Rajesh tope: शरद पवार सोनिया गांधी उद्धव ठाकरेंची कराळे मास्तरने का केली आरती? कारण जाणून जाल चक्रावून

0

आरोग्य विभागाकडून घेण्यात येणाऱ्या आरोग्य विभागाच्या गट ‘क’ आणि गट ‘ड’ संवर्गातील पदांच्या भरती प्रक्रियेत पुन्हा एकदा गोंधळ झाल्याचे चित्र समोर येत आहे. या परीक्षेसंदर्भात पुन्हा एकदा गोंधळ निर्माण झाल्यामुळे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जाऊ लागलं आहे. यापूर्वी देखील आरोग्य विभागाकडून घेण्यात येणारी ही परीक्षा विद्याथ्यांची परीक्षा केंद्रे विदेशात, आणि परराज्यात आल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.

यापूर्वी सप्टेंबरमध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेत परीक्षा केंद्रावरून मोठा गोंधळ झाल्यानंतर २४ आणि ३१ ऑक्टोंबरला ही परीक्षा घेण्यात येईल असं जाहीर करण्यात आलं. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडून या परीक्षांचे नियोजन करणाऱ्या ‘न्यासा’ कंपनीवर नाराजीही व्यक्त केली. मात्र 24 आणि 31 तारखेला होणाऱ्या परीक्षेचे नियोजन पुन्हा एकदा याच कंपनीकडे देण्यात आल्याने आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

एकाच विद्यार्थ्यांची एकाच वेळी दोन वेगवेगळी परीक्षा केंद्रे आली. दोन्ही परिक्षा केंद्राचे अंतर जवळपास दीडशे-दोनशे किलोमीटरवर असल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. ‘चंद्रभागा ढींगे’ या विद्यार्थिनीची एकाच वेळी दोन वेगवेगळी परिक्षा केंद्रें आली. एक परीक्षा केंद्र नाशिक तर दुसरं अकोला आल्यामुळे ही विद्यार्थिनी चक्रावून गेली.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवणारे,वर्ध्याचे नितेश कराळे मास्तर यांनी आपला संताप व्यक्त करताना महाविकासआघाडी आणि राजेश टोपे यांची थेट पंचारतीच ओवाळून टाकली. एकाच विद्यार्थ्याचे दोन वेगवेगळ्या ठिकाणचे हॉल तिकीट जनरेटर होतेच कसे? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. हे महाविकास आघाडी सरकार विद्यार्थ्यांचं वाटोळं करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

कराळे मास्तर यांनी राजेश टोपे आणि महाविकास आघाडी सरकारची पंचारती ओवाळली आहे. त्यांनी टोपे यांच्या नावाची एक आरती देखील तयार केली आहे. “जय देव जय देव जय टोपी वाले बप्पा तुम्ही केला पोट्टेंचा सत्यानाश बाप्पा.. तुम्ही केला पोट्टेंचा सत्यानाश बाप्पा…पोट्टयाले सेंटर एकाचदिवशी चंद्रपूर सोलापूर… पोट्टयाले सेंटर एकाचदिवशी चंद्रपूर सोलापूर…जय देव जय देव जय टोपी वाले बप्पा…आमच्या जवळ नाही हेलिकॉप्टर बाप्पा.. जय देव जय देव जय टोपी वाले..” आरती तयार करून कराळे मास्तर यांनी आरोग्य मंत्र्यांची थेट आरतीच केली आहे.

 

आरोग्य विभागाचा परीक्षांचे नियोजन न्यास कंपनीकडे आहे. यापूर्वीही न्यास कंपनीच्या गलथान कारभारामुळे परीक्षा रद्द करण्यात आली होती. विशेष म्हणजे या परीक्षेला अवघे दहा तास शिल्लक असताना ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय आरोग्य विभागाकडून घेण्यात आला होता. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. रेल्वेने प्रवास करून अनेक विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोचले होते.                              हेही वाचा- अजित पवार यांना डावलून रोहित पवार होणार राष्ट्रवादीचे नवे अध्यक्ष

४८ तासांच्या शोधमोहिमेनंतर सैनिकांचे मृतदेह सापडले; एकूण ९ जवान शहिद

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.