Chipi Airport: ‘नारायण राणेंनी उगाच फुशारक्या मारू नयेत’, विनायक राऊतांचा पलटवार
Chipi Airport : चिपी विमानतळाच श्रेय नेमक कोणाचं यावरून नवीनच वाद सुरु झाला आहे. ५ सप्टेंबर रोजी विनायक राऊत यांनी ७ सप्टेंबर पासून चिपी विमानतळ चालू होणार असल्याचे सांगितले होते. आम्ही ज्योतिरादित्य शिंदे यांना भेटून विमानतळाला लायसन्स मिळाल्याचे सांगितले, असे देखील खासदार विनायक म्हणाले होते. मात्र पुन्हा राणे यांनी विमानतळाचं उद्घाटन येत्या ९ ऑक्टोबर रोजी होणार असल्याचे सांगितले. राणे पुढे म्हणाले, ” मी ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली आहे. ते आणि मी दोघेही ९ तारखेला चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला हजर राहणार आहे. (A new controversy has erupted over who owns the Chippewa Airport.)
मात्र शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील चर्चेनुसार चिपी विमानतळाच्या उद्धाटनाची तारीख ठरली आहे. त्यामुळे राणेंना चिपी विमानतळाचे श्रेय घेण्याचा अधिकार नाही. त्यांनी उगाच फुशारक्या मारू नयेत असा नारायण राणे यांना टोला लगावला.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख जाहीर केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या उद्घाटनासाठी हवेतच हे गरजेचे नाही असे राणे म्हणाले होते. याच मुद्याला अनुसरून विनायक राऊत यांनी चिपी विमानतळ व्हावं यासाठी मी चार वेगवेगळ्या बैठका घेतल्या होत्या. गजपती राजू, कॅप्टन पुरी त्या आधी सुरेश प्रभू आणि आता ज्योतिरादित्य शिंदे अशा चार हवाई वाहतूक मंत्र्यांसोबत बैठका घेतल्या आहेत. आम्ही गेले सहा वर्ष एव्हिएशन कमिटीत हा मुद्दा लावून धरला आहे. त्यामुळे चिपी विमानतळाचे श्रेय नारायण राणेंनी घेऊ नये. विनायक राऊत पुढे बोलताना म्हणाले, कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्योतिरादित्य शिंदें यांच्या सोबत सकाळी ११ वाजता चर्चा केली. आणि काल उद्घाटनाचा दिवस ठरला. असे विनायक राऊत म्हणाले
दरम्यान याच मुद्द्यावरून राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले, ‘आम्ही चिपी विमानतळाचे यजमान आहोत. एअरपोर्टचे मालक आहोत. हा उद्योग विभागाचा विषय आहे. नारायण राणे यांच्याबाबत मला माहीत नाही. परंतु कोणाला बोलवायचं याबाबत प्रस्ताव आलेला नाही’ असे सुभाष देसाई म्हणाले.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम