शिखर धवन आणि आयशाचा खरंच घटस्फोट झाला? वाचा सविस्तर!

0

भारताचा अनुभवी डावखुरा सलामीवीर’शिखर धवन’ आणि त्याची पत्नी आयशा मुखर्जी यांचा ‘घटस्फोट‘ झाला असल्याची माहिती माध्यमांमधून समोर येत आहे. मात्र शिखर धवनने याविषयी कोणतीही अधिकृत माहिती अद्याप दिली नाही.

शिखर धवनकडून या विषयी कसलेही संकेत आले नसले तरी,त्याची पत्नी आयशाने आपल्या नवीन instagram अकाउंटवरून आपला घटस्फोट झाला असल्याचं सांगितलं आहे.

आयशाचे हे नवीन इंस्टाग्राम अकांऊट व्हेरिफार नाही. मात्र हे अकांऊट रोहीत शर्माची पत्नी फॉलो करत असल्याने ही बातमी अधिकृत असल्याचे संकेत मिळत आहेत.

घटस्फोटाचे नेमके कारण समजू शकले नाही,मात्र आयशा मुखर्जीने आपल्या इंस्टाग्रामवरून घटस्पोट विषयी एक भावनिक पोस्ट लिहीली आहे.

इंस्टाग्रामवर सध्या जी पोस्ट व्हायरल होतेय त्यात आयशाने म्हटले आहे,असं बोललं जात एकदा घटस्फोट घेतला तरी,ते खूप वाईट असतं. आणि मी तर हा प्रसंग दुसऱ्यांदा अनुभवतेय.

https://www.instagram.com/p/CTgr2WcJKWW/?utm_medium=copy_link

आयशा आणि धवन या दोघांची ओळख फेसबुकद्वारे २००९ साली झाली. या ओळखीचे मैत्रीत रुपांतर झाले,पुढे मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. ३वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी २०१२ मध्ये लग्न केले. या लग्नापासून दोघांनी’जोरावर’नावाच्या मुलाला जन्म दिला आहे.

‘शिखर धवनशी’ लग्न करण्यापूर्वी आयशाचे लग्न होऊन घटस्फोट झाला होता. पहिल्या लग्नापासून आयशाला आलिया आणि ऱ्हिआ अशा दोन मुली आहेत.

तसं पाहिला गेलं तर आयशाने ज्या इंस्टाग्राम अकांऊट वरुन ही पोस्ट लिहिलीय ते अकांऊट व्हेरिफार नाही. आणि म्हणून महाराष्ट्र लोकशाही या बातमीची पुष्टी करत नाही.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.