Thalaivi movie:’कंगणा राणावत’ने कपिल शर्मा ‘शो’मध्ये लावली आग

0

‘थलाइवी’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कंगना नुकतीच ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमात गेली होती. कपिल शर्मा आणि कंगना या कार्यक्रमात कमालीची धमाल करताना दिसत आहेत. काही महिन्यापूर्वी कंगना भोवती झालेल्या controversyचा या कार्यक्रमात कपिल शर्माने उल्लेख केला असल्याने या ‘एपिसोड’ची जोरदार चर्चा सध्या ‘social media’ मध्ये होताना दिसून येत आहे.

‘सुशांत सिंग’ राजपूत आत्महत्या प्रकरणावरून राज्य सरकार आणि अभेनेत्री कंगना राणावत यांच्यात बरीचशी शाब्दिक चकमक पाहिला मिळाली होती.

मुख्यमंत्री आणि संजय राऊत यांच्यावर एकेरी उल्लेख केल्याने कंगना राणावत चांगलीच ट्रोल झाली होती.

कंगणाने ‘मुंबई’चा पाकव्याप्त काश्मीर असा उल्लेख केल्यामुळे शिवसेना अधिक आक्रमक झाल्याचे त्या वेळी पाहिला मिळाले होते. कंगणाच्या या वक्तव्यानंतर मुंबई महानगर पालिकेकडून कंगणाचे अनधिकृत ऑफिस जेसीबीने पाडल्याची कारवाई केली गेली.

कंगना राणावत आणि शिवसेना यांच्यात झालेल्या वादानंतर केंद्र सरकारकडून कंगणाला लगेच Y+security देखील दिली गेली. याचाच हवाला देत कपिल शर्माने कंगणाला एक प्रश्न विचारला.

“इतनी सिक्योरिटी मिलने के लिए क्या करना पड़ता है”? कपिल शर्माने हा प्रश्र्न विचारताच प्रेक्षकांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. कपिल शर्माच्या या प्रश्नाला उत्तर देताना कंगना म्हणाली, “कुछ नहीं सिर्फ सच बोलना पड़ता है”।
“कैसा लग रहा है इतनी दिन कोई ‘controversy’ नहीं हुई”? असे अनेक मजेदार प्रश्न ‘कपिल’ या कार्यक्रमात कंगणाला विचारताना पाहायला मिळत आहे.

 

बरं,कपिल शर्मा आणि कंगनाची मस्ती ईथेच थांबत नाही. कपिल हातात अग्निशामकची एक छोटीशी टाकी घेऊन कंगनाच्या समोर बसला आहे. यावर कंगना म्हणाली, “ये हाथ में क्यूं लिए बैठे हों”? त्यावर कपिल म्हणतो, “चॅनल वालों ने कहां हैं,ये हाथ में लेकर बैठना। कंगना जहां भी जाती है आग लगा देती है”। कपिल असं म्हणताच प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला.

या ‘शो’ मध्ये सपनाची भूमिका साकारणारा कृष्णा अभिषेक देखील कंगना सोबत मस्ती करताना दिसून येत आहे. कृष्णा कंगणाला म्हणतोय, तुम्हाला माहित आहे, “माझं या ठिकाणी पूर्वी ‘सपना मसाज पार्लर’ होतं. मात्र आता या लोकांनी ते तोडून टाकले. मला माहीत आहे,आपली स्वतःची एखादी वस्तू तुटते तेव्हा कसं वाटतं? कृष्णा असं बोलतच सगळे अवाक् झाल्याचे दिसून येत आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.