Narayan Rane | नारायण राणेंच्या ड्रायव्हरचा मृत्यू; कुटुंबियांनी केला ‘हा’ गंभीर आरोप

0

नवनिर्वाचित केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या कार ड्रायव्हरचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. राणेंच्या ड्रायव्हरच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियांनी याबाबत गंभीर आरोप केले आहेत. कुटुंबियांकडून राणेंचे ड्रायव्हर वैद्यकीय सुट्टीवर होते  तरीदेखील त्यांना कामावर बोलवण्यात आल्याचा दावा कारचालकाच्या कुटुंबाने केला आहे. पोलिसांकडून याबाबत चौकशीला सुरवात देखील करण्यात आली आहे. सध्या केंद्रीय मंत्री नारायण राणे हे लखनऊ दौऱ्यावर आहेत. राणे लखनऊ दौऱ्यावर असताना ही धक्कादायक घटना घडली आहे. (Newly elected Union Minister Narayan Rane’s car driver has died of a heart attack.)

अशोक कुमार वर्मा असं या राणेंच्या कार ड्रायव्हरचे होतं. अशोक वर्मा हे राज्य स्थावर विभागमध्ये चालक या पदावर कार्यरत होते. वर्मा यांची प्रकृती काही दिवसांपासून  ठिक नव्हती. मात्र नारायण राणे हे लखनऊ दौऱ्यावर असताना त्यांना कामावर रुजू होण्यासाठी आदेश देण्यात आला.  कामावरती  असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र त्यांना त्या ठिकाणी वाचवण्यात यश आलं नाही.

कार चालक  अशोक कुमार यांची प्रकृती व्यवस्थित नव्हती. त्यामुळे अशोक कुमार यांनी  वैद्यकीय रजा घेतली होती. परंतु राणे लखनऊमध्ये आल्यानंतर त्यांची रजा रद्द करण्यात आली. कार चालक अशोक कुमार यांना जबरदस्ती कामावर बोलावून घेण्यात आले.  स्थावर विभागातील अधिकारी अमरिश श्रीवास्तव यांना अशोक कुमार यांच्या प्रकृतीबाबत माहिती होती. रजा मंजूर असताना देखील अमरीश श्रीवास्तव यांनी  कामावर हजर व्हा नाहीतर  निलंबित करू अशी  धमकी दिली होती. म्हणून नाईलाजाने अशोक कुमार हे कामावर रुजू झाले.  असा गंभीर आरोप अशोक कुमार यांच्या कुटुंबियांनी प्रशासनावर केला   आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.