Video: ग्रामपंचायतीचा तालिबानी कारभार, गतिमंद तरुणाला तोंडाला काळं फासून घातला चपलांचा हार,

0

महाराष्ट्रासह देशभरात अशा काही ग्रामपंचायती आहेत ज्यांचे नाव देशात आदरणाने घेतले जाते. असे काही सरपंच आहेत ज्यांना पद्मभूषण पुरस्कार देखील मिळाला आहेत. मात्र अशाही काही ग्रामपंचायती आहेत जिथे तालिबानी कारभार पाहायला मिळत आहे. आपण अशाच एका सरपंचाने केलेला लाजिरवाणा प्रकार पाहूया.

एका तरुणाला ग्रामपंचायतीकडून तालिबानी  शिक्षा देत त्याची गावभर धिंड काढल्याचा धक्कादायक व क्रूर प्रकार समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शौचाला बसण्याच्या मुद्द्यावरून झालेले भांडण एवढं वाढत गेलं की त्यानंतर गावातील लोकांनी या तरुणाची धिंड काढल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. त्याचा Video देखील चांगलाच व्हायरल होत आहे. धिंड काढण्यात आलेला तरुण गतीमंद आहे.

त्या तरुणाची अवस्था समजून न घेता गावकऱ्यांनी त्याची तालिबानी पद्धतीने धिंड काढली. त्याच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध  कारवाई झालीच पाहिजे अशी चर्चा पंचक्रोशी मध्ये चालू आहे. हरियाणा राज्यातील भिवानी जिल्ह्यात घुसकानी गावामध्ये हा किळसवाणा प्रकार घडला आहे. शेजारच्या गावामधील एक गतीमंद तरुण घुसकानी गावामध्ये आला होता. सकाळी तो तरूण रस्त्यावर शौचाला बसल्याचे गावातील काही महिलांनी पाहिले.

तो तरुण रस्त्यावरच शौचाला बसल्याने महिलांनी त्याच्यावर आक्षेप घेत तरुणाला जाब विचारला. तो तरुण गतीमंद असल्याचं गावातील महिलांना माहित नव्हतं. त्यामुळे महिला व त्या तरुणामध्ये भांडण झाले. हा प्रकार पाहिल्याने गावातील काही तरुणांनी त्या गतिमंद तरुणाला मारहाण केली आणि त्यानंतर तरुणाला मारहाण करत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली.

पोलीस स्टेशनमध्ये हा तरुण गतीमंद असल्याचे सांगितल्यानंतर त्या तरुणावर आक्षेप घेणाऱ्या महिला शांत झाल्या आणि मग महिलांना तक्रार मागे घेत समेट करण्याची तयारी दर्शवली. त्या तरुणाच्या नातेवाईकांनीदेखील केस मागे घेऊन हे प्रकरण मिटवण्याचं ठरवलं. मात्र त्यानंतर या तरुणाची गावभर धिंड काढल्यानंतरच हे प्रकरण मिटवता येईल.

अशी भूमिका गावातील काही पंचांनी घेतली आणि घुडकानी गावच्या सरपंचांनी ही भूमिका उचलून धरली. पोलीस स्टेशनमध्ये ही चर्चा झाल्याचं अनेकांना माहित नसल्याचं आता समोर आलं आहे. मात्र पोलीस स्टेशनमधून बाहेर आल्यानंतर गावातील काही मंडळी या तरुणाला घेऊन गेली आणि त्याची धिंड काढण्याची तयारी केली गेली.

त्या तरुणाच्या तोंडाला काळं फासण्यात आले आणि त्याला चपलांचा हार घातला गेला व त्याची धिंड काढण्यात आली. भारतीय कायद्यानुसार अशा प्रकारे धिंड काढणे हा गुन्हा असून पोलिसांनी आता धिंड तरुणाची धिंड काढणाऱ्यांविरोथात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या पुढील चौकशी करत आहेत. असे प्रकार वारंवार आपल्याला पाहायला मिळत आहेत. लोक कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु मग कायदा हातात घेतल्यानंतर कारवाईला सामोरं जावं लागणार हे निच्छित.

हेही वाचा 

जनताच रावणाची सत्ता उलथवून सीमोल्लंघन करेल; चित्रा वाघ यांचं पुन्हा वादग्रस्त ट्विट 

Video: ग्रामपंचायतीचा तालिबानी कारभार, गतिमंद तरुणाला तोंडाला काळं फासून घातला चपलांचा हार

IPL 2021: धोनीच सुपर किंग धोनी विजयानंतर असं काय म्हणाला? ज्यामुळे त्याचं सर्व स्तरातून कौतुक होतंय..

Dasara Melava; मी पुन्हा येईन म्हणणारे मी गेलोच नाही म्हणतायत,नाही गेला तर बसा तिकडेच;उद्धव ठाकरेंचा घणाघात 

BMW TEX5 New Car;उदयनराजेंच्या ताफ्यात  नव्या गाडीची एन्ट्री; किंमत जाणून व्हाल अवाक्

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.