी ९ मृतदेह लष्कराच्या जवानांचे आहेत. एकाच ठिकाणी झालेल्या चकमकीत शहिद झालेल्या जवानांची आकडेवारी ही गेल्या काही दिवसातल्या आकडेवारी पेक्षा सर्वाधिक आहे.

एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार, गुरुवारी लष्कर व दहशतवादी यांच्यामध्ये जोरदार गोळीबार झाल्यानंतर कनिष्ठ कमिशन्ड ऑफिसरसह अनेक जवान बेपत्ता झाले होते. जम्मू -काश्मीर पोलिसांसह सैन्यांचे पुंछ येथील नर खास जंगलाच्या घनदाट जंगलात शोधमोहिमेदरम्यान सुभेदार अजय सिंह आणि नाईक हरेंद्र सिंह शहिद झाले.

ज्या भागात पाच सैन्य जवान शहीद झाले त्याच भागात चार दिवसांनी दोन जवान रायफलमन योगंबर सिंग आणि रायफलमन विक्रम सिंह नेगी यापूर्वी पुंछ राजौरी जंगलांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये शहिद झाले होते. गुरुवारी संध्याकाळी लष्कराचा जेसीओशी यांच्याशी संपर्क तुटला, अशी माहिती सैन्य अधिकाऱ्याने दिली.

मेंढर येथील नर खास वन परिसरामध्ये आज सकाळी मोठा हल्ला करण्यात आला. नर खास परिसरामध्ये  गोळीबाराचे व स्फोटाचे आवाज ऐकू आले कारण लष्कराकडून जंगलात खोलवर लपून बसलेल्या दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी केला.तेथे दहशतवादी उपस्थित असल्याची माहिती मिळताच लष्कराने सोमवारी डेरा की गलीमध्ये कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले. सुरुवातीच्या गोळीबारामध्ये जेसीओसह पाच सैनिक ठार झाले.

हेही वाचा-                                                    Rohit Pawar: अजित पवार यांना डावलून रोहित पवार होणार राष्ट्रवादीचे नवे अध्यक्ष        धक्कादायक मोदींनीही वाहिली मनमोहन सिंग यांना जिवंतपणी श्रद्धांजली                                      Fact Check: देशाचे माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर व्हायरल, जाणून घ्या अधिक

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.